Agripedia

भाजीपाला पिकामध्ये फळ पोखरणारी अळी एकात्मिक कीड असून या किडीचा प्रादुर्भाव झाल्यास आणि दुर्लक्ष केल्यासपिकाचे 70 ते 80 टक्के नुकसान होते. त्यामुळे मोठा आर्थिक फटका बसतो.यासाठी या किडीचा वेळीच बंदोबस्त करणे गरजेचे आहे.यासाठी एकात्मिक व्यवस्थापन पद्धतीचा अवलंब करणे फायद्याचे ठरते या लेखात आपण टोमॅटो पिकावरील फळ पोखरणारी अळी विषयी माहिती घेऊ.

Updated on 06 December, 2021 1:11 PM IST

भाजीपाला पिकामध्ये फळ पोखरणारी अळी एकात्मिक कीड असून या किडीचा प्रादुर्भाव झाल्यास आणि दुर्लक्ष केल्यासपिकाचे 70 ते 80 टक्के नुकसान होते. त्यामुळे मोठा आर्थिक फटका बसतो.यासाठी या किडीचा वेळीच बंदोबस्त करणे गरजेचे आहे.यासाठी एकात्मिक व्यवस्थापन पद्धतीचा अवलंब करणे फायद्याचे ठरते या लेखात आपण टोमॅटो पिकावरील फळ पोखरणारी अळी विषयी माहिती घेऊ.

 फळ पोखरणारी अळी आणि तिचे व्यवस्थापन

 या अळीचा जीवनक्रम-

1-याअळीच्या प्रामुख्याने चार अवस्था असतात.पहिली अवस्था ही अंडी अवस्था, दुसरी अवस्था ही अळी अवस्था असते,तिसरी अवस्था ही कोश आणि चौथी प्रौढ अवस्था असते.

2- ही अळी सुरुवातीला हिरव्या रंगाची असुन नंतर तपकिरी रंगाचे होते.तिच्या अंगावर राखाडी किंवा पांढऱ्या रंगाच्या रेषा असतात.

3-या अळीचा कोष तपकिरी रंगाचा असून फळांचा अवशेषात किंवा जमिनीत आढळते.

4-पतंग फिकट पिवळसर किंवा फिकट हिरव्या रंगाचा असतो.

5-या यांचा जीवन क्रम 25 ते 30 दिवसाच्या आत पूर्ण होतो.

या आळीचीआर्थिक नुकसान पातळी

एक अळीचा पतंग प्रति मीटर रांगेत किंवा दोन टक्के नुकसान करतो.

नुकसानीचा प्रकार

 एक अळी ही 2 ते 8 फळांचे नुकसान करू शकते. जवळपास हीकिड 70 ते 80 टक्के नुकसान करते.

 फळ पोखरणाऱ्या अळीचे एकात्मिक नियंत्रण

  • टोमॅटो पिकाची पुनर्लागवड करताना मुख्य पिकाच्या कडेने मका आणि चवळी लावावी तसंच झेंडू लावावा.
  • टोमॅटोची लागवड केल्यानंतर 40 ते 45 दिवसांनी शेतात ट्रायकोग्रामा चीलोनिस हे मित्रकीटक 1 लाख प्रति हेक्‍टर या प्रमाणात सात दिवसाच्या अंतरानेदोन ते तीन वेळा सोडावेत. हे कीटक फळे पोखरणाऱ्या किडीची अंडी शोधूनत्यात स्वतःची अंडी घालतात.. परिणामी फळे पोखरणारे किडे अंडी अवस्थेतच नष्ट होते.
  • फळे पोखरणाऱ्या अळीच्या नियंत्रणासाठी त्यांना रोगकारक ठरणाऱ्या या विषाणूचा वापर करता येतो. हेलिकोवर्पा न्यूक्लियर पॉलिहायड्रॉसवायरस एक मिलि प्रति लिटर पाणी याप्रमाणेऊन कमी झाल्यानंतर संध्याकाळी फवारणी करावी.
  • पाच टक्के निंबोळी अर्का किंवा कडुनिंब आधारित अझाडेरेक्टिन( तीन हजार पीपीएम)2 मिली प्रति लिटर प्रमाणे फवारणी करावी.
  • बीटी जिवाणूजन्य कीटकनाशकदोन ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी.
  • शेतात एकरी पाच या प्रमाणात कामगंध सापळे लावावेत.
  • कीडलेली फळे काढून खोल खड्ड्यात गाडून टाकावे.
English Summary: fruit borer insect in tommato crop thats management and integrated management
Published on: 06 December 2021, 01:11 IST