Agripedia

सूर्यफूल हे तेलवर्गीय प्रकारातील मुख्य पीक आहे. सूर्यफुलाची लागवड ही तीनही हंगामात करता येते. महाराष्ट्राच्या बऱ्याच भागांमध्ये सूर्यफूल लागवड करतात. सूर्यफूल लागवडीसाठी तापमानाचा विचार केला तर कमीत कमी आठ ते दहा अंश सेल्सिअस तापमान तर जास्तीत जास्त 40 अंश सेल्सिअस असेल तऱीही चांगल्या प्रकारे येते

Updated on 27 November, 2021 8:34 PM IST

सूर्यफूल हे तेलवर्गीय प्रकारातील मुख्य पीक आहे. सूर्यफुलाची लागवड ही तीनही हंगामात करता येते. महाराष्ट्राच्या बऱ्याच भागांमध्ये सूर्यफूल लागवड करतात. सूर्यफूल लागवडीसाठी तापमानाचा विचार केला तर   कमीत कमी आठ ते दहा अंश सेल्सिअस तापमान तर जास्तीत जास्त 40 अंश सेल्सिअस असेल तऱीही चांगल्या प्रकारे येते

बी. एस. एच.1-

  • हे वान 85 दिवसांत काढणीस येते.
  • यामध्ये तेलाचे प्रमाण 41 टक्के असते.
  • या वाणाची शिफारस संपूर्ण भारतात करण्यात आले आहे.
  • एव्हाना अधिक उत्पादन देणारे असून तांबेरा व केवडा रोगास प्रतिकारक आहे.

एल. एस. एच.-3

  • हा वान पंचाण्णव दिवसात काढणीस येतो.
  • यामध्ये तेलाचे प्रमाण 39 टक्के आहे.
  • महाराष्ट्रासाठी शिफारसीत
  • हा वाण केवडा रोगास प्रतिकारक आहे.

के. बी. एस. एच.-1

  • या वानाचा काढणीस येण्याचा कालावधी 90 दिवसांचा आहे.
  • तेलाचे प्रमाण 48 टक्के असते.
  • लागवडीसाठी संपूर्ण भारतात शिफारस आहे.
  • या वानापासून अधिक उत्पादन मिळते.

पी. के. व्ही. एस. एच.-27

  • याचा काढणीचा कालावधी हा 85 ते 90 दिवसांचा आहे.

2-यामध्ये तेलाचे प्रमाण 39 टक्के आहे.

3-विदर्भासाठी शिफारस केलेला वाण

4-केवडा रोगास मध्यम प्रतिकारक आहे.

 के.. एस. एच.-44

  • काढणीचा कालावधी हा 95 98 दिवसांचा आहे.
  • यामध्ये तेलाचे प्रमाण 36 ते 38 टक्के असते.
  • संपूर्ण भारतात लागवडीसाठी शिफारस केलेला वान
  • केवडा रोगास प्रतिकारक

एल. एस. एफ. एच.-35( मारुति)-

  • काढणीचा कालावधी मध्यम असतो.
  • तेलाचे प्रमाण 39 ते 41 टक्‍क्‍यांपर्यंत असते.
  • महाराष्ट्रासाठी शिफारस केलेलावाण
  • हा वाण केवडा रोगास प्रतिकारक आहे.

फुले रविराज

  • याचा कालावधी हा 90 ते 95 दिवसांचा.
  • तेलाचे प्रमाण 34 टक्‍क्‍यांपर्यंत असते.
  • पश्चिम महाराष्ट्रासाठी शिफारशीत
  • नेक्रोसिस,ठीपका या रोगास प्रतिकारक
English Summary: for more production of sunflower crop cultivate this hybrid veriety
Published on: 27 November 2021, 08:34 IST