Agripedia

महाराष्ट्र सर्वात मोठे कांदा उत्पादक राज्यांच्या यादीत नेहमीच अव्वलस्थानी असते. महाराष्ट्रातील पश्चिम महाराष्ट्र, खांदेश समवेत इतर भागात कांद्याची लागवड आपणांस पाहायला मिळते. पण यावर्षी कांदा समवेत इतर अनेक पिकांवर आसमानी संकटाचे काळोख पसरले आहे, आसमानी संकटामुळे सर्वात जास्त कांदा उत्पादक शेतकरी हैराण झाला आहे.

Updated on 09 December, 2021 5:53 PM IST

महाराष्ट्र सर्वात मोठे कांदा उत्पादक राज्यांच्या यादीत नेहमीच अव्वलस्थानी असते. महाराष्ट्रातील पश्चिम महाराष्ट्र, खांदेश समवेत इतर भागात कांद्याची लागवड आपणांस पाहायला मिळते. पण यावर्षी कांदा समवेत इतर अनेक पिकांवर आसमानी संकटाचे काळोख पसरले आहे, आसमानी संकटामुळे सर्वात जास्त कांदा उत्पादक शेतकरी हैराण झाला आहे.

खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे खान्देश प्रांतातील कांद्याच्या रोपवाटिका तसेच लावलेला कांदा पूर्णतः क्षतीग्रस्त झाला होता, खरीप हंगामात राज्यातील इतर भागात देखील काहीसे असेच चित्र बघायला मिळाले होते. अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील आगात लाल कांद्याचे पीक शेतकऱ्यांच्या हातून गेले. म्हणुन शेतकरी राजा आता रब्बी हंगामातील रांगड्या कांद्याकडे म्हणजे पसात लाल कांद्याच्या पिकांकडे मोठ्या आशेने बघत आहे आणि खरीप हंगामतील कसर तो ह्या पसात लाल कांद्यातून काढू पाहत आहे, पण कांदा पिकाला ह्या हंगामात देखील अवकाळी पावसाचा व त्यामुळे बदललेल्या हवामानाचा फटका बसताना दिसत आहे. अवकाळी मुळे रब्बी हंगामातील कांद्यावर अनेक रोग व किडिंचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. त्यामुळे कांदा पिकाचे योग्य व्यवस्थापन करणे गरजेचे ठरणार आहे. यासाठी कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कृषी वैज्ञानिकांनी काही सूचना देखील केल्या आहेत, त्या आज आपण जाणुन घेऊया.

कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी सल्ला

»मित्रांनो कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी पावसाने उघडीप देताच फवारणी करू नये, पावसाचा अंदाज बघून फवारणी करावी. फवारणी केली आणि लागलीच पाण्याने हजेरी लावली तर महागडे औषध वाया जाईल, शिवाय त्यासाठी आलेले श्रम देखील वाया जाईल. तसेच पाऊस चालू असताना देखील फवारणी करू नये. पाणी वावरात साचलेले असताना देखील फवारणी करणे टाळावे कारण की जमिनीत पाणी असताना औषध फवारणी केली तर त्या फवारणीचा पिकावर कुठलाच परिणाम होत नाही.

»कांदा हे एक नगदी पीक आहे, ह्या पिकासाठी योग्य व्यवस्थापन करण्याची आवश्यकता असते. हे एक अल्पकालावधीत काढणीला येणारे पीक आहे त्यामुळे याचे व्यवस्थापन करणे महत्वाचे ठरते. जर कांदा पिकावर रोगाने हल्ला केला तर याचा परिणाम उत्पादनावर पडतो.

त्यामुळे कांदा पिकावर बुरशीजनीत रोग दिसल्यास लवकरात लवकर बुरशीनाशक औषधंची फवारणी करावी. बुरशीनाशक हे लिक्विड फॉर्ममधलेच फवारावे याचा लवकर रिजल्ट मिळत असल्याचे वैज्ञानिक सांगतात.

»कांदा लागवड करून जर दोन महिने झाले असतील तर ह्या स्थितीतील कांद्यावर अडेक्सर बुरशीनाशक प्रभावी काम करेल असे वैज्ञानिक सांगत आहेत.

»बीएसएफचे ऑपेरा हे बुरशीनाशक देखील कांद्यासाठी प्रभावी ठरणार आहे. हे औषध 15 लिटर पंपासाठी 30 मिली ह्या प्रमाणात घ्यावे लागते. हे मिश्रण एक एकर कांद्याच्या पिकासाठी पुरेसे असते.

English Summary: for more profit importance tips for onion productive farmer
Published on: 09 December 2021, 05:53 IST