पिकांची फेरपालट करताना ती माहिती उपयुक्त ठरते. कारण एकाच कुटुंबातील पिकांच्या अन्नद्रव्याच्या गरजा समानच असतात. तसेच त्या त्या कुटुंबातील पिकांवर येणारे रोग व किडीही समानच असतात.
१) पिकांची फेरपालट व त्याचे महत्व
विशिष्ट भाजीपाला पीक व त्यास योग्य जमिनीची निवड करतांना पिकांची फेरपालट हा मुद्दा गृहीत धरावा लागतो. वनस्पतिशास्त्रा विषयक साम्याच्या आधारे भाजीपाला पिकांची कुटुंबे (families) करण्यात येतात. परिणामी या भाजीपाला कुटुंबाचा अभ्यास योग्य व परिणामकारक पीक फेरपालटीसाठी अत्यंत उपयुक्त ठरतो. आपल्याकडील भाजीपाला पिकांचा समावेश खालील चार भाजीपाला कुटुंबामध्ये केला जातो.
I) Crucifers or Brassicaceae (ब्रासीकाई )
हे कोबी व मोहरीवर्गीय कुटुंब आहे. कोबी, मुळा, मोहरी, ब्रोकोली, फुलकोबी, ब्रुसेल्स स्प्राऊट्स, बॉक चॅाय , चायनीज कॅबेज इत्यादी पिकांचा समावेश होतो. ही रब्बी हंगामातील पिके आहेत.
II) Solanaceous (Solanaceae) सोलॅनेसी
यामध्ये टोमॅटो, मिरची, ढोबळी मिरची, वांगी, पांढरा बटाटा, लाल बटाटा, तंबाखू, पिटयुनिया इत्यादी पिकांचा समावेश होतो. एकाच ठिकाणी सोलॅनेसी पिकांची लागवड सतत केल्यास व्हर्टिसिलियम फ्युझेरियम यासारख्या बुरशी मातीत तयार होतात.
III) Legumes (Leguminosae or Fabaceae) लेग्युमिनस
सोयाबिन वाटाणा/मटार वर्गीय पिके इत्यादी पिकांचा समावेश होतो. पुढील पिकांकरिता मातीत नत्राचा साठा करणारी पिके म्हणून ही ओळखली जातात.
IV) Cucurbits (Cucurbutaceae)कुकुरबिट्स्
यामध्ये काकडी, स्क़्वॅश,भोपळा, कलिंगड, खरबूज, कारली, दोडका, दुधी यांचा समावेश होतो.
पिकांची निवड करताना या प्रमुख चार भाजीपाला कुटुंबांचा संदर्भ वापरावा लागतो. सलग, एकाच शेतात किंवा वावरात एकाच कुटुंबातील पिकांची लागवड टाळावी. चार वर्ष, चार भाजीपाला कुटुंबातील पिकांची फेरपालट खूप फायदेशीर ठरते. त्यामुळे पिकांकरिता जमिनीतील अन्नद्रव्यांची उपलब्धता वाढते तसेच रोग व किडींचे प्रमाणही खूपच कमी होते त्यामुळे उत्पादनात वाढ होतेच.
ऊस, हळद, केळी यासारख्या पीकांनंतर भाजीपाला पिकांची लागवड ही विशेष फायद्याची ठरते तसेच भाजीपाला पीकांमुळे पुढील ऊस पीकांचे उत्पादनही लक्षणियरीत्या वाढते.
पीक फेरपालटीचे फायदे -
पीक फेरपालट ही एक प्राचीन कृषी पद्धती आहे. वर्षानुवर्षे प्रत्यक्ष अभ्यासाने यात बदल होत आलेले आहेत.
१) जमिनीची सुपीकता वाढते
विशिष्ट पीक हे जमिनीत विशिष्ट प्रकारची तत्वे सोडतात. तर काही विशिष्ट प्रकारची अन्नद्रव्ये शोषतात. त्यामुळे पिकांच्या फेरपालटाने जमिनीतील या पोषक तत्वांचे संतुलन होते व जमिनीची सुपिकता वाढते
२) पीकांचे उत्पादन वाढते:
फेरपालटीमुळे जमिनीतील न वापर झालेल्या अन्नद्रव्यांचा, साधनांचा वापर होतो व पीकांचे उत्पादन वाढते.
३) मातीच्या पोषक तत्वांमध्ये वाढ होते:
विशिष्ट पीकांमुळे मातीतील विशिष्ट प्रकारचे जिवाणू समृद्ध होत असतात त्यामुळे मातीच्या पोषक तत्वांमध्ये वाढ होते त्यामुळे माती सुपीक व संतुलित बनते.
४) रोग व कीडींना आळा बसतो:
फेरपालटीने रोग व कीड यांचा जीवन क्रम थांबतो. त्यांचे निवासस्थान नसल्याने त्यांची पुढील पिढी बंद होते. रोग व किडे पुढील पीकांत संक्रमित होण्याचा धोका टळतो.
५) मातीच्या संरचनेत सुधारणा होते.
पीक फेरपालटीने मातीच्या संरचनेत ही लक्षणीय सुधारणा होऊन परिणामी उत्पादनात वाढ झालेली आपणास दिसून येते.
याप्रकारे पिकांचे नियोजन केल्यास, शेतीमधून नक्कीच जास्तीतजास्त उत्पन्न घेता येईल, पुढच्या भागात शेत जमिनीची मशागत यावर माहिती देण्यात येईल, फायद्याच्या शेतीचे ही सूत्रे शेतकरी बंधूंनी जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोहोचवावी. तसेच शेती संबंधित कोणत्याही अडचणीसाठी किवां अधिक माहितीसाठी कृपया खालील नंबरवर आजच फोन करा
प्रविराम
मोबाईल नंबर-: 7030438388
Published on: 09 April 2022, 04:25 IST