उन्हाळी हंगामामध्ये भेंडी हे पीक जास्त प्रमाणात घेतले जाते.भेंडी मध्ये बरेच आरोग्यदायी गुणधर्म समाविष्ट आहेत.भेंडी मध्ये कॅल्शियम व आयोडिन ही मूलद्रव्ये तसेच क जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात असतात. त्यासोबतच भेंडीमध्ये कॅरोटीन, पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि फॉलिक ऍसिड याचा अनेक घटक आहेत.
त्यामुळे बाजारपेठेत वर्षभर भेंडीला चांगली मागणी असते व भावदेखील चांगला मिळतो. या लेखामध्ये आपण भेंडीच्या काही महत्त्वपूर्ण वा चांगले उत्पादन देणाऱ्या जाती विषयी माहिती घेऊ.
भेंडीच्या काही महत्त्वपूर्ण जाति
भेंडीच्या लागवडीसाठी उपयुक्त अशा काही सुधारित जाती म्हणजेच अंकुर 40, पुसा सावनी, महिको 10,परभणी क्रांती, वर्षा,अर्का अनामिका, सिलेक्शन 2-2, फुले उत्कर्षा इत्यादी जाती लागवडीसाठी उपयुक्त आहेत.
- अंकुर 40- ही जात सरळ वाढणारी असून पेरामधील अंतर कमी असते तसेच फळे हिरवी असतात. या जातीपासून हेक्टरी आठ ते दहा टन उत्पादन मिळते.
- महिको 10- ही जात भेंडीची अधिक लोकप्रिय आहे. या जातीपासून मिळणारी भेंडी ही गर्द हिरवी गार असते. या जातीपासून हेक्टरी 10 ते 12 टन उत्पादन मिळते.
- वर्षा- ही देखील बंडीची लोकप्रिय जात असून मिळणाऱ्या फळांची लांबी 5 ते 7 सेंटीमीटर असून फळे हिरवी व लुसलुशीत असतात. या जातीचे वैशिष्ट्य म्हणजे फळे तोडल्यानंतर काळे पडत नाहीत.या जातीपासून हेक्टरी 10 ते 12 टन उत्पादन मिळते.
- पुसा सावनी- आय ए आर आय यांनी विकसित केलेली ही जात आहे. भेंडी ची लांबी 10 ते 15 सेंटिमीटर असते तसेच फळ हे हिरवे गार व मुलायम असते. झाडावर काटेरी लव देठावर तांबूस छटा फुले पिवळी व प्रत्येक पाकळीवर पिवळा ठिपका तसेच सुरुवातीला यलो मोझॅक व्हायरस रोगास प्रतिकारक होती परंतु सध्या व्हायरस रोगासबळी पडते. जातीपासून हेक्टरी आठ ते दहा टन उत्पादन मिळते.
- परभणी क्रांती- वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ यांनी ही जात विकसित केली आहे. फळे सात ते दहा सेंटिमीटर लांब असतात तसेच रंगाने हिरवेगार असते. या जातीची भेंडी पुसा सावनी जातीपेक्षा कणखर व व्हायरस रोग प्रतिकारक असते.
- येणारी फळे ही नाजूक तजेलदार व हिरवीगार असतात. लागवड केल्यापासून पंचावन्न दिवसांमध्ये पहिला तोडा सुरू होतो. उन्हाळ्यात 14 ते 16 थोडे तर खरिपात 20 तोडे मिळतात. हेक्टरी सात ते आठ टन उत्पादन मिळते.
- अर्का अनामिका- या जातीचे झाड उंच वाढते तसेच फळे लांब व कोवळी तसंच हिरवीगार असतात. फळांचे देठ लांब असते. ही जात व्हायरस रोगास प्रतिकारक असून फळे तोडण्यास सोईस्कर आहे.या जातीपासून हेक्टरी नऊ ते बारा टन उत्पादन मिळते.
Published on: 14 February 2022, 04:21 IST