Agripedia

सोयाबीन पीक पेरणी होऊन ७०-८० दिवस पूर्ण होत आहेत,

Updated on 31 August, 2022 8:24 PM IST

सोयाबीन पीक पेरणी होऊन ७०-८० दिवस पूर्ण होत आहेत, प्रामुख्याने विदर्भात ३३५ किंवा इतर लवकर येणारे वाणाना शेंगा लागल्या आहेत व परिपक्व होत आहेत,परंतु मागील १०-१५ दिवसापासून संपूर्ण महाराष्ट्रात पावसाने उघड दिले आहे, व सोयाबीन पीक दाणे भरण्याच्या अवस्थेत असताना पाऊस कमी असल्याने बरेच ठिकाणी सोयाबीन वाळत सुध्दा आहे याचा उत्पादनावर परिणाम होणार व उत्पादन कमी येऊ शकते, अशा परिस्थितीत फुले संगम या वाणाचा विचार केला तर प्रामुख्याने पाऊस कमी असल्याचा जास्त फटका फुले संगम या वाणाला बसत आहे, बरेच ठिकाणी रस शोषक

किडीमुळे फुले संगम वर yellow mosaic चा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात दिसून येतो आहे, तसेच काही ठिकाणी तांबेरा रोग सुध्दा दिसून येत आहे, फुले संगम वरती इतर वाणाच्या तुलनेत जास्त प्रमाणात प्रादुर्भाव दिसून येतो आहे याचे कारण काय असेल तर, सुरवातीलाच सोयाबीन पेरणीपूर्वी एक लेख मी प्रसिद्ध केला होता त्यामध्ये जमिनीच्या प्रकारानुसार वाण निवड याचे विश्लेषण होते तर फुले संगम च्या बाबतीत बघितले ते हे वाण विदर्भात लागवडी साठी शिफारशीत नाही तरी सुध्दा मागील २-३ वर्षे चांगले उत्पादन मिळाले त्यामुळे वाणाची लोक प्रियाता वाढली व मोठ्या क्षेत्रावर या वर्षी लागवड झाली,

परंतु लागवड करत असताना फुले संगम साठी विशेष काळजी घेणे आवश्यक होती, ती बरेच शेतकरी मित्रांनी घेतलेली दिसत नाही, फुले संगम हे जास्त उत्पादन देणारे वाण आहे त्याच बरोबर ते उशिरा येणारे वाण आहे त्यामुळे आपल्याला त्याची विशेष निगा राखणे आवश्यक आहे ( इतर वाणाच्या तुलनेत), तसेच हे वाण तुम्ही जेवढी मेहनत घ्याल तेव्हढे response देते (जास्त उत्पादन देते ) म्हणजे तुम्हाला उत्पादन चांगले पाहिजेत असेल तर त्याप्रमाणे नियोजन करणे आवश्यक आहे तसेच मेहनत घेणे आवश्यक आहे.या वर्षी सुध्दा बरेच शेतकरी मित्रांचे प्लॉट अतिशय चांगले आलेले आहेत ( ज्यांचे नियोजन व्यवस्थित आहे त्यांचे ) त्या ठिकाणी रोग व किडी तसेच कुठलाही प्रादुर्भाव दिसत नाही.

या सद्याच्या परिस्थीत फुले संगमची जर आपण पेरणी केली असेल तर काय करणे आवश्यक आहे.ज्या भागात पाऊस कमी आहे व पाणी व्यवस्थापन करणे आवश्यक असल्याने सोयाबीन सुकत असेल किंवा वाळत असेल तर पाणी देणे आवश्यक आहे , पाट दिले तर फायदेशीर ठरेल.दूसरा मुद्दा फुले संगम हे उशिरा येणारे वाण असल्याने कमीत कमी तीन वेळा फवारणी करणे आवश्यक आहे, शेवटची फवारणी ही ७० -८० दिवसांनी होणे आवश्यक आहे कारण विदर्भात उशिरा येणारे वाण करपा- तांबेरा रोगाला बळी पडतात तसेच शेवटी पांढरी माशी व इतर रस शोषक किडींचा प्रादुर्भाव वाढतो व त्यामुळें शेंगा व्यवस्थित भरत नाही व दाणे बारीक होतात व उत्पादन कमी येऊ शकते जास्त

महाग औषध फवारणी नाही केली तर चालेल, आपण साधे कीटकनाशक - बुरशी नाशक वापरले तरी चालेल परंतु फवारणी करणे आवश्यक, सध्याच्या परिस्थितीत पाऊस उघडला आहे व तापमान सुध्दा जास्त आहे अशा वातावरणात आळी व रस शोषक किडींचा प्रादुर्भाव वाढतो त्यामुळे फवारणीचे नियोजन करणे आवश्यक आहे जर पाणी देऊन फवारणी केली तर फायदेशीर ठरेल फवारणी Emamectin benzoate + Novaluron 30 mlकिंवा Flubendamide + Deltamethrin १० ml किंवाChlorantraniliprole + Lambdacyhlothrin १० mlयापैकी एक कीटक नाशक सोबतTebucanzole + sulfur ३० gm

किंवा Thaiphanate methyle ३०-३५ gmकिंवा Azoxystribin + propicanazole १० mlकिंवा Azoxystribin + tebucanzole १२ ml प्रती पंप याप्रमाणे सोबत ०:५२:३४ १०० gm किंवा ०:०:५० ८० gm याप्रमाणे जर फुले संगम सोयाबीन सुकत असेल म्हणजे झाड वाळत असेल तर पाणी देऊन लगेच १९:१९:१९ १०० gm सोबतOrtho silicic acid २५-३० ml किंवा Gebrelic acid किंवा अमिनो एसिड ची फवारणी करावी जर रस शोषक किडीचा प्रादुर्भाव झालेला असेल तर २०-२५ चिकट सापळे लावावे (एकरी )Yellow mosaic किंवा सोयाबीन Mosaic दिसून आला तर असे झाडे उपटून बाहेर टाकावे व लगेच फवारणी करावी तसेच १०-१२ दिवसांचे अंतराने अजून एक फवारणी करावी तसेच सोबत Copper

Oxychloride ३० gm आणि २ gm streptomycin sulphate चा वापर करू शकता ( जर जास्त प्रमाणात प्रादुर्भाव असेल तर) फुले संगम हे उशिरा येणारे वाण असल्याने अजून फुले - शेंगा अवस्थेत आहे ( इतर वाण शेंगा परिपक्व झालेले आहेत) अशा परिस्थितीत शेतकरी घाबरत आहेत की फुले संगम ला शेंगा नाहीत किंवा रोग वगैरे दिसत आहेत, अशा परिस्थतीमध्ये हे उशिरा येणारे वाण असल्याने आपल्याला त्यासाठी एक फवारणी जास्त करावी लागेल हे लक्षात घेऊन नियोजन करावेे.फुले संगम हे जास्त वाढणारे वाण आहे बरेच ठिकाणी २-२.५ फूट वाढ झालेली आहे, अशा परिस्थितीत खोडाची जाडी सुध्दा वाढणे आवश्यक आहे , त्यासाठी योग्य अंतर ठेवून लागवड केली असेल तर त्या प्लॉट मद्ये आपल्याला चांगल्या शेंगा दिसतील

परंतु याचे उलट काही शेतकरी मित्रांनी फुले संगम ची पेरणी दाट केली आहे व अंतर ही कमी ठेवलेले आहे त्यामुळे अवास्थव वाढ झाली दिसून येत आहे व खोडाची जाडी मात्र अतिशय लवचिक आहे, असे असेल तर दाणे भरण्यावर त्याचा परिणाम होतो त्यामुळे जर वाढ जास्त असेल तर खोडाची जाडी सुध्दा वाढणे आवश्यक आहे त्यासाठी फवारणी करताना @ ०:५२:३४ किंवा ०:०:५० चा वापर करावा जर खूपच जास्त प्रमाणात वाढ असेल तर Pachlobutarazole २ -३ ml किंवा Mapiquate Chloride ४-५ ml प्रती पंप याप्रमाणे फवारणी करावी.तसेच वाढ योग्य असेल परंतु शेंगा व खोडाची जाडी वाढवणे गरजेचे असेल तर, यासाठी आपण Gebrelic acid चा सुध्दा वापर करू शकता

तिसरा मुद्दा चक्री भुंगा व खोड माशी यांचा प्रादुर्भाव सुध्दा फुले संगम मद्ये जास्त असू शकतो कारण वाढ जास्त असेल तर खोड लवचिक असते व त्यामुळे या किडींचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात दिसून येतो त्यासाठी सुध्दा वरती सांगितल्या प्रमाणे फवारणी करावी परंतु दोन फवारणी मद्ये जास्त अंतर ठेवू नये १५ दिवसाचे अंतराने फवारणी करावी व एकरी सरासरी १५०-२०० लिटर पाणी वापरावे तसेच कीटकनाशकांचा जो डोस एक एकर साठी दिला आहे तो त्या प्रमाणात वापरावा एकरी कमीत कमी १५ लिटर चे १० पंप होणे आवश्यक आहे परंतु प्रत्यक्षात शेतकरी एकरी ५ पंप याप्रमाणे फवारणी करतात त्यामुळे आपल्याला रिझल्ट मिळत नाहीत हे लक्षात घेऊन नियोजन करावे तरच आपल्याला आपले फुले संगम चांगले उत्पादन देईल, 

माझ्या संपर्कात असलेल्या शेतकरी मित्रांचे ज्यांचे नियोजन व्यवस्थित आहे त्यांचे फुले संगम अतिशय चांगले आलेले आहे, जिथे नियोजन बिघडले / चुकले आहे तिथे सोयाबीनची बिकट परिस्थिती आहे, सांगायचे एकच की फुले संगम हे योग्य नियोजन असेल तरच चांगले उत्पादन देते तुमची जमीन खत व्यवस्थापन कीड व रोग व्यवस्थापन तसेच नियोजन हे महत्वाचे आहे, हा वाण अतिशय चांगले आहे कारण विदर्भात ३०-४० टक्के सोयाबीन उत्पादन वाढी मद्ये फुले संगम या वाणाचा महत्वाचा वाटा आहे त्यामुळे आपण आपले नियोजन काळजीपूर्वक करणे आवश्यक आहे कारण सर्व गोष्टी आपल्या व्यवस्थापनावर अवलंबून असतात.

 

Dr Anant Ingle

PhD Genetics and Plant Breeding MPKV Rahuri

Director Vidarbha Agriculture Development Foundation

English Summary: Flower Sangam Management of Soybean Sap-sucking insect, excessive growth, yellowing, disease management
Published on: 31 August 2022, 08:24 IST