भारतात फळबाग लागवड हे हमीचे पिक मानले जाते असेच एक पिक म्हणजे केळीचे पिक. पण ह्या हमीच्या केळी पिकात एक महाभयंकर रोग ह्याच्या उत्पादनात खुपच घट घडवून आणतो, आणि त्यामुळे मोठ्या आशेने लावलेले हे पिक शेतकऱ्यांना तोटा आणून देते आणि शेतकऱ्यांसाठी मोठी चिंता ह्यापासून उत्पन्न होते. महाराष्ट्रात देखील केळीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. महाराष्ट्रातील विशेषता जळगाव जिल्हा केळी उत्पादनात आपले मोलाचे स्थान ठेवतो, एवढेच नाही तर जळगाव जिल्ह्याच्या केळीला जिआय टॅग देखील देण्यात आला आहे.
ह्यावरून आपल्याला समजले असेलच की, केळी उत्पादनात जळगावचा सिंहाचा वाटा आहे. आज आपण खास आपल्या केळी उत्पादक शेतकरी मित्रांसाठी एक महत्वाची माहिती घेऊन आलो आहेत. आज आम्ही आपणांस केळीमध्ये लागणाऱ्या फ्यूजेरियम विल्ट ह्या रोगाची माहिती आणि त्यावरील उपचार ह्याविषयीं माहिती घेऊन आलो आहोत.
आपल्या भारतातील वैज्ञानिक शेतीमध्ये सुधारणा करण्यासाठी नेहमी झडत असतात आणि शेतकऱ्यांचे उत्पादन वाढवण्यासाठी नवनवीन शोध लावतात आणि पिकांमध्ये लागणाऱ्या रोगांवर उपचार शोधत असतात. अशाच एका केळी पिकावरील महाभयंकर रोगावर (फ्यूजेरियम विल्ट) शास्त्रज्ञानी उपचार शोधलाय. यासाठी ICAR-FUSICONT नावाचे जैव कीटकनाशक तयार करण्यात आले आहे. ह्यासाठी एका प्रायव्हेट कंपनीने जगात ह्या औषधच्या वितरणासाठी टेक्नॉलॉजि विकत घेण्याचा करार केला आहे. सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ सबट्रोपिकल हॉर्टिकल्चर (सीआयएसएच) चे संचालक डॉ शैलेंद्र राजन म्हणाले की, फुसिकॉन्ट हे जैव कीटकनाशक द्रावण आहे जे या फ्यूजेरियम विल्ट (Fusarium wilt) रोगाशी लढण्यास समर्थ आहे. जागतिक पातळीवर कॅव्हेंडिश जातीच्या केळीच्या लागवडीवर हा रोग मोठ्या प्रमाणावर परिणाम करतो. हा रोग एक साथीच्या रोगासारखा आहे.
आणि ह्यामुळे कॅव्हेंडिश केळी नष्ट होण्याचा धोका आहे, जो एकूण केळी लागवडीच्या 99 टक्के आहे. त्यामुळे ह्या जैव कीटकनाशकामुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांचा नक्कीच फायदा होईल आणि केळी उत्पादक शेतकरी बक्कळ कमाई करतील.
फ्यूजेरियम विल्ट ह्या रोगाचे लक्षण
कृषी शास्त्रज्ञांच्या मते व आदर्श केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या मते, फ्यूजेरियम विल्ट नावाचा रोग हा बुरशीमुळे होतो.
हा रोग समजा केळी पिकावर आला तर केळीच्या झाडांची पाने तपकिरी होऊ लागतात आणि पाने गळू लागतात. ह्या रोगामुळे केळीचे पानाचे व फळाचे देठ सडण्यास सुरवात होते. आणि ह्यासर्व गोष्टीमुळे संपूर्ण केळी पीक नष्ट होऊ शकते.
Published on: 02 October 2021, 09:17 IST