Agripedia

आज आपण सगळे रासायनिक खत वापरतो. कधी विचार केलाय,

Updated on 17 December, 2022 7:00 PM IST

आज आपण सगळे रासायनिक खत वापरतो. कधी विचार केलाय, पेट्रोल सारख्या गोष्टींपासून तयार केलेले खत जिवंत असलेले पीक कसे खाऊ शकते? हे रासायनिक खत पिकला खायला घालायला जमिनीतील जीवाणू प्रक्रिया करतात व ते पिकला खाण्यायोग्य करून देतात.रा आठवा २०-३० वर्षा पूर्वी एक पोत रासायनिक

खत टाकून मिळणारा रिझल्ट आज मिळवायला आपल्याला कमीत कमी २-३ पोती टाकायला लागतात..आता विचार करा असे का झाले? याचे कारण असे,Now think why it happened? This is because,पूर्वी आपल्या जमिनीत जीवाणूंची संख्या भरपूर होती त्याचे कारण म्हणजे आपण वापरात असलेले सेंद्रिय पदार्थ.आठवा पूर्वी आपल्या घरी भरपूर गाई म्हशी असायच्या त्यांचे शेण काढून

साठवले जायचे, घरातील चुलीतील राख शेतात टाकली जायची,घरातला प्राणी मेला तर त्याला शेतात पुरायचे. या सगळ्यामुळे जमीनित जीवाणूंची संख्या भरपूर असायची. यालाच आपण म्हणायचो की जमीन जिवंत आहे.आता आपण सेंद्रिय खतांचे प्रमाण कमी कमी करत गेलो काही जणांनी तर सेंद्रिय पूर्ण बंद केलं. या मुळे

जमिनीतील जीवाणूंची संख्या कमी होत गेली व रासायनिक खताला मिळणारा रिझल्ट कमी कमी होत गेला.आपल्या खातात जीवाणूंची संख्या मोठ्या प्रमाणावर असते. हे जीवाणू जमिनीत दिलेल्या रासायनिक खातला एकत्र करून पिकला खायला घालतात. या मुळे न वापरले जाणारे रासायनिक खत वापरले जाते. 

English Summary: First understand what exactly is fertilizer
Published on: 17 December 2022, 07:00 IST