फळधारणेपासुन तर फळ काढणी पर्यंत वेगवेगळ्या कारणांमुळे फळगळ होते. आंबिया पिकाची ९० टक्क्यांहून जास्त फळगळ नैसर्गिकरित्या होते. ऑगस्ट ते सप्टेंबर महिन्यात होणारी फळगळ अधिक गंभीर स्वरूपाची असते.
मोसंबीला भरपूर फुले लागतात. फळधारणाही भरपूर होते. परंतु एकूण फुलांच्या ०.५ ते १ टक्क्या इतकीच फळे काढणीपर्यँत हाती लागतात. म्हणून फळगळ हा अतिशय गंभीर प्रश्न आहे. वातावरणातील आद्रता,कीड व रोग इत्यादी कारणीभूत आहेत.
आंबिया पिकाची ९० टक्क्यांहून जास्त फळगळ नैसर्गिकरित्या होते. ऑगस्ट ते सप्टेंबर महिन्यात होणारी फळगळ अधिक गंभीर स्वरूपाची असते. कारण यावेळी फळे मोठ्या आकाराची झालेली असतात.
नैसर्गिक कारणाव्यतिरिक्त,देठांच्या इजेमुळे, रोगांमुळे व फळमाशी आणि रस शोषण करणाऱ्या पतंगामुळे अर्धी कच्ची फळे पिवळी पडतात,सडतात व गळतात. पण फळगळ काही विशिष्ट काळात अतिशय तीव्र व जास्त प्रमाणात असते. मोसंबी मध्ये सुध्दा सुमारे १ ते २ लाखावरील फुलांपैकी फक्त ०.२ ते २ टक्के एवढीच फळामध्ये रुपांतरीत होतात. या मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या फुलगळीस इतर बरीचशी कारणे आहेत. वातावरणातील आद्रता,कीड व रोग इत्यादी कारणीभूत आहेत.
फुलगळ आणि फळगळीची कारणे :
फळझाडावर फुलांची निर्मिती झाल्यानंतर ती उमलत असताना त्यांची गळ होत असते.
दुसरी फुलगळ १५ ते २५ दिवसानंतर होते.यावेळी ज्या फुलांचे फळधारणेत रूपांतर झाले नाही अशी फुले गळून पडतात.
फळधारणा झालेली अती लहान फळे देखील गळून पडतात.
बोरांच्या आकारांची व त्यापेक्षा मोठी झाल्यानंतर पक्व होईपर्यंत वाढ झालेली फळे देखील गळून मोठ्या प्रमाणात नुकसान होत असते.
वाढ झालेल्या फळात इथिलीन तयार होते व त्यामुळे फळगळ होत असते.
झाडे रोगग्रस्त, कीडग्रस्त, दुखापत झालेली अथवा अत्याधिक वयाचे असणे.
कर्ब : नत्र गुणोत्तरमध्ये असंतुलन.
सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता व झाडाची उपासमार
पाण्याच्या ताण किंवा अतिरिक्त वापर तापमानातील बदल
ओलिताचे व्यवस्थापन बरोबर नसणे, कमी किंवा अधिक पाण्यामुळे फळझाडांस ताण बसतो त्यामुळे फळ गळण्यास सुरुवात होते. संतुलित पाण्याचा वापर असल्यास फळझाडांवरील फळांना ताण बसत नाही.
आंबिया बहाराची फळगळ रस शोषण करणाऱ्या पतंगामुळे सुध्दा होते. या किडीचे प्रौढ पतंग सांयकाळी ७ ते ९ दरम्यानच्या काळात फळांवर बसून आपली सोंड फळात खूपसते आणि रस शोषण करतात.
Published on: 12 January 2022, 07:07 IST