मत्स्य शेती हा भारतातील एक नफा देणारा व्यवसाय आहे. व्यावसायिक आणि निवासी विक्रीसाठी मासे वाढविण्याच्या उद्देशाने मत्स्य शेती कार्यरत आहेत. अनेक प्रकारचे मासे नियंत्रित वातावरणात वाढविले जाऊ शकतात, मासे काढण्यासाठी आणि त्यांना रेस्टॉरंट्समध्ये विकण्याच्या उद्देशाने मासे पिकविण्याव्यतिरिक्त, अनेक फिश फार्म देखील मजेदार ठिकाणे म्हणून काम करतात जेथे कुटूंब आणि व्यक्ती तलावातील माशांवर जाऊन स्वत: चे भोजन घेऊ शकतात.
बदलत्या धावपळीच्या जगात ताणतणाव कमी होण्यासाठी शोभिवंत वस्तूंबरोबर मत्स्यपालनाचे आकर्षण वाढत चालले आहे. त्यामुळे शोभिवंत मत्स्यपालन करणे फायद्याचे ठरत आहे. घरामधील, ऑफिसमधील शोभा वाढावी यासाठी देखील याचा वापर मोठ्या संख्येने केला जात आहे. अनेक लोक अश्या शोभिवंत माश्यांसाठी भरपूर पैसा मोजण्यास तयार असतात. ब्लॅक घोस्ट , डिस्क , फ्लॉवरहॉर्न आदी शोभिवंत माश्यांच्या जाती आहेत. अश्या शोभिवंत मत्स्यपालनाची माहिती आपण जाणून घेणार आहोत.
खनिजेही थोड्या प्रमाणात माशांपासून मिळतात. मासळीत काही महत्त्वाची जीवनसत्त्वेही असतात. कॉड, हॅलिबट, मुशी या माशांच्या यकृतापासून अ व ड जीवनसत्त्वयुक्त औषधी तेल निघते, तर आतड्यापासून ब जीवनसत्त्व मिळू शकते. मुश्यांच्या पक्षांपासून सार (सूप) करतात. मासे पचनास हलके असतात. त्यांच्या चरबीपासून रक्तवाहिन्यांतील कोलेस्टेरॉल वाढत नाही व आहारात त्यांचा समावेश केल्याने रक्तदाब कमी होतो. काही माशांच्या शरीरातील वाताशयांचा (हवेच्या पिशव्यांचा) विविध कामांसाठी उपयोग केला जातो. पाळीव जनावरांच्या आहारासाठी मत्स्यपीठ व झाडांसाठी उत्तम खतही मासळीपासून मिळते. मत्स्योद्योगात जगातील कोट्यवधी लोक गुंतले आहेत.मासे आहारात असणे चांगले आहे.
माशांध्ये गोड्या पाण्याचे मासे, खाऱ्या पाण्यातले मासे आणि दॊन्ही पाण्याचा संयोग होतो अशा नदीच्या मुखातील मासे असे प्रमुख प्रकार आहेत.
शोभिवंत मत्स्यपालनाच्या पद्धती –
सिमेंट पॉन्ड युनिट –
१. मत्स्यबीजाचे संगोपन सिमेंटच्या वेगवेगळ्या आकाराचे तळे बांधून त्यात करता येते.
२. तुम्ही ५ हजार चौ. किमी पर्यंत सिमेंट पॉन्ड युनिट बांधू शकता.
३. हे युनिट बांधण्यासाठी खर्च जरी लागत असला तरी यामध्ये संगोपन झाल्यास उत्पन्न चांगले मिळते.
४. यार्ड स्केल पेक्षा जास्त जागा तुमच्याकडे असल्यास तुम्ही याचे युनिट बांधू शकता.
इनडोर युनिट –
१. जागा नसेल तर घरातील एका खोलीमध्ये मत्स्य संवर्धन करता येते.
२. काचेच्या वेगवेगळ्या आकाराच्या टाकीमध्ये मत्स्यबीज उत्पादन करता येते.
३. जास्त किंमत मिळवून देणाऱ्या मत्स्य बियांचे संगोपन करता येते.
यार्ड स्केल युनिट –
१. घरातील अंगणामध्ये यार्ड स्केल युनिट तयार करता येते.
२. यार्ड स्केल युनिट साठी १ हजार ते २ हजार चौ. फूट जागा पुरेशी असते.
३. या युनिटमध्ये जास्त पिल्ले देणाऱ्या मत्स्य बीजाचे संगोपन करावे.
४. एन्जल , गुरामी , टेळा , गोल्डफिश यांसारख्या मध्यम किमतीच्या माश्यांचे संवर्धन करता येते.
प्लास्टिक अस्तीकरण तलाव युनिट –
१. पाण्याचा चांगला स्रोत तसेच ५ ते १० गुंठे पडीक जमीन असल्यास हे युनिट अगदी सहज उभारता येते.
२. यासाठी विरुद्ध दिशेने पाणी जावे म्हणून पाईपलाईन तयार करावी लागते.
३. तलावातील युनिटला संरक्षण मिळावे यासाठी संपूर्ण युनिटला शेड नेट करावे.
शोभिवंत माश्यांचे पिल्ले योग्य आकारात वाढल्यानंतर कार्यालय, हॉटेल येथे त्यांची विक्री केल्यास भरगोस उत्पन्न मिळण्यास मदत होते.
Published on: 10 March 2022, 04:03 IST