घडाने आकार घेतल्यानंतर त्याच्या टोकास असलेले वांझ केळफूल त्या घडातील केळयांच्या शेजारी फणीपासून थोडया अंतरावर कापून टाकतात.
त्या केळफूलाचा भाजीसाठी उपयोग होतो शिवाय ते काढून घेतल्यामुळे घडातील केळी चांगली पोसून त्याचे वजन वाढते.
लागवडीनंतर 10 ते 12 महिन्याच्या अवधित झाडावर लॉगर येऊ शकतो.
बसराई जातीचे लोंगर 7 ते 12 महिन्यात बाहेर पडतात. वाल्हा जातीत 6 ते 7 महिने लागतात. लालवेची, सफेदवेलची व मुठळी जाती 9 ते 13 महिने लागतात. तर लालकेळीस लॉंगर येण्यास 14 महिने लागतात.
झाड चांगले वाढलेले असल्यास लागवडीनंतर साधारणपणे 6 महिन्यांनी खोडास फुलोरा तयार होवू लागतो.
व 9 ते 10 महिन्यांनी केळी फूल खोडाबाहेर पडते. व 3 ते 5 महिन्यात घड तयार होतो. थंडीच्या दिवसात घड तयार होण्यस जास्त काळ लागतो.
केळीचा हंगाम मुख्यतः महाराष्ट्रात ठाणे, वसई भागात जूलै ते मार्च व खानदेश भागात सप्टेंबरमध्ये असतो.
फळ चांगले पोसून गुबगुबित झाले, त्यावरच्या धारा (कडा) मोडून ते गरगरित झाले की, ते पूर्ण तयार झाले समजावे.
पूर्णपणे तयार झालेला घड तीन ते चार दिवसांत पिकतो. त्यामुळे तो वाहतूकीस योग्य ठरतो.
त्यासाठी 75 टक्के पक्व असेच घड काढतात. त्यामुळे ते लांबवर वाहतूक करता येते.
वाहतूक
बारमाही बहराचे वरदान केळी पिकाला लाभलेले असले तरी जलद गतीने नाशवंत फळांच्या शापांचे गालबोटही या पिकास लागले आहे.
झाडावर केळ पूर्णपणे वाढून तयार झाल्यावर घड कापून जलद गतीने ग्राहकापर्यंत पोहचविण्याची गरज असते. केळीची घड त्यांच्या पानाचा थर देऊन वाघीणी किंवा ट्रक मध्ये रचली जातात.
2 ते 7 दिवसापर्यंतच्या रेल्वे प्रवासात केळी आपोआप पिकतात व स्थानकावर पोहोचविल्यावर त्वरीत त्याची 2 ते 4 दिवसांत विल्हेवाट लावावी लागते.
केळी हिरवी व पूर्ण वाढीची सोडली तरीही आपोआप प्रवासात पिकतातञ किंवा धुरी वा इथाइलीन गॅसच्या साहारूयाने पिकविले जातात.
केळीच्या घडाच्या दांडयाला पॅराफिन मेण, व्हॅसलिन किंवा चुना लावतात. त्यामुळे फळे जास्त काळ टिकतात व अधिक आकर्षक रंगाचे होतात. अर्धा किलो मेन 100 घडयांना पुरते.
उत्पादन व विक्री
प्रदेश, जात व जमिनीच्या प्रकारानुसार केळीच्या उत्पादनाचे प्रमाण बदलू शकते. बसराई जातीचे खानदेश भागात अंदाजे उत्पन्न 335 ते 450 क्विंटल प्रति हेक्टरी सरासरी येते.
पूणे व ठाणे भागात 590 ते 650 क्विंटल प्रति हेक्टरी सरासरी येते.
राज्य व्यापार महामंडळ, मुंबईतर्फे रशिया. जपान. इटली. कुवेत. वगैरे देशात केळीची निर्यात केली जाते.
घाऊक व्यापारी केळयांची खरेदी जागेवरच केळी बागेत घडांची संख्या आकारमान विचारात घेऊन करतात. तथा सर्वर मोठया पेंठात त्यांची वजनावर विक्री होते.
किरकोळ विक्रेते भटटीचा तयार माल विकत घेऊन डझनावर विक्री करतात.
Published on: 12 February 2022, 10:18 IST