Agripedia

आजपर्यंत आपण अनेक किडींच्या नियंत्रणासाठी विविध प्रकारची रासायनिक कीटकनाशके वापरली असतील.काही आंतरप्रवाही असतील,तर काही स्पर्शशील-पोटविषे पण या विविध किडींवर वर फ़क्त रासायनिक कीटक नाशकेच उपाय म्हणून आहेत का? तर नाही.

Updated on 01 October, 2021 8:21 PM IST

ज्या पद्धतीने आपल्याला एखादा बुरशींमुळे त्वचारोग(Fungal Infection) होतो, व लवकर शरीरावरुन हटत नाही. अगदी त्याचप्रमाणे पिकामध्ये नुकसानदायक ठरणाऱ्या अळीला, भुंग्यांना, कीटकांनाही  बुरशींमुळे रोग होतो,जे  कीटकांच्या मृत्यूस कारणिभुत ठरतात. अश्याच एका बुरशीविषयी जी शेतकऱ्यांना फायदेशीर व पर्यावरण अनुकूल कीड  नियंत्रण करण्यासाठी करण्यास मदत करते जिचे नाव आहे 

 मेटारझिअम ऍनीसोप्लीई.

२००९ साली झालेल्या एका संशोधनात मेटारझिअम ऍनीसोप्ली हि मित्रबुरशी पिकावर येणाऱ्या विविध प्रकारच्या २०० हुन अधिक किडींवर चांगल्या प्रकारे नियंत्रण मिळावू शकते. 

मेटारझिअम ऍनीसोप्लीई बुरशी काम कशी करते...?

       बुरशीमुळे किडींचा होणाऱ्या आजाराला ग्रीन मस्कर्डिन रोग म्हणतात कारण  बुरशीच्या बीजाणूंचा हिरवा रंग असतो. जेव्हा बुरशीचे हे माइटोटिक (अलैंगिक) बीजाणू (ज्याला कॉनिडिया म्हणतात) कीटकांच्या संपर्कात येतात, तेव्हा ते अंकुरतात आणि उदयास येणारे बुरशीचे तंतू  कीटकाच्या शरीरामध्ये  प्रवेश करतात. नंतर बुरशी शरीराच्या आत विकसित होते, अखेरीस काही दिवसांनी कीटक मारतो कीटकांचे शरीर अनेकदा लाल होते. मातीजवळ राहणाऱ्या बहुतेक किटकांनी एम.अनिसोप्लियासारख्या बुरशी विरूद्ध नैसर्गिक संरक्षण विकसित केले आहे. 

वापरण्याची पद्धत:- हुमणी अळीच्या नियंत्रणासाठी मेटाहायझीम ऍनिसोप्लीई मुळाच्या सभोवती आळवणीद्वारे द्यावे.

. किंवा मातीमध्ये आळवणी करावी. आठवड्यातून एकदा या प्रमाणे चार आठवडे वापर करावा. ग्रीनहाउस कीटकांच्या नियंत्रणासाठी प्रत्येक १० ते १५ दिवसांत एकदा या प्रमाणे वापर करावा.

लक्ष्य कीटक:भुंगे, तुडतुडे, हुमणी अळी,किडींच्या अळी अवस्था इत्यादी.

पीके :- अन्नधान्य, डाळी, भाजीपाला, फळ पिके आणि ऊस इत्यादी.

 मात्रा:-५०० लिटर पाण्यात ५ किलो प्रती हेक्टर, म्हणजे ५ ग्रॅम प्रति लिटर पाण्यात टाकून फवारणी करावी तर ठिबक सिंचनाद्वारे ५ ग्रॅम प्रती लिटर वापरू शकतो.

 

 मित्र बुरशी किंवा जैविक नियंत्रण पद्धती वापरणे का गरजेचे:- 

पर्यावरणावर विषारी रासायनिक कीटकनाशकांचे हानिकारक परिणाम, रासायनिक कीटकनाशकांप्रती कीटकांमध्ये प्रतिकारशक्तीचा विकास,

कीटकनाशकांचे अन्नामध्ये मिळणारे अंश,त्याचा मानवी पाहता जैविक  नियंत्रणाचा पर्याय हा वापरणे गरजेचे आहे. सद्याची परिस्थिती पाहता हुमणी अळीचा बंदोबस्त अनेक विषारी कीटकनाशके करू शकली नाहीत त्यावर मेटारझिअम मित्र बुरशी प्रभावी ठरतेय.  

 

संकलन - IPM school

-

English Summary: Friendly fungi that effectively control the larval stage of various insects: - Metarzium anisoplii
Published on: 01 October 2021, 08:21 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)