. परिपूर्ण आहारामुळे मानवी शरीराचे सर्वांगीण पोषण होऊन व्यक्ती सभोवतालच्या वातावरणाशी एकरूप होण्यास सक्षम बनतात. त्याचप्रमाणे अन्नद्रव्यांच्या संतुलित पुरवठ्यामुळे वनस्पतींची वाढ जोमदार होऊन सभोवतालच्या वातावरणात नेटाने उभे राहण्याचे सामर्थ्य त्यांना प्राप्त होते. कीड व रोगांना प्रतिकार करण्याची क्षमता प्राप्त होते व जरी एखाद्या रोगाचा प्रादुर्भाव झालाच तर त्यातुन लवकर बरे होण्याची ताकत झाडास मिळते. त्यामुळे पिकाची कीड-रोग प्रतिकारक क्षमता आपण कशी वाढवू शकतो व त्यासाठी कोणकोणती खते वापरण्यासाठी योग्य आहेत हे जाणून घेऊयात.
वनस्पतींही रोगप्रतिकारक क्षमता कमी असल्यास आजारी पडु शकतात.कृषी उद्योगात,सर्व पिकापैकी सुमारे 20 टक्के पिक रोगामुळे नष्ट होण्याची शक्यता असते.म्हणूनच पीक संरक्षणा पद्धती सोबत पिकाची रोगप्रतिकारक क्षमता वाढवणेही तितकेच महत्वाचे.
जेव्हा मानवी शरीरात रोगांचा सामना होतो, तेव्हा आपली रोगप्रतिकारक शक्ती त्या रोगांना प्रतिसाद देते.मुळात, मानवी शरीराची अनेक अंतर्गत कार्ये शरीराबाहेरुन आलेला दूषित पदार्थ बाहेर काढण्यासाठी एकत्रित होतात आणि तीच पद्धत वापरून भविष्यात पुन्हा त्या रोगाशी पुन्हा सामना झाल्यास शरीरामध्ये प्रतिकारशक्ती निर्माण होते. झाडे सुद्धा काहीसे अश्याच प्रकारात काम करतात.
मानवी रोगप्रतिकारक प्रणाली "अनुकूल" असताना - म्हणजे भूतकाळातील रोगांची आठवण ठेवू शकतात पण वनस्पती रोगप्रतिकारक प्रणाली मागे येऊन गेलेल्या रोगास दिलेली प्रतिक्रिया/रोगांशी मागील संवाद लक्षात ठेवण्यास सक्षम नसतात.
मानवी रोगप्रतिकारक शक्तीच्या विपरीत, वनस्पतीमध्ये भूतकाळात येऊन गेलेल्या रोगावर पुन्हा मात करण्यासाठी नवीन विशेष पेशी विकसित होत नाहीत.
अर्थात, झाडे रोग प्रतिकार दर्शवतात,परंतु साधारणपणे, विशिष्ट रोगांप्रती प्रतिकार विकसित करत नाहीत जसे की मानवी शरीरामध्ये घडते.
तर वनस्पती रोगाचा प्रतिकार कसा करतात?
साधारणपणे, जेव्हा एखादी वनस्पती एखाद्या रोगाला प्रतिकार दर्शवते, जसे की बॅक्टेरिया, बुरशी, विषाणू, ओमायसीट, नेमाटोड किंवा कीटक, वनस्पतीकडे आधीपासून त्याविषयी थोड्याफार प्रमाणात अनुवांशिक माहिती असते जी दिलेल्या रोगजनकाचा प्रतिकार करण्यास सांगते.
सर्वसाधारणपणे,झाडे आपल्या पेशीभित्तिका मजबूत करून रोगाचा प्रतिकार करतात आणि पृष्ठभागावर रिसेप्टर्स रोपाला सतर्क करून,संरक्षण करण्याची तयारी करतात .
एखाद्या वनस्पतीला पुरेशी पोषकतत्वे मिळतात,तेव्हा ते रोगजनकांशी लढण्यासाठी अधिक सुसज्ज होते.कुपोषित असताना मानवी शरीर जसे उत्तम प्रकारे कार्य करत नाही त्याच पद्धतीने,पोषक तत्वांच्या कमतरतेमुळे वनस्पतींची अंतर्गत प्रणाली आणि रोगप्रतिकारक प्रतिसाद खालावतो.
कोणकोणती अन्नद्रव्ये/खते पिकाची कीड-रोग प्रतिकारक क्षमता वाढवतात?:-
पालाश:-
वनस्पतीच्या जैविक क्रियेत पालाश महत्त्वाचे कार्य बजावते. पालाशमुळे वनस्पतींच्या सालींना, खोडांना, तसेच पानांना कणखरपणा येतो त्यामुळे पीक जमिनावर न लोळता, जोमाने उभे रहाते. पोटॅशियमच्या कमतरतेमुळे केळी पिकावर फयुजारियम विल्ट हा रोग होतो. आंबा, पपई, पेरू, सिताफळ इत्यादिंच्या पानातील शिरांच्या मध्ये पिवळे चट्टे दिसतात. द्राक्षाचे घड लहान व घट्ट होतात. घड उशिरा तयार होतात. मणीएकसारखे पिकत नाहीत. डाळींबाच्या फळांचा रंग फिक्का पडतो. टोमॅटोमध्ये बॅक्टेरियल ब्लाईट हा रोग वाढतो.पोटॅशियम युक्त खतांचा समतोल ठेवल्यास पीक, रोग आणि किडींना बळी पडत नाही. जमिनीतील कमी प्रमाणात उपलब्ध असलेला ओलावा, क्षारयुक्तता, जास्त थंड आणि ढगाळ हवामान अशा विपरीत परिस्थितीमध्ये सुध्दा पीक कणखरपणे उभे राहून, अधिकाधिक उत्पादनाचा टप्पा गाठण्यासाठी पालाश या अन्नद्रव्यास अनन्यसाधारण असे महत्त्व आहे.
तर पालाश आपण पिकास पोटॅशियम नायट्रेट,पोटॅशियम सल्फेट, MOP अश्या विविध प्रकारातून पिकास उपलब्ध करून देऊ शकतो तसेच 0:0:50,0:52:34,13:0:45 यांसारख्या खतातून पानाद्वारे पिकास पुरवून पिका रोगास बळी पडन्यापासून रोखू शकतो. वातावरणामध्ये मुक्त असलेले पोटॅशियम पिकास मूळाद्वारे देण्यासाठी पोटॅशियम विरघळवणारे जिवानू(KSB) यांची बीज प्रक्रिया करू शकतो. त्यामुळे अतिरिक्त पोटॅशियम देण्याची जास्त गरज भासत नाही.
कॅल्शियम व सल्फर:-रोपामधील कॅल्शियम घटकांचे मुबलक प्रमाण टोमॅटो-कलिंगडामध्ये येणारा ब्लॉसम एन्ड रॉट,गाजरामध्ये येणाऱ्या कॅविटी स्पॉट रोगांना थोपवण्यास मदत करत.
शरद बोंडे,अचलपूर
सुनील राठोड,अलिबाग
Published on: 28 September 2021, 04:12 IST