Agripedia

भारतात मोठ्या प्रमाणावर लोक शेती करतात. अनेकांचे जीवनमान यावरच आहे, यामुळे शेतीमध्ये सुधारणा होणे गरजेचे आहे. सध्या आधुनिक शेतीला महत्व प्राप्त झाले आहे. सध्या शेतकरी पारंपारिक शेतीला फाटा देत आहेत. यामुळे अनेक शेतकऱ्यांना सुगीचे दिवस आले आहेत. असे असताना आता नवीन तंत्रज्ञानाच्या आगमनानंतर शेतकऱ्यांची शेती पूर्वीपेक्षा थोडी सोपी झाली आहे. तसेच नफ्यातही वाढ झाली आहे.

Updated on 12 August, 2022 10:34 AM IST

भारतात मोठ्या प्रमाणावर लोक शेती करतात. अनेकांचे जीवनमान यावरच आहे, यामुळे शेतीमध्ये सुधारणा होणे गरजेचे आहे. सध्या आधुनिक शेतीला महत्व प्राप्त झाले आहे. सध्या शेतकरी पारंपारिक शेतीला फाटा देत आहेत. यामुळे अनेक शेतकऱ्यांना सुगीचे दिवस आले आहेत. असे असताना आता नवीन तंत्रज्ञानाच्या आगमनानंतर शेतकऱ्यांची शेती पूर्वीपेक्षा थोडी सोपी झाली आहे. तसेच नफ्यातही वाढ झाली आहे.

आता एकाच पिकात जास्तीची पिके घेऊन शेतकरी चांगले उत्पादन देखील कमवत आहेत. आता एकाच वेळी आणि ठिकाणी 4 ते 5 पिके घेण्याची पद्धत बहुस्तरीय शेतीद्वारे केली जाते. यासाठी शेतकऱ्यांनी आधी जमिनीत असे पीक लावावे, जे जमिनीच्या आत उगवते. मग त्याच शेतात भाजीपाला आणि इतर झाडे लावता येतात. याशिवाय शेतकरी त्याच शेतात एखादे चांगले पीक व फळझाडे लावू शकतात. यामुळे अशा प्रकारची शेती सध्या फायदेशीर ठरत आहे.

तसेच यामध्ये खत आणि पाण्याचे योग्य व्यवस्थापन केले तर उत्पादन खर्च देखील कमीच आहे. यामध्ये एका पिकाला पाणी देऊन शेतकरी चार प्रकारची पिके घेऊ शकतात. असे केल्याने त्यांचा लागवडीचा खर्च कमी होईल आणि त्यांना जास्त जमीन ठेवण्याची गरज भासणार नाही. त्याचबरोबर या शेतीमध्ये जास्त पाण्याची आवश्यकता देखील भासत नाही.

डोनाल्ड ट्रम्प यांच्या घरी FBI चा छापा, इतिहासात पहिल्यांदाच कारवाई केल्याने जगभरात खळबळ

याचे कारण म्हणजे एकदा पाणी दिल्यास 4 पिकांना एकदम पाणी मिळते. त्यामुळे शेतकऱ्यांना डबल पाणी द्यावे लागत नाही. यामध्ये शेतकऱ्यांनी आपल्या शेतात आधी जमिनीत असे पीक लावावे, जे जमिनीच्या आत उगवते. मग त्याच शेतात भाजीपाला आणि इतर झाडे लावता येतात. याशिवाय शेतकरी त्याच शेतात एखादे चांगले पीक व फळझाडे लावू शकतात, एक जिमिनीखाली एक जमिनीवर असलेला वेल अशा प्रकारे नियोजन अनेक शेतकरी करत आहेत.

शेतकऱ्यांनो आता पीव्हीसी पाईपसाठी मिळणार ३० हजार रुपये, असा घ्या लाभ..

एका शेतकऱ्याला एक लाख रुपयांपर्यंत खर्च आला, तर त्यातून शेतकरी सहजपणे 5 लाख रुपयांपर्यंतचा नफा कमवू शकतात. म्हणूनच अशा पद्धतीने शेती करणे शेतकऱ्यांसाठी प्रचंड फायदेशीर आहे. यामुळे शेतकऱ्यांनी असेही प्रयोग करणे गरजेचे आहे. ज्या शेतकऱ्यांना शेती कमी आहे. या शेतकऱ्यांना हे फायदेशीर आहे.

महत्वाच्या बातम्या;
शेतकऱ्यांना मोठा दिलासा! लंम्पी त्वचेच्या रोगावर लस आली
ऊस उत्पादक शेतकऱ्यांची होणार जंगी कमाई, शेतकऱ्यांनो आलीय नवीन टेक्निक, जाणून घ्या...
तुम्ही फक्त 'येस सर' म्हणायचं आणि ... ! गडकरींनी अधिकाऱ्यांना झाप झाप झापलं

English Summary: Four crops in one crop, new technology will get huge money..
Published on: 12 August 2022, 10:34 IST