वांगी पिकामध्ये येणार्या शेंडा व फळे पोखरणाऱ्या अळीच्या प्रादुर्भावामुळे सर्वसाधारणपणे 40 टक्क्यांपर्यंत नुकसान होते. वेळीच उपाययोजना न केल्याचे नुकसान 100 टक्क्यांपर्यंत जाऊ शकते. या लेखात आपण वांग्यावरील शेंडा व फळे पोखरणाऱ्या आळी व तिचे व्यवस्थापन विषयी माहिती घेऊ.
वांग्याची शेंडे व फळे पोखरणारी अळी
या अळीचा जीवनक्रम
या किडीची मादी एकानंतर एक अशी 250 अंडी झाडाच्या पानांवर, शेंड्यावर, फुलांच्या कळ्यांवर आणि कोवळ्या फळांवर घालते. या आईची अंडी गोलाकार सफेद व पिवळ्या रंगाचे असतात.ही अंडी तीन ते पाच दिवसांनी उबतात व त्यातून सफेद अळी बाहेर येते. ही अळी पिकाच्या सुरवातीच्या अवस्थेत शेंडा व फळधारणा वेळी फळांमध्ये नुकसान करते.
या आळी मुळे होणाऱ्या नुकसानीचा प्रकार
या किडीचा प्रादुर्भाव हा वांग्याचे रोप लावल्यानंतर काही दिवसातच दिसून येतो. हि अळी प्रथम पानांच्या देठात, कोवळ्या शेंड आत शिरून आतील भाग खाते. या किडीचे प्रमुख लक्षण म्हणजे प्रादुर्भावग्रस्त शेंडे वाळतात. पीक फुलोऱ्यावर आल्यानंतर कळि पोखरून आत शिरते. प्रादुर्भावग्रस्त फुले फळे न धरता वळून,सुकून जमिनीवर गळून पडतात. फळे आल्यानंतर ही अळी सुरुवातीला छिद्र करून फळात प्रवेश करून विष्टेद्वारे प्रवेशद्वार बंद करते. त्यामुळे बाहेरून फळ किडल्याचे लवकर लक्षात येत नाही. आतील गर काहून विस्टा आतच सोडत असल्यामुळे कीडग्रस्त फळे खाण्यास अयोग्य ठरतात.
शेंडे आळीचे एकात्मिक कीड व्यवस्थापन
- उन्हाळ्यामध्ये जमिनीची खोल नांगरट करावी जेणेकरून किडीच्या विविध अवस्था नष्ट होतात.
- एकाच शेतामध्ये वर्षानुवर्ष वांग्याचे पीक घेऊ नये. जास्त प्रादुर्भाव झालेल्या शेतामध्ये पुढच्या वर्षी वांग्याचे पीक घेणे टाळावे. पिकांची योग्य प्रकारे फेरपालट करावी.
- मागील पिकांचे अवशेष गोळा करून नष्ट कराव्यात.
- लागवडीसाठी वांग्याच्या सुधारित व शिफारस इत वानांचा वापर करावा. या पिकाला गरजेनुसार खत मात्रा द्यावी व आवश्यकता असेल तेवढेच पाणी द्यावे.
- प्रादुर्भावग्रस्त झाडाची शेंडे व फळे तोडून अळ्या सहित त्यांचा नायनाट करावा.
- वानांच्या शिफारशीनुसार दोन झाडांमधील व दोन ओळींतील अंतर ठेवावे.
- प्रकाश सापळ्यांचा उपयोग करून पतंग नष्ट करावेत.
- वांग्याच्या पिकामध्ये सर्वेक्षणासाठी एकरी पाच कामगंध सापळे पिकाच्या वर एक फूट उंचीवर लावावेत. शेंडा व फळे पोखरणाऱ्या अळ्यांच्या तीव्रतेचे कल्पना येते.
- पाच टक्के निंबोळी अर्काची अडीच मिलि प्रति लिटर पाणी याप्रमाणे प्रतिबंधात्मक फवारणी करावी.
- जैविक कीड नियंत्रणासाठी ट्रायकोग्रामा व ब्रेकॉनया परोपजीवी कीटकांचा अंड्याचे प्रसारण करावे.
- वरील उपाय योजना केल्यानंतर ही जर आळीचा प्रादुर्भाव जास्त दिसला तर रासायनिक नियंत्रण करावे.
शेंडे पोखरणाऱ्या आळी साठी रासायनिक नियंत्रण ( प्रति लिटर पाणी )
- क्लोरोपायरीफॉस(20इ.सी ) 1.5 मिली
- इमामेक्टीन बेंजोएट (5 इसी )0.4 ग्रॅम
- पायरीप्रोक्सिफेन-(5 इसी ) अधिक फॅनप्रोपथ्रीन(15इ.सी.)संयुक्त कीटकनाशक एक मिली
Published on: 13 October 2021, 10:40 IST