झेंडू हे फक्त राज्यात नव्हे तर संपूर्ण देशात महत्वाचे फुल पिक आहे. या फुलांचा उपयोग फुलांच्या माळा करणे,व्यासपीठ सजवणे इत्यादीसाठी मोठ्या प्रमाणावर केला जातो. याशिवाय निरनिराळ्या पुष्प रचनेमध्ये, बगीच्यामध्ये, रस्त्यालगत तसेच कुंड्यांमध्ये देखील लागवड केली जातेव त्यास मोठ्या प्रमाणावर मागणी असते.
झेंडू चा उपयोग मुख्यत्वेकरून सुट्ट्या फुलांसाठी केला जातो. या लेखात आपण चांगले उत्पादन देणाऱ्या झेंडूच्या जाती विषयी माहिती करून घेऊ.
झेंडूच्या चांगले उत्पादन देणाऱ्या जाती
झेंडूच्या आफ्रिकन आणि फ्रेंच असे दोन प्रकार पडतात.
- आफ्रिकनझेंडू:1) क्रॅकर जॅक, आफ्रिकन टॉल डबल मिक्स, येलो सुप्रीम,गियाना गोल्ड, स्पेन गोल्ड, हवाई,आलास्का, आफ्रिकन डबल ऑरेंज, सनजायन्ट
- फ्रेंच झेंडू: स्पे, बटर बॉल, फ्लॅश, लेमन ड्रॉप्स,फ्रेंच डबल मिक्स
- फ्रेंच हायब्रीड: पेटिट, जिप्सी, हार्मनी हायब्रीड, रेड हेड,कलर मॅजिक,क्वीन सोफी, हार बेस्टमुन
- झेंडूच्या प्रचलित जाती: मखमली, गेंदा आणि गेंदा डबल
झेंडूच्या सुधारित संकरित जाती
- पुसा नारंगी( क्रॅकर जॅक जर गोल्डन जुबिली)- या जातीस लागवडीनंतर 123 ते 136 दिवसानंतर फुले येतात.झुडूप 73 सेंटिमीटर उंच वाढते व वाढ देखील जोमदार असते. फुले नारंगी रंगाची व सात ते आठ सेंटीमीटर व्यासाचे असतात. हेक्टरी उत्पादन 35 मेट्रिक टन याप्रमाणे येते.
- पुसा बसंती( गोल्डन येलो जर्सनजायन्ट)- या जातीस 135 ते 145 दिवसात फुले येतात. झुडूप 59 सेंटिमीटर उंच व जोमदार वाढते. फुले पिवळ्या रंगाची असून सहा ते नऊ सेंटीमीटर व्यासाची असतात. प्रत्येक झुडूप सरासरी 58 फुले देते. कुंडीत लागवड करण्यासाठी ही जात जास्त योग्य आहे.
- एमडीयू 1- झुडपे मध्यम उंचीचे असतात.उंची 65 सेंटी मीटर पर्यंत वाढते. या झुडूपा सरासरी 97 फुले येतात व 41 ते 45 मेट्रिक टन प्रति हेक्टर याप्रमाणे उत्पादन येते. फुलांचा रंग नारंगी असतो व 7 सेंटीमीटर व्यासाचे असतात.
Published on: 12 December 2021, 09:19 IST