सध्या शेतीमध्ये रासायनिक खतांचा बेसुमार वापर होत आहे.त्याचा अनिष्ट परिणाम हा जमिनीवर होताना दिसत आहे. त्यामुळे आता बर्याचश्या शेतकऱ्यांचा कल आता सेंद्रिय शेतीकडे वळताना दिसत आहे. आपल्याला माहिती आहेच की सेंद्रिय शेतीमध्ये गांडूळाला फार महत्व आहे. उपयुक्त अशा गांडूळ पासून वर्मी कंपोस्ट आणि वर्मी वाश असे दोन उपयुक्त घटक मिळतात.वर्मी कंपोस्ट हे गांडूळाच्या विष्टे पासून मिळते.
गांडूळाचे महत्त्वाचे एक वैशिष्ट्य आहे की, गांडूळ आने खाल्लेल्या सेंद्रिय घटकांपैकी आपल्या पोषणासाठी केवळ दहा टक्के भाग वापरतो. बाकीचा भाग विष्टे द्वारे शरीराबाहेर टाकतो.त्यालाच आपण वर्मी कंपोस्ट किंवा गांडूळ खत असे म्हणतात.गांडूळ यापासूनच वर्मी वाश देखील मिळते.यामध्ये मुख्य अन्नद्रव्यांसोबत सूक्ष्म अन्नद्रव्ये देखील मोठ्या प्रमाणात आढळतात. त्यामुळे पिकांची रोगप्रतिकारक क्षमता वाढून उत्पादकता वाढते.
वर्मी वाश तयार करण्याची पद्धत
साहित्य
एक लहान आकाराचा एक मोठ्या आकाराचा मातीचा माठ,
माठ ठेवण्यासाठी एक तीपाई आवश्यक,
अर्धवट कुजलेले शेणखत आता बरोबर उपलब्ध असलेले सेंद्रिय पदार्थ जसे की कुजलेला पालापाचोळा कचरा इत्यादी,
गिरीपुष्प, लुसर्न घास आणि कडुलिंबाचा कोवळा पाला
तयार व्हर्मीवॉश जमा करण्यासाठी एक चिनी मातीचे भांडे किंवा काचेचे भांडे टीप-धातूची भांडी वापरू नये.
चांगली पोयटा माती आणि आवश्यकतेनुसार पाणी
पूर्ण वाढ झालेली निरोगी गांडूळे एक किलो किंवा अर्धा किलो
वर्मी वाश मिळवण्याची पद्धत
1)मोठ्या माठाच्या तळाला बारीक छिद्र पाडून त्यात साध्या कापडाची किंवा कापसाची वात टाकावी. हा माठ तीपाई वर ठेवून त्यानंतर त्याच्या तळाशी जाड वाळू चार इंचापर्यंत भरावी.
२)वाळूच्या थरावर अर्धवट कुजलेले शेणखत टाकून त्यावर पाण्याचा हलका फवारा द्यावा.
३)या ओल्या झालेल्या थरावर पूर्ण वाढ झालेली किमान एक हजार निरोगी गांडुळे सोडावी.
४)हे गांडूळ शेणखत आणि सेंद्रीयखत यांच्या थरावर सोडल्यानंतर गांडूळांना खाद्य म्हणून त्यावर गिरीपुष्प,ल्युसर्न घास तसेच कडुनिंबाचा कोवळा पाला प्रत्येकी अर्धा किलो शेण स्लरीसहपसरावा.
५)मोठ्या माठातील काम पूर्ण झाल्यानंतर छोटामाठ घ्यावा. त्याचाही तळाला लहान छिद्र पाडून त्यात कापडाचीकिंवा कापसाची वात टाकावी.
त्यानंतर छोटा माठ मोठ्या माठावर ठेवून त्यात पाणी ओतावे. हे पाणी मोठ्या माठात थेंब थेंब पडत राहते.
६)तीपाईच्या खाली वर्मी वाश जमा होण्यासाठी चिनीमातीच्या अथवा काचेचे भांडे ठेवावे. पहिल्या सात दिवसात तयार झालेले पाणी पुन्हा वरील छोट्या माठात ओतावे. त्यानंतर सात दिवसांनी चिनी मातीच्या भांड्यात जमा होणारे पाणी वर्मी वाश म्हणून पिकासाठी वापरता येते.
वर्मी वाश पिकांसाठी वापरण्याची पद्धत
वर्मी वाश कोणत्याही पिकांवर फुल अवस्थेत आता फळ अवस्था वापरता येते.
Published on: 24 February 2022, 05:59 IST