Agripedia

बीजप्रक्रियेमुळे हवेतील नत्र जमिनीत स्थिर केले जात असल्यामुळे जमिनीला दिल्या जाणार्‍या

Updated on 02 May, 2022 10:13 AM IST

बीजप्रक्रियेमुळे हवेतील नत्र जमिनीत स्थिर केले जात असल्यामुळे जमिनीला दिल्या जाणार्‍या रासायनिक खतांची मात्रा कमी द्यावी लागते.जैविक खत बीजप्रक्रियेमुळे जमिनीचे, पाण्याचे, तसेच हवेचे कोणत्याही प्रकारे प्रदूषण होत नाही.

स्फुरद विरघळविणारे जिवाणू पिकांना अनुपलब्ध असलेले स्फुरद पिकांना उपलब्ध करून देतात.जैविक खतांची बीजप्रक्रिया केल्यास पिकांची उगवणक्षमता वाढते तशीच पिकांची जोमदार वाढ होते.जैविक खतांची बीजप्रक्रिया केल्यामुळे जमीन सतत जिवंत म्हणजेच त्यापासून अधिक उत्पादकता किंवा उत्पन्न मिळविणे शक्य होते.

वेगवेगळ्या खरीप पिकांसाठी जैविक खत बीजप्रक्रिया :-

1)स्फुरद विरघळविणारे जिवाणू खत बीजप्रक्रिया : स्फुरद विरघळविणारे जिवाणू खत बीजप्रक्रिया खरिपातील सर्व पिकांसाठी उपयुक्त अशी बीजप्रक्रिया आहे.

2)रायझोबियम जिवाणू खत बीजप्रक्रिया : रायझोबियम हे जिवाणू शिंबीवर्गीय वनस्पतींच्या मुळांच्या गाठीत सहजीवी पद्धतीने नत्र स्थिरीकरण करण्याचे कार्य करतात. 

उदा. सर्व डाळवर्गीय वनस्पती पिके, द्विदल वर्ग पिके.

3)अ‍ॅझोटोबॅक्टर / अझेस्पिलीयम जिवाणू खत बीजप्रक्रिया : अ‍ॅझोटोबॅक्टर हे जिवाणू एकदल वनस्पतींच्या मुळाभोवती असहजीवी पद्धतीचे नत्र स्थिरीकरण करण्याचे कार्य करतात. 

उदा. एकदल वर्ग पिके - कापूस, ज्वारी, मका, बाजरी, ऊस इत्यादी.

अझोस्पिरिलियन हे ही जिवाणू एकदल वनस्पतींच्या मुळांवर राहून नत्र स्थिरीकरण करण्याचे कार्य करतात. उदा. ऊस, गवतवर्गीय पिके इत्यादी.

बीजप्रक्रियेसाठी आवश्यक साहित्य :-रायझोबियम/ अ‍ॅझोटोबॅक्टर / अझोस्पिरिलियम / पी.एस.बी. यांचे विकत आणलेले पाकीट, गूळ, पातेले, प्लॅस्टिक ट्रे, स्टोव्ह, पाणी, कागदी पेपर इ.

प्रत्यक्ष कृती :-

1)बीजप्रक्रियेसाठी आवश्यक असलेल्या सर्व वस्तूंची जमवाजमव केल्यानंतर सर्वप्रथम स्टोव्हवर पातेले ठेवून त्यामध्ये 250 मिली लिटर पाणी टाकून त्यामध्ये 125 ग्रॅम गूळ टाकावा व हे द्रावण गूळ चांगला विरघळेपर्यंत उकळून घ्यावे व थोडा वेळ थंड करण्यासाठी ठेवावे.

2)थंड झालेल्या पातेल्यात 250 ग्रॅम रायझोबियम किंवा अ‍ॅझोटोबॅक्टर किंवा अझोस्पिरीलियम + 250 ग्रॅम पी. एस. बी. टाकून हे द्रावण लाकडी काडीच्या साहाय्याने योग्य रीतीने ढवळून घ्यावे.

3)नंतर प्लॅस्टिक ट्रे-मध्ये 10 किलो बियाणे घ्यावे व या बियाणांवर तयार केलेले द्रावण हाताने शिंपडून घ्यावे व नंतर दोन्ही हातांनी सर्व बियाणे अशा पद्धतीने चोळावे की सर्व बियांवर लेप आलेला असेल.

3)नंतर प्लॅस्टिक ट्रे-मध्ये 10 किलो बियाणे घ्यावे व या बियाणांवर तयार केलेले द्रावण हाताने शिंपडून घ्यावे व नंतर दोन्ही हातांनी सर्व बियाणे अशा पद्धतीने चोळावे की सर्व बियांवर लेप आलेला असेल.
4)प्रत्येक बी योग्य प्रकारे द्रावणाचा लेप आल्यानंतर हे बियाणे सुकण्यासाठी सावलीत कागदाच्या पेपरवर 15 मिनिटे टाकावे व सुकल्यानंतर याचा वापर पेरणीसाठी करावा.
 
विविध पिकांमधील नत्र स्थिरीकरणाचे निष्कर्ष प्रति हेक्टरी
1) बरसीम 200 - 250 किलो नत्र /हेक्टरी
2) लसूण घास 200-250 किलो नत्र / हेक्टरी
3) चवळी 40-50 किलो नत्र / हेक्टरी
4) मूग 35-40 किलो नत्र / हेक्टरी
5) तूर 60-70 किलो नत्र / हेक्टरी
6) ज्वारी, बाजरी, मका 15-35 किलो नत्र / हेक्टरी
7) सर्व पिकांसाठी स्फुरद 30-35 किलो नत्र / हेक्टरी
विरघळविणारे जिवाणू (पी.एस.बी.)
English Summary: For kharif crops bio fertilizer seed treatment is important
Published on: 02 May 2022, 10:06 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)