Agripedia

काकडीची लागवड उन्हाळ्यात सुरुवातीला जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात आणि पावसाळ्याच्या सुरुवातीला जून-जूलै महिन्यात करतात.

Updated on 17 February, 2022 6:31 PM IST

काकडीची लागवड उन्हाळ्यात सुरुवातीला जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात आणि पावसाळ्याच्या सुरुवातीला जून-जूलै महिन्यात करतात.

 

जाती-

1) पूना खिरा- लागवडीनंतर दीड महिन्यांनी फळे काढावयास येतात.

2) हिमांगी- पूना खिरापेक्षा उत्पादन जास्त,फळांना चांगला बाजारभाव मिळतो.

3) फुले शूभांगी- केवडा रोगास प्रतिकारक,अधिक उत्पन्न देणारा वाण.

लागवड-बियाणे-2-2.5 किलो प्रती हेक्टरी

बिजप्रक्रिया-

बिया 24-48 तास ओल्या फडक्यात किंवा पोत्यात बांधून ठेवाव्यात.

बाविस्टीन 20 ग्रॅम प्रति लिटर बिजप्रक्रिया करावी.

अंतर-जातीनुसार 90 ते120 से.मी.अंतरावर टोकून करतात.

दोन वेलीतील अंतर 45-60 से.मी.असावे.

 

 काकडी फळात खत व्यवस्थापन 

काकडी ज्या जमिनीत लावली आहे त्याचे मातीपरीक्षण व त्यानुसार दिलेल्या खत (अन्नद्रव्य) मात्रा तपासुन पहाव्यात. अन्नद्रव्याची कमतरता किंवा विपुलता काकडीचे उत्पादन कमी करु शकते!

उदाहरणार्थ 80 किलो पोटॅश प्रती हेक्टरी शिफारस आहे आणि दीलेल्या पोटॅश समजा 120 किलो असेन तर फळवाढीस प्रतीकुल परिणाम होईल. म्हणुन खतांचे गणित काकडी पीकाच्या शिफारशीप्रमाणे करावे.

काकडी पिकाकरिता जमिनीतुन द्यावयाचे शेणखत प्रमाण हेक्टरी(शिफारस)

हेक्टरी 25 टन शेणखत 

काकडी पिकाकरिता जमिनीतुन द्यावयाचे रासायनिक खत प्रमाण हेक्टरी (शिफारस)

110 किलो युरिया, युरिया लागवड करताना द्यावा 

300 किलो सुपर फाँस्फेट,

80 किलो म्युरेट आँफ पोटश द्यावे.

लागवडीनंतर 30 दिवसांनी द्यावी. 

110 किलो ( युरिया-नत्राचे प्रमाण 46 %)

५% निंबोळी अर्काची १५० मिली/१५ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

काकडी पिकात खते वेलीभोवती बांगडी पद्धतीने द्यावीत आणि त्यानंतर पाणी द्यावे.

काकडीत मादी फुलांचे प्रमाण वाढविण्यासाठी

जिब्रेलीक असिड 10-25 पीपीएम किंवाबोराँन 3 पीपीएम यांच्या फवारण्या पीक दोन आणि चार पानांवर असताना कराव्यात.

काकडी फळ व्यवस्थापन 

काकडी ज्या जमिनीत लावली आहे त्याचे मातीपरीक्षण व त्यानुसार दिलेल्या खत (अन्नद्रव्य) मात्रा तपासुन पहाव्यात. अन्नद्रव्याची कमतरता किंवा विपुलता काकडीचे उत्पादन कमी करु शकते!

उदाहरणार्थ 80 किलो पोटॅश प्रती हेक्टरी शिफारस आहे आणि दीलेल्या पोटॅश समजा 120 किलो असेन तर फळवाढीस प्रतीकुल परिणाम होईल. म्हणुन खतांचे गणित काकडी पीकाच्या शिफारशीप्रमाणे करावे.

काकडीत मादी फुलांचे प्रमाण वाढविण्यासाठी

जिब्रेलीक असिड 10-25 पीपीएम किंवा 

बोराँन 3 पीपीएम यांच्या फवारण्या पीक दोन आणि चार पानांवर असताना कराव्यात.

काकडी पिकास फुले येण्‍यास सुरुवात झााल्‍यानंतर फळे उतरुन घेईपर्यंतच्‍या काळात नियमित व पुरेसे पाणी देणे महत्‍वाचे आहे. 

पाणी देण्‍यात अनियमितपणा झाल्‍यास फुलांची गळ होण्‍याची शक्‍यता असते. 

फळांची वाढ होत असतांना पाण्‍याचा ताण पडून नंतर एकदम भरपूर पाणी दिल्‍यास फळांना तडे पडतात व प्रसंगी अशी न पिकलेली फळे गळतात.

पावसाळयात पाऊस न पडल्‍यास जरुरीप्रमाणे पाणी द्यावे

फळकूज/ फळसड

हा रोग काकडी, भोपळा, कारली, घोसाळी, पडवळ आणि इतर वेलवर्गीय पिकांवर येतो. पिथिअम, फायटोप्थोरा, फ्युजारिअम, रायझोक्‍टोनिया, स्केलोरिशयम नावाच्या बुरशीमुळे फळसड होते.

उपाय - रोगाची लक्षणे दिसताच 

कॉपर ऑक्‍झिक्‍लोराइड 

किंवा मॅन्कोझेब किंवा कॅप्टन किंवा 

क्‍लोरोथॅलोनील 25 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

फळावर कापरासारखी पांढरी बुरशीची वाढ असेल तर 

मेटॅलॅक्‍झिल अधिक मॅंकोझेब (संयुक्त बुरशीनाशक) 25 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यातून फवारावे.

काकडीवरील पांढरी माशी, थ्रीप्स नियंत्रण

बीजप्रक्रिया - इमिडॅक्‍लोप्रिड 5 ग्रॅम किंवा कार्बोसल्फान 30 ग्रॅम प्रति किलो बियाणे या प्रमाणात करावी.

 

लागवडीचे वेळी शेतात निंबोळी पेंड हेक्‍टरी 400 ते 500 किलो मिसळावी. रासायनिक खतांच्या मात्रा शिफारशीप्रमाणे द्याव्यात.

 नत्रयुक्त खते जास्त प्रमाणात देऊ नयेत.

रस शोषणाऱ्या किडी आणि सूत्रकृमीच्या नियंत्रणासाठी कार्बोफ्युरान 33 किलो किंवा 

फोरेट 20 किलो प्रति हेक्‍टरी प्रत्येक रोपाभोवती रोपे उगवल्यानंतर रिंग पद्धतीने टाकून मातीने झाकावे.

लागवडीनंतर पिकावर 2-3 पाने दिसू लागताच आणि फळे येण्यापूर्वी रस शोषणाऱ्या किडींसाठी खालीलपैकी एक किंवा दोन कीटकनाशकांची फवारणी 10 ते 15 दिवसाचे अंतराने 2 ते 3 वेळा करावी. 

मिथील डिमेटॉन 10 मि. लि. किंवा 

डायमेथोएट 10 मि. लि. 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

 नवीन कीटकनाशकामध्ये प्रयोगातून परिणामकारक असलेले इमिडॅक्‍लोप्रिड 4 मि. लि. किंवा 

ट्रायऍझोफॉस 20 मि. लि. 10 लिटर पाण्यातून फवारणी 10 ते 15 दिवसांच्या अंतराने किंवा गरजेनुसार करावी.

जैविक कीटकनाशकामध्ये 

व्हर्टिसिलियम 20 ग्रॅम

10 लिटर पाणी किंवा 

निंबोळी अर्क 4 टक्के (4 किलो निंबोळी 100 लिटर पाणी) .

English Summary: For beneficial cucumber plantation and management
Published on: 17 February 2022, 06:31 IST