या कार्यक्रमास सातारा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी माननीय श्री. शेखर सिंह यांची प्रमुख उपस्थिती लाभली तसेच जिल्हा सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. राजेंद्र सरकाळे यशवंत किसान मंचचे अध्यक्ष श्री. रामदास कदम हे देखील उपस्थित होते. या कार्यक्रमाला जिल्ह्याच्या विविध भागातून साधारणपणे २०० प्रगतशील शेतकऱ्यांची उपस्थिती लाभली. यावेळी रसायनमुक्त शेतीकडे वाटचाल, हायटेक शेती तंत्रज्ञान, जमिनीची आरोग्य व पीक व्यवस्थापन, सेंद्रिय शेती अश्या विविध विषयांवर शेतकऱ्यांना तज्ज्ञांकडून सखोल मार्गदर्शन करण्यात आले. त्यासोबतच के. बी. बायो ऑरगॅनिक्सच्या कृषीतज्ञ अनिता राय यांनी कंपनीच्या विविध उत्पादनांची प्रात्यक्षिके दाखविली.
व त्याचप्रमाणे ही उत्पादने किडींवर अवघ्या ४८ तासात नियंत्रण मिळवून पिकांना निरोगी ठेवतात याबद्दल सखोल माहिती दिली. के. बी. बायो ऑरगॅनिक्सच्या उत्पादनांच्या माध्यमातून रसायनांच्या तोडीस तोड रिझल्ट्स मिळतात आणि ही उत्पादने रसायनमुक्त असल्याने निर्यातक्षम कृषीमालाचे अगदी सहजपणे घेता येते ही बाब उपस्थित शेतकऱ्यांसाठी विशेष ठरली.
के. बी. चे प्रतिनिधी श्री. योगेश यादव यांनी के. बी. एक्सपोर्ट तसेच के. बी. बायो ऑरगॅनिक्स या कंपन्यांबद्दल शेतकऱ्यांना माहिती दिली. सोबतच के. बी. एक्स्पोर्टच्या माध्यमातून होणारी विविध कृषीमालाची निर्यात, करार शेती आणि या सर्व माध्यमातून शेतकऱ्यांना मिळणाऱ्या योग्य परताव्याबद्दल आणि फायदेशील ठरणाऱ्या शेतीबद्दल मार्गदर्शन केले.
माध्यमातून शेतकऱ्यांच्या रसायनमुक्त शेतीतील वाटचालीवर जिल्हाधिकारी श्री. शेखर सिंह यांनी समाधान व्यक्त केले व के. बी. बायो ऑरगॅनिक्सच्या उत्पादनांचे व प्रतिनिधींचे कौतुक केले. कृषीतज्ञ अनिता राय यांनी पिकातील रोग व कीड व्यवस्थापनाबद्दल संपूर्ण माहिती उपस्थित शेतकऱ्यांना दिली जी खूप उपयुक्त ठरली आणि शेतकऱ्यांनी या उत्पादनांचा वापर करणे काळाची गरज असल्याचा मानस व्यक्त केला. यशवंत किसान मंचचे अध्यक्ष श्री. रामदास कदम यांनी देखील यावेळी आपले मनोगत व्यक्त केले आणि शेतकऱ्याच्या उन्नतीसाठी के. बी. बायो ऑरगॅनिक्सची अतिशय उपयुक्त ठरतील आणि रसायनमुक्त शेतीमध्ये एक नवी क्रांती घडवून आणतील हे ही यांनी यावेळी अधोरेखित केले.
यावेळी के. बी. बायो ऑरगॅनिक्सचे श्री. महादेव सोनवलकर व इतर प्रतिनिधी देखील उपस्थित होते.
शब्दांकन - प्रतिक काटकर
(के. बी. बायो ऑरगॅनिक्स)
Published on: 30 December 2021, 01:02 IST