उसाचे एकमेव असे पीक आहे, ज्यामध्ये शेतकऱ्यांना हक्काचे चार पैसे मिळतात. तसेच या पिकाला अवकाळी आणि गारपिटीचा धोका जास्त प्रमाणावर नसतो. असे असताना आता उसाच्या नवीन जाती आल्या असून यामुळे शेतकऱ्यांचा फायदा होत आहे. फुले ११०८२ (कोएम ११०८२) हा वाण महाराष्ट्रात लागवडीसाठी अधिसूचित करण्यात आला आहे.
याचे कोसी ६७१ पेक्षा ऊस आणि साखर उत्पादन अधिक मिळते. उसातील व्यापारी शर्करा प्रमाण हे कोसी ६७१ पेक्षा किंबहुना बरोबरीत असल्याने ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये साखर कारखान्याचा साखर उतारा वाढविण्यासाठी हा वाण फायदेशीर ठरणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना देखील चांगला फायदा होणार आहे.
फुले ११०८२ (कोएम ११०८२) ) (Sugarcane Phule 11082) हा उसाचा लवकर पक्व होणारा नवीन वाण आहे. महाराष्ट्रात सुरू आणि पूर्वहंगामातील लागवडीसाठी याची शिफारस करण्यात आली आहे. या वाणाची जाडी, उंची, कांडीची लांबी जास्त असल्याने सरासरी वजन जास्त मिळते. वाणाचा जेठा कोंब काढल्यास फुटव्यांची संख्या भरपूर मिळते.
हिंगोलीतील शेतकऱ्याची पोलिसांत तक्रार, उपमुख्यमंत्री फडणवीस खोटे बोलले असल्याची तक्रार
याचे कोसी ६७१ पेक्षा ऊस आणि साखर उत्पादन अधिक मिळते. उसातील व्यापारी शर्करा प्रमाण हे कोसी ६७१ पेक्षा किंबहुना बरोबरीत असल्याने ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये साखर कारखान्याचा साखर उतारा वाढविण्यासाठी हा वाण फायदेशीर ठरणार आहे. पाडेगाव, कोल्हापूर, पुणे आणि प्रवरानगर येथे २०१२-१३ मधील बहुस्थानी चाचणीमध्ये फुले ११०८२ या वाणाचे अनुक्रमे पूर्व हंगामी आणि सुरू लागवडीमध्ये हेक्टरी ११८.३४ टन आणि १०३.३३ टन ऊस उत्पादन आणि साखर उत्पादन १७.१९ टन आणि १५.७८ टन मिळाले आहे.
आता राजू शेट्टी करणार पालकमंत्र्यांच्या घरासमोर बिऱ्हाड आंदोलन..
कोसी ६७१ या लवकर पक्व होणाऱ्या वाणापेक्षा अनुक्रमे १४.२१ टक्के आणि ८.२६ टक्के अधिक ऊस उत्पादन आणि १५.७९ आणि ४.६४ टक्के साखर उत्पादन मिळाले. पूर्व आणि सुरू हंगामातील फुले ११०८२ या वाणामध्ये व्यापारी शर्करा १४.१२ आणि १३.९४ टक्के मिळाली असून को.सी. ६७१ मध्ये १३.९४ आणि १४.४९ टक्के मिळाली.
महत्वाच्या बातम्या;
नॅनो-डीएपीला दोन दिवसांत मान्यता मिळणार, नेहमीच्या खताच्या तुलनेत निम्म्या भावात उपलब्ध होणार..
उजनीत हिरवे विष! पशुधन धोक्यात
नवीन वर्षांत शेतकऱ्यांना बसणार महागाईची झळ! खतांच्या किमती 40 टक्क्यानी वाढल्या
Published on: 31 December 2022, 04:48 IST