Agripedia

महाराष्ट्राचा विचार केला तर नाशिक जिल्ह्यातील बऱ्याच भागात खरीप हंगामामध्ये कांदा लागवड मोठ्या प्रमाणात करण्यात येते तसेच विदर्भात रब्बी हंगामातील कांद्याचे क्षेत्र अधिक असून त्या तुलनेने खरीप व रांगडा हंगामातील कांद्याचे क्षेत्र नगण्य आहे. या लेखामध्ये आपण रोपवाटिका व्यवस्थापन व पुनर्लागवड या महत्त्वाच्या मुद्द्यांवर माहिती घेऊ.

Updated on 05 June, 2021 9:31 PM IST

महाराष्ट्राचा विचार केला तर नाशिक जिल्ह्यातील बऱ्याच भागात खरीप हंगामामध्ये कांदा लागवड मोठ्या प्रमाणात करण्यात येते तसेच विदर्भात रब्बी हंगामातील कांद्याचे क्षेत्र अधिक असून त्या तुलनेने खरीप व रांगडा हंगामातील कांद्याचे क्षेत्र नगण्य आहे. या लेखामध्ये आपण रोपवाटिका व्यवस्थापन व पुनर्लागवड या महत्त्वाच्या मुद्द्यांवर माहिती घेऊ.

जर कांदा लागवडी नुसार पाहिले तर त्याचे तीन हंगामात  वर्गीकरण करता येते. खरीप, रांगडा हंगाम व रब्बी हंगाम अशा तीनही हंगामात हे पीक घेतले जाते. जर टक्केवारीनुसार या क्षेत्राचा विचार केला एकूण क्षेत्रापैकी सरासरी 20 टक्के क्षेत्र हे खरीप, 20 टक्के क्षेत्र हे लेट खरीप म्हणजे रांगडा, आणि 60 टक्के क्षेत्र हे रब्बी हंगाम मध्ये राहते.

रब्बी हंगामातील कांद्याचे उत्पादन व दर्जा  चांगला राहतो चांगला राहतो परंतु बाजारभाव कमी मिळतो. त्या तुलनेत नोव्हेंबर ते मार्च महिन्यात येणाऱ्या खरीप व लेट खरीप कांद्याला बाजार भाव चांगला मिळतो. खरीप हंगामातील कांद्याचे उत्पादन थोडे कमी मिळते. लेट खरीप कांद्याला पोषक हवामान मिळाल्यामुळे उत्पादन व दर्जा चांगला राहतो. जर आपण मागणी आणि पुरवठा यांचा विचार केला तर  खरीप व लेट खरीप हंगामातील कांदा उत्पादन तंत्रज्ञान हे नक्की शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या परवडणारे तंत्रज्ञान ठरू शकत. खरीप कांदा लागवडीसाठी उत्तम निचऱ्याची, हलकी ते मध्यम जमीन निवडावी.

हंगामनिहाय कांदा वाण

  • हंगाम – खरीप

पिकाचा कालावधी- मे ते सप्टेंबर

उपयुक्त वाण – भीमा सुपर, भीमा रेड, ॲग्री फाउंड, डार्क रेड, बसवंत 780, एन 53, फुले समर्थ

 उत्पादन ( टनात प्रति हेक्‍टरी )- पंधरा ते वीस टन

  • हंगाम – लेट खरीप

पिकाचा कालावधी- ऑगस्ट ते  फेब्रुवारी

उपयुक्त वाण – भीमा सुपर, भीमा रेड, फुले सफेद, फुले समर्थ, ॲग्री फाउंड, डार्क रेड, बसवंत 780

 उत्पादन – प्रतिटन हेक्टरी 22 ते 25 टन

  • हंगाम – रब्बी

 पिकाचा कालावधी- ऑक्टोबर ते एप्रिल

 उपयुक्त वाण – अकोला सफेद, ॲग्री फाउंड, लाईट रेड, एन 241

 उत्पादन- प्रति टन हेक्टरी वीस ते पंचवीस टन

 

रोपवाटिका व्यवस्थापन

  • रोपवाटिकेच्या व्यवस्थापनातून रोपे निरोगी मिळाली कादा उत्पादनाची निम्मी लढाई जिंकली जाते.

  • रोपवाटिकेसाठी शेतातील उंच भागावरील हलकी ते मध्यम जमिनीची निवड करावी. एक हेक्‍टर लागवडीसाठी 10 ते 12 गुंठे क्षेत्र तसेच प्रति एकरी चार ते पाच किलो बियाणे लागते.

  • रोपवाटिकेसाठी गादी वाफा किंवा रुंद वरंबा सरी पद्धतीचा अवलंब करावा. त्यासाठी एक मीटर रुंद, तीन मीटर लांब व 15 सेंटिमीटर उंचीचे गादी वाफे तयार करावेत. मिश्र खत व शेणखत टाकावे.

  • नियमित व योग्य पद्धतीने पाणी द्यावे.

  • 40 ते 45 दिवसात रोपे लागवडीयोग्य होते.

रोपांची पुनर्लागवड

  • कांदे जमिनीच्या खाली 25 सेंटीमीटर पर्यंत वाढतात उत्तम निचऱ्याची हलकी ते मध्यम भारी जमिनीची निवड करावी. नांगरणी वखरणी करून शेतात 20 ते 25 टन कुजलेले शेणखत टाकावे.

  • पुनर लागवडीकरिता रुंद वरंबा व सरी पद्धतीचा अवलंब करावा. त्यासाठी चार ते पाच फूट व रुंदी चे व 12 ते 15 सेंटिमीटर उंचीचे शेताच्या लांबीनुसार वरंबे तयार करून 15 बाय दहा सेंटिमीटर अंतरावर लागवड करावी.

  • ओलीता करिता ठिबक किंवा तुषार सिंचन पद्धतीचा अवलंब करावा.

  • रोपांचा शेंड्याकडील 1/3 भाग कापून टाकावा. लागवडीपूर्वी रोपे शिफारशीत कीटकनाशक व बुरशीनाशकाच्या द्रावणात बुडवून लागवड करावी.

अन्नद्रव्य व्यवस्थापन

  • खरीप कांदा

बेसल डोस- 25 किलो नत्र, 40 किलो स्फुरद, चाळीस किलो पालाश(हेक्टरी )

 तीस दिवसांनी – 25 किलो नत्र

 45 दिवसांनी – 25 किलो नत्र

एकूण - 75 किलो नत्र, 40 किलो स्फुरद खरीप कांद्यासाठी उपयुक्त असते.

लेट खरीप कांदा( 40 ते 50 टन हेक्टरी )

लागवडीपूर्वी – 40 किलो नत्र, 40 किलो स्फुरद, 60 किलो पालाश

 लागवडीच्या तीस दिवसांनी – 35 किलो नत्र

 लागवडीच्या 45 दिवसांनी- 35 किलो नत्र

 एकूण – एकशे दहा किलो नत्र, 40 किलो स्फुरद  आणि 60 किलो पालाश

 

जमिनीतून दिलेल्या खता सोबतच फवारणीच्या माध्यमातून 19:19:19 खते 15, तीस आणि 45 दिवसांनी व  13:00:45 खाते साठ, 75 व 90 दिवसांनी द्यावी. कांदा वाडीच्या  अवस्थेनंतर नत्रयुक्त खतांचा वापर टाळावा. 20 ते 25 किलो गंधक लागवडपूर्व दिल्यास कांद्याची प्रत व टिकून क्षमता वाढते.

 स्त्रोत - ॲग्रोवन 

English Summary: Find out! Kharif onion cultivation method
Published on: 05 June 2021, 09:29 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)