Agripedia

जमिनीत असंख्य सुक्ष्म जीवजंतु वास्तव्य करीत, असतात. त्यात, बुरशी, बॅक्टेरिया, अँक्टीनोमायसिटीस ह्यांचा समावेश होतो. हे जीवजंतू सेंद्रीय पदार्थाचे विघटन दोन किवा तीन अवस्थेत होते. सेंद्रीय पदार्थाचे विघटन होऊन पिकांना लागणारे अन्नद्र्व्ये नमुद केलेले जीवाणू उपलब्ध करुन देतात.

Updated on 09 July, 2021 10:40 AM IST

जमिनीत असंख्य सुक्ष्म जीवजंतु वास्तव्य करीत, असतात. त्यात, बुरशी, बॅक्टेरिया, अँक्टीनोमायसिटीस ह्यांचा समावेश होतो. हे जीवजंतू सेंद्रीय पदार्थाचे विघटन दोन किवा तीन अवस्थेत होते. सेंद्रीय पदार्थाचे विघटन होऊन पिकांना लागणारे अन्नद्र्व्ये नमुद केलेले जीवाणू उपलब्ध करुन देतात.

लिग्रीन नावाचा सेंद्रीय पदार्थातील घटक लवकर विघटीत होत नाही, त्यासाठी बराच काळ जावा लागतो, ह्युमस नावाचा पदार्थ सेद्रिंय पदार्थांच्या विघटनाअंती तयार होतो. ह्युमस हे अत्यंत महत्त्वाचे अन्नद्रव्य आहे ह्युमस मुळे पिकांची वाढ होऊन उत्पादन चांगले येते.

सेंद्रीय पदार्थ विघटन क्रम

सुरुवातीला बुरशी सेंद्रिय पदार्थाचे विघटन करते, त्यावरुन तयार होणा-या विघटीत पदार्थावर बँक्टेरियामुळे पुढील विघटन होत राहाते. लवकर विघटीत होणारे पदार्थ जसे साखर, स्टार्च, प्रथिने, सेल्युलोज, हेमीसेल्युलोज इत्यादीवर बँक्टेरिया व इतर सुक्ष्म जीवाणूच्या प्रक्रियेतून त्याचे रुपांतर ह्युमसच्या स्वरुपात करतात या प्रक्रियेत पाणी कार्बनडाय आँक्साईड (वायु) व उर्जा निर्माण होते.
लिग्रीनचे विघटन व्हायला वेळ लागतो. लिग्रीन विघटनात सुगंधी पदार्थ तयार होतात. त्याचप्रमाणे काही प्रथिने लिग्रीन सोबत विघटीत होऊन ह्युमस तयार होते.

सेंद्रीय पदार्थातील प्रथिने

सुक्ष्म जीवाणूंमुळे प्रथिनांचे रुपांतर अमिनो आम्ल व अमाईड ह्या पदार्थात होते .पुढे हे पदार्थ अमोनियम संयुगा मध्ये रुपांतरीत होतात .अमोनियम कंपाऊड पुढे प्राणवायुच्या संपर्काने नायट्राईट (नायट्रोसोमोनस बँक्टेरियामुळे व पुढे नायट्रेट (नायट्रोबँक्टेर ) या रुपात तयार होतात .नायट्रेटच्या रुपात नत्र झाडांना उपलब्ध होतो.

सेंद्रीय पदार्थातील स्फुरद

स्फुरद हे अन्नद्र्व्य सेंद्रिय पदार्थात फायटिन, न्युक्लीक, अँसीड आणि फाँस्फोलीपीड ह्या स्वरुपात असते. या पदार्थाचे जीवाणूमुळे विघटन होऊन आँरथोफाँस्फेट आयाँन तयार होतात. आँर्थोफाँस्फेट आयाँनच्या स्वरूपात स्फुरद पिकांना उपलब्ध होते.

 

सेंद्रीय पदार्थातील गंधक

गंधक हे अन्नद्रव्य अमिनो आम्ल (मिथीओनिन ,सीस्टीन ,सिस्टाईन ) या स्वरूपात सेंद्रीय पदार्थात असते. ही अमिनो आम्ल सुक्ष्मजीवाणू विघटीत करुन गंधकाचे रूपातर सल्फेट्च्या रुपात करतात. सल्फेट रुपात गंधक हे अन्नद्रव्य पिकांना उपलब्ध होते.

इतर अन्नद्रव्ये

पिकांना लागणारे इतर अन्नद्रव्ये जसे कॅल्शियम, पालाश, मँगनीज, लोह, जस्त, इत्यादी सेंद्रीय पदार्थाच्या विघटनाने पिकांना उपलब्ध होतील. या स्वरुपात जीवाणूंच्या क्रियेमुळे आणल्या जातात. सुक्ष्मजीवाणूंच्या प्रक्रियेमुळे सेंद्रिय पदार्थातील वेगवेगळ्य़ा सेंद्रिय अन्नद्र्व्यांचे रुपातर शेवटी असेंद्रिय पदार्थात होते. या असेंद्रिय स्वरुपात अन्नद्रव्ये पीकांच्या मुळाद्वारे शोषून घेतली जातात. या क्रियेला अन्नद्रव्याचे खनिजीकरण असे म्हणतात. वरील प्रक्रियेच्या अगदी उलट प्रक्रिया जमिनीतील सुक्ष्म जीवाणू घडवून आणतात तेव्हा उपलब्ध अन्नद्रव्ये पिकांना उपलब्ध होत नाहीत. या प्रक्रियेला अन्नद्र्व्याचे इमोबिलायझेशन असे म्हणतात.

जमिनीत, सुरुवातीला उपलब्ध असलेले असेंद्रीय पदार्थ सुक्ष्म जीवाणू त्यांचे खाद्य म्हणून वापरतात. सुक्ष्म जीवाणूंची वाढ होऊन त्यांची संख्या वाढते. हे जीवाणू सेंद्रीय पदार्थाचे विघटन करतात. जेव्हा सर्व सेंद्रीय पदार्थाचे विघटन होते. तेव्हा सुक्ष्मजीवजंतु विनाश पावतात. (कारण त्यांना आवश्यक असलेली उर्जा मिळत नाही ) सुक्ष्म जिवाणूंच्या विनाशानंतर त्याचे शरीरातील सेंद्रीय पदार्थाचे विघटन पुढे असेंद्रीय पदार्थात होते.

ह्युमस म्हण्जे काय?

ह्युमस हा पदार्थ जमिनीत सुक्ष्म जीवाणूच्या सेंद्रिय पदार्थावरील प्रक्रियेत तयार होतो. ती अत्यंत बारीक भुकटी असते तिचा रंग तांबडा-काळा असून बारीक कणांचा झालेला असतो.

काही जिवाणू खतांचे महत्त्व त्याची निर्मिती व वापर याविषयी माहिती पुढीलप्रमाणे आहे.

रायझोबियम जीवाणू खत :-

रायझोबियम जीवाणूंना सहयोगी नत्र स्थिर करणारे जीवाणू म्हणतात. हे जिवाणू द्विदल वनस्पतीच्या मुळांवर गाठी तयार करुन त्यामध्ये राहतात. हे जिवाणू वनस्पतीकडून त्यांना लागणारे अन्न मिळवितात व हवेतील नत्र अमोनियाच्या स्वरुपात पिकांना उपलब्ध करुन देतात. हे खत तयार करण्यासाठी कडधान्यांच्या मुळावरील गाठीतून उपयुक्त कार्यक्षम जीवाणू अलग करून विशिष्ट प्रकारच्या माध्यमातून त्यांची मोठ्या प्रमाणावर वाढ करुन निर्जतुक केलेल्या लिग्राईट पावडरमध्ये मिसळून होणा-या खताला रायझोबियम जिवाणू खत असे म्हणतात.

रायझोबियम जिवाणू खत २५० ग्रँम वजनाच्या पाकिटात उपलब्ध असते हे पाकिट १० ते १५ कि .ग्रँ .बियाण्यासाठी वापरावे. खताची पावडर पुरेशी पाण्यामध्ये मिसळून त्याचे घट्ट द्रावण तयार करावे. तयार केलेले द्रावण बियाण्यावर हळूवारपणे सारख्या प्रमाणात लेप बसेल पंरतु बियाण्याचा पूष्ठभागा खराब होणार नाही, अशा पध्दतीने लावावे. लेप लावलेले बियाणे सावलीत स्वस्छ कागदावर अथवा किलतानावर सुकवून लगेच पेरणी करावी. एकाच प्रकारचे रायझोबियम जिवाणूखत सर्वच शेंगवर्गीय पिकांना उपयोगी पडत नाही. वेगवेगळ्या गटातील पिकांना विशिष्ट प्रकारच्या रायझोबियम गटाचे जिवाणूखत वापरतात. त्यानुसार त्याचे पुढील सात गट पडलेले आहे.

रायझोबियम जिवाणू गट पिके

१ .रायझोबियम जीवाणू - चवळी, भूईमूग, तुर, मूग, उडीद, वाल, मटकी, गवार, ताग, धैंचा, कुळीथ.
२ . रायझॊबियम ल्युपिनी - हरभरा.
३ .रायझोबियम ल्युमिनोसेरम - वाटाणा, मसुर
४ .रायझोबियम फँसीओलाय - सर्व प्रकारचा (घेवडा गट )
५ . रायझॊबियम जँपोनीकम - मेथी, बरसीम, घास
६ . रायझोबियम मेलिलोटी - मेथी, लसुण, घास
७ . रायझोबियम ट्रायफोली - बरसीम, घास

 

रायझोबियम जीवाणू खताचे फायदे -

१) कडधान्याचे उत्पन्न १५ ते २० टक्क्यांनी वाढते.
२) बियाण्यांची उगवण लवकर व चांगली होते.
३) जिवाणू खताच्या वापरामुळे पिकास नत्राचा सतत पुरवठा होत असल्याने रोपांची वाढ जोमदार होते.
४) जिवाणूंनी सोडलेल्या बुरशीरोधक द्रव्यांमुळे पिकांची रोगप्रतिकारक शक्त वाढते.
५) जनिनीत कर्ब ; नत्राचे प्रमाण योग्य राखुन जमिनीचा कस सुधारतो.

अँझोटोबँक्टर -

सर्व एकदल वर्गीय पीकांना नत्राचा पुरवठा करण्यासाठी अँझोटोबँक्टर जीवाणू खताचा फायदा होतो. उदा. कापूस, ऊस, ज्वारी, बाजारी, गहू इ. तूणधान्ये व भाजीपाला इ. जिवाणूखत बनविण्यासाठी अँझोटोबँक्टर जिवाणूची द्रव माध्यमामध्ये वाढ करण्यात येते व लिग्राईट नावाच्या पावडरमध्ये ही जीवाणूची वाढ म्हणजेच संवर्धक मिसळले जातात. एक ग्रँम पावडरमध्ये 10 कोटी एवढ्या प्रमाणात जिवाणूंच्या पेशी असतात. हे मिश्नण पाँलिथीन पिशव्यांमध्ये भरून सीलबंद करतात. या पाकिटातील जिवाणू खत सहा महिनेपर्यत बिजप्रक्रियेसाठी वापरणे आवश्यक असते.

अँझोटोबँक्टर जीवाणू खते पुढील तीन प्रमुख पध्द्तीनी वापरता येतात.

१) बियाण्यांवर किंवा बेण्यावर
२) रोपांच्या मुळांवर
३) शेतातील मातीत जिवाणू खते मिसळणे
अँझोटोबँक्टर जिवाणूंपासून मिळणारे फायदे
१ ) या प्रकारच्या जिवाणूंमुळे पीक उत्पादनात वाढ झाल्याचे आढळून आलेले आहे.
२ ) मुळांची वाढ चांगली होते.
३ ) रोपाची उगवण चांगली होते.
४ ) पीक उत्पादनाची प्रत सुधारते.उदा .भाजीपाला पिकामध्ये प्रथिनांचे, वाटाण्यात स्टार्चचे व कंदमुळांमध्ये साखरेचे प्रमाण वाढते.

अँझोस्पिरिलम

अँझोस्पिरिलम अणुजीव गवत वर्गातील पिके उदा . मका, गहू, बाजारी, ज्वारी, भात, ऊस व चा-याचे गवत यांच्या मुळांमध्ये व मुळांभोवतालच्या भागात प्रामुळ्याने आढळतात .या अणुजीवाचे अँझोस्पिरिलम लिपोफेरम व अँझोस्पिरिलम ब्रासिलन्स असे दोन प्रकार आहेत.
या दोन्ही प्रकारच्या अणुजीवांना अँसोस्पिरिलम, असे म्हणतात. हे जिवाणू अँझोटोबँक्टर जीवाणूंपेक्षा दीड ते दुपटीपेक्षा जास्त हवेतील नत्र पिकांना मिळवून देतात.

अझोला

अझोला ही नेचे वर्गातील पाणवनस्पती आहे. या वनस्पतीच्या पेशीत नत्र स्थिए करणारी अँनाबिना अझोली नावाची नील हरीत शेवाळ वर्गातील वनस्पती वाढत असते. ही वनस्पती सुर्यप्रकाशात स्वत:चे अन्न स्वत:च तयार करून त्यातील काही शेवाळासही पुरविते. अशाप्रकारे सहजीवी पध्दतीने जगणा-या या वनस्पतीमध्ये ४ ते ५ टक्के नत्र असते. त्याचा भातशेतीस चांगला उपयोग होतो. अझोल्यामध्ये नत्राचे व पाण्याचे प्रमाण जास्त असल्यामुळे तो जमिनीत टाकल्यावर लवकर कुजतो व त्यापासुन उत्तम प्रकारचे सेंद्रिय खत मिळते.

अझोलाच्या विविध जाती:-

१) अझोला कँरोलिनिआना २) अझोला मेक्सिकाना
३) अझोला निलोटिका ४) अझोला मायक्रोफायला
५) अझोला फिलिक्युलाँईड्स ६) अझोला पिनाटा
भारतामध्ये अझोला पिनाटा ही जात सर्वत्र आढळते.

अझोलाचे फायदे :-

१) भारताच्या एका हंगामात अझोल्याची पाच पिके घेतल्यास एकूण १२० कि.ग्रँ. नत्र प्रति हेक्टरी स्थिर केला जातो.
२) रासायनिक नत्र खताप्रमाणे यातील नत्राचा -हास होत नाही.
३) अझोलापासून तयार होणा-या सेंद्रीय खतामूळे जमिनीचा पोत सुधारतो.
४) भारतात ज्याठिकाणी पाणी साठून राहिल्यामुळॆ अँझोटोबँक्टर कार्य करीत नाही. त्याठिकाणी अझोला नत्र स्थिरीकरणाचे उत्तम काम करते.

मायकोरायझा :-

“मायकोरायझा" ही वनस्पतीच्या मुळांवर वाढणारी एक प्रकारची बुरशी आहे. ती वनस्पतीला जमीनीतील स्फुरद उपलब्ध करुन देण्याचे कार्य करते व त्या मोबदल्यात वनस्पतीकडून खाद्य मिळविते. ही बुरशी वनस्पतीला जमिनीतीच्या मुळांमध्ये व मुळाबाहेर तंतुमय धाग्यासारखे अनेक दोरे बाहेर तयार करते. हे दोरे मुळांच्या आतील पेशीपासून मुळांबाहेर मातीमध्ये खोलवर दूरवर पसरलेले असतात. त्याच्या माध्यमातून निरनिराळे आम्लधर्मीय पदार्थ तसेच विकरे जमीनीत सोडली जातात. त्यामुळे जमिनीतील अविद्राव्य स्फुरदाचे विद्राव्य स्फुरदात रुपातर होते. हा स्फुरद नंतर मायसेलियम (तंतुमय धाग्य़ांमार्फत ) मुळांच्या पेशीत असणा-या पोकळीत साठविला जातो आणि पिकाला पुराविला जातो.
व्हि .ए. एम - मायकोरायझाची कार्य:-
१) जमिनीतील अविद्रव्य स्फुरदाचे वि्घटन करुन विद्रव्य स्फुरद पिकांस मिळवून देतात.
२) मुळांच्या संख्येत जोमाने वाढ होते. त्यामुळे जमिनीतील अन्नद्रव्ये व पाणी पीकांस जलद उपलब्ध होतात.
३) पीकांच्या उत्पान्नात १५ ते ३० ट्क्क्यांनी वाढ होते. अन्नधान्य व भाजीपाला पिकांची प्रत सुधारते.
४) पीकांम्ध्ये रोगप्रतिकारक शक्ती निर्माण होते.
५) रोपवाटिकेत मायक्कोरायझाचा वापर केल्यास रोपांची निरोगी व जोमदार वाढ होत असल्याने पुढील पीकही चांगले जोमदार वाढ्ते.
६) पीक वाढीसाठी उपयुक्त असलेली वाढवर्धक द्रव्ये उदा. हाँमाँन्स, आँक्झिन्स, सायटोकानिन्स ,इ .तयार केली जाऊन ती पिकांना उपलब्ध होतात.

 

निळे-हिरवे शेवाळ :-

ही एक सुक्ष्मदर्शी एक पेशीय, तंतुमय शरीरचना असलेली गोड्या पाण्यातील स्वयंपोशी पाणवन्स्पती आहे. काही निळे-हिरवे शेवाळ पाण्यात राहून हवेतील मुक्त स्थितीत असलेला नत्र "हेटरासीस्ट " या विशिष्ट प्रकरच्या शरी रचनेद्वारे स्थिर करतात. योग्य परिस्थितीत निळे-हिरवे शेवाळ प्रतीवर्षी प्रती हेक्टरी ३० किलो नत्र स्थिर करु शकते.

निळ्या-हिरव्या शेवाळाचे जाती :-

नत्र स्थिर करण्यास उपयुक्त निळ्या-हिर्व्या शेवाळांच्या पुढील जाती आहेत .
१) अँनाबिना २) अँलोसिरा ३) सिलेंड्रोस्परामम ४) वेस्टीलाँ पसिस ५) अँसिलँटोरिया ६) नोस्टाँक ७) सायटोनिमा ८) टाँलीपोर्थिक्स

निळ्या-हिरव्या शेवाळाचे फायदे :-

१) सर्वसाधारणपणॆ एका हंगामात हेक्टरी २५ ते ३० कि .ग्रँ .नत्र या जीवाणू खतामुळे मिळतो.
२) जमिनीतील अविद्राव्य स्वरुपातील स्फुरद पीकास काही प्रमाणात उपलब्ध करून दिला जातो.
३) जमिनीत सेंद्रिय पदार्थाची वाढ होते.
४) जमिनीचा पोत सुधारण्यास मदत होते.
५) जमिनीमध्ये अँझोटाबँक्टर ,बायजेरिकिया यासारख्या उपयुक्त जीवाणूंची वाढ होण्यास मदत होते.
६) या शेवाळाची वाढ होत असतांना तयार झालेली वूध्दिसंप्रेरके व जीवनसत्वाचा पिकाच्या वाढीसाठी चांगला उपयोग होतो.
७) जमिनीची धुप कमी होते.

एलोरा इंटरनॅशनल बायोटेक अधिक माहितीसाठी फोन करा.
9822606382
प्रतिनिधी गोपाल उगले

English Summary: Find out! Importance of soil microorganisms
Published on: 09 July 2021, 10:39 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)