Agripedia

कोकणात भात शेती मोठ्या प्रमाणात केली जाते. बरेच शेतकरी या पिकाची पेरणी पारंपरिक पद्धतीने करतात. अशा वेळी शेतकऱ्यांना अपेक्षित नफा मिळत नाही. त्यामुळे आज आपण भात पेरणीच्या तंत्राबद्दल जाणून घेणार आहोत, ज्यातून शेतकऱ्यांना चांगले उत्पादन मिळेल.

Updated on 28 July, 2022 6:15 PM IST

कोकणात भात शेती मोठ्या प्रमाणात केली जाते. बरेच शेतकरी (farmers) या पिकाची पेरणी पारंपरिक पद्धतीने करतात. अशा वेळी शेतकऱ्यांना अपेक्षित नफा मिळत नाही. त्यामुळे आज आपण भात पेरणीच्या तंत्राबद्दल जाणून घेणार आहोत, ज्यातून शेतकऱ्यांना चांगले उत्पादन मिळेल.

मत्स्य भात शेती तंत्र

मत्स्य भात शेती (Fish rice farming) तंत्रांतर्गत भातशेतीत पाणी भरून मत्स्यपालन केले जाते. शेतातील तण हे कीटक माशांसाठी चारा बनतात. या प्रकारच्या शेतीसाठी शेतकर्‍यांना कमी जमिनीची शेती निवडण्याचा सल्ला दिला जातो, जेणेकरून पुरेसे पाणी साचेल व मत्स्य शेतीचा चांगला फायदा होईल.

अशा शेतात पाणी सहज जमा होते. त्यामुळे धानाच्या उत्पादनावरही परिणाम होत नाही. त्याच शेतात भात पिकवणे आणि मासे वाढवणे यामुळे भात रोपांना अनेक रोगांपासून मुक्ती मिळते. याचा महत्वाच्या एक फायदा आहे की धान पिकाला किडीजन्य रोगांचा प्रादुर्भाव लवकर होत नाही.

हे ही वाचा 
Fertilizers: आता भेसळयुक्त खते एका मिनिटातच समजणार; कृषी मंत्र्यांची मोठी घोषणा

पिकाला जास्त पाण्याची आवश्यकता असते. मात्र, काही वेळा पीक करपण्याच्या भीतीने शेतात पाणी मुरवावे लागते. पण त्याच शेतात भात पेरण्याबरोबरच मत्स्यपालन (Fisheries) केल्यास शेतकऱ्यांना हे करावे लागणार नाही.

अशा तंत्रज्ञानाने शेती केल्यास शेतकर्‍यांचा नफाही दुप्पट होईल. हा अनेक राज्यांमध्ये मत्स्य शेतीचा यशस्वी प्रयोग केला जात आहे. पिकासोबत केल्या जाणाऱ्या या व्यावसायातून शेतकऱ्यांना नक्कीच फायदा होऊ शकतो.

महत्वाच्या बातम्या 
Monkeypox: मंकीपॉक्सचा कहर जगासाठी धोकादायक; 'ही' लक्षणे आढळल्यास त्वरित करा उपाय
Kisan Credit Card: ...आणि शेतकरी वडिलांच्या मृत्यूनंतर बँकेने मुलाला दिले 15 लाख रुपये; जाणून घ्या नेमकं प्रकरण
Solar Panel: शेतकरी मित्रांनो; सोलर पॅनल बसवून मिळवा 24 तास मोफत वीज, सरकार देतंय 'इतके' अनुदान

English Summary: Fish Rice Farming exactly fish rice farming which farmers earning double money
Published on: 28 July 2022, 05:58 IST