Agripedia

शेतकर्यासह स्वाभिमानी चे विनायक सरनाईक करणार बेमुदत ठिय्या.

Updated on 13 January, 2022 12:28 PM IST

चिखली-

काहि महिण्यापुर्वी जोरदार अतिवृष्टी झाल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांचे पिकांचे अतोनात नुकसान झाले होते.परंतु नुकसान होवुनही आजही अनेक शेतकरी पिक विमा योजनेपासुन वंचीत असल्याने पिक विम्या संदर्भात दाखल केलेल्या तक्रारीचा निपटारा करण्यात यावा,उर्वरीत व कमी रक्कम मिळालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर विमा रक्कम जमा करण्यात यावी, अशी मागणी स्वाभिमानी चे विनायक सरनाईक यांनी शेतकऱ्यांसह तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे दि०५जानेवारी रोजी केली आहे.परंतु आठ दिवस उलटुनही विमा कंपनी व कृषी विभागाकडुन ठोस पावले उचलण्यात आले नसल्याने आज दि 13जानेवारी पासुन शेतकर्यासह स्वाभिमानी तालुका कृषी कार्यालया समोर बेमुदत आंदोलन छेडणार आहे. 

तालुक्यातील शेतकर्याचे अतिवृष्टि मुसळधार पावसामुळे नदिकाठच्या शेतजमीनी पिकासह पुराच्या पाण्याने खरडुन गेल्या होत्या शेतात पाणीच पाणी साचल्याने उडीद,मुंग,तुर त्याचप्रमाणे सततधार पावसामुळे उभ्या सोयाबीन पिकास कोंब फुटल्याने अतोनात नुकसान झाले होते.हि परीस्थीती लक्षात घेता प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप 2020-21अंतर्गत काढणी पश्चात व हंगामातील प्रतिकुल परीस्थीती यामुळे नुकसान झालेल्यांसाठी शासनाकडुन पिक विमा मंजुर करण्यात आला होता हजारो शेतकर्याच्या खात्यावर विमा रक्कम मिळाली परंतु आजही चिखली तालुक्यातील अनेक शेतकरी विम्या पासुन वंचीत आहेत.काहिंना प्रमियम पेक्षा कमी रक्कम मिळाली आहे,नुकसानीची तक्रार सादर केली परंतु पैसे खात्यावर जमा न होणे,अनेकांना सोयाबीन,उडीद,मुंग,तुर असा विमा काढला त्यांना एकाच पिकाचा विमा देण्यात आला,अर्ज करताना पासबुक,आधार कार्ड सोबत जोडले असतांना अकाउंट नंबर आय एफ एस सी कोड चुकले असतांना त्या शेतकर्याच्या नावासमोर यादीमधे पैसे पेड दाखवण्यात आले आहे.

सात बारा तृटी दाखवुन पैशास रोख लावने, नदिकाठच्या शेतकर्याचे अतोनात नूकसान होऊन देखील कमी पीक विमा रक्कम मिळणे यासह विविध प्रकारच्या असंख्य तक्रारी शेतकर्याकडुन प्राप्त होत असल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विनायक सरनाईक यांच्यासह तालुका कृषी कार्यालय गाठुन शेतकरी व स्वाभिमानीने तालुका कृषी अधिकारी श्री अमोल शिंदे यांच्याकडे पिक विमा समस्यांचा पाढा वाचत पिक विमा कंपनी विरोधात कर्तव्यात कसुर केल्या प्रकरणी तक्रार देण्यात आली होती.तर तालुक्यातील शेतकर्याच्या केलेल्या तक्रारीचा निपटारा आठ दिवसात करण्यात यावा,उर्वरीत व कमी रक्कम मिळालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर पिक विमा रक्कम जमा करावी,

शासन नियमांची अमलबजावनी न करणे,शेतकऱ्यांना वेठीस धरीत हेळसांड करणे,व प्रिमीयम पेक्षा कमी रक्कम देत फसवणुक करणे,व प्रशासनास वेळोवेळी दिशाभुल व चुकीची माहिती विमा कंपनीकडुन मिळत असल्याने विमा कंपनीवर शेतकर्याचे पैसे देण्याची जबाबदारी फिक्स करुण गुन्हे दाखल करण्यात यावे,अशी मागणी करण्यात आली होती

परंतु आठ दिवसांचा कालावधी उलटुन देखील विमा कंपनी कडुन पिक विमा रक्कम अदा करण्यात आली नसल्याने व प्रमुख मागण्यांची दखल घेतली नसल्याने आज दि13जानेवारी पासुन कृषी कार्यालयासमोर शेतकर्यासह स्वाभिमानी बेमूदत ठिय्या आंदोलनास सुरुवात करणार आहे.

 

कोविड निर्देशांचे पालन करुण आंदोलन.

शेतकर्यासह स्वाभिमानी कडुन पिक विमा प्रश्नावर आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता.तर कोविड निर्देश प्राप्त झाल्याचे समोर करुण आंदोलन स्थगीत करण्याचे पत्र कृषी विभाग यांच्याकडुन सरनाईक यांना देण्यात आले आहे.परंतु शेतकरी हित महत्वाचे असल्याने व विमा कंपनी कडुन शेतकर्याची फसवणुक झाल्याने कोविड निर्देशांचे पालन करीत आंदोलन करणार असल्याचे सरनाईक यांनी सांगीतले.

 

प्रतिनिधी गोपाल उगले

English Summary: For Pik vima farmer's payment Swabhimanis andolan
Published on: 13 January 2022, 12:28 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)