गोमूत्र म्हणजे आपल्याला गाईपासून मिळालेली मौल्यवान देणगी म्हणावी लागेल. गोमूत्रापासून मानवाचे कॅन्सर सारखे रोग बरे होऊ शकतात कारण त्यामध्ये अनेक आवश्यक असे मौल्यवान खनिजे आहेत. मग ते पिकांसाठी व मानवासाठी उपयुक्त ठरतात. त्यामूळे गोमुत्राचा वापर करून आपण शेतिमध्ये उत्पन्न वाढवू शकतो.
गोमुत्रामध्ये पिकाची वाढ व उत्पन्नावर निश्चित चांगले परिणाम करणारी द्रव्य आहेत. गोमूत्र एकाच वेळेस पिकाला खत, हार्मोन, कीड आणि रोगनाशक अशा तीन प्रकारे मदत करते. गोमूत्रात ७०-८० टक्केपाणी असले तरी फॉस्फेट ऑफ युरिया, म्युरेट ऑफ पोटॅश, कार्बोनेट आणि पोटॅश अमोनिया, सोडियम, पोटॅशियम, कॅल्शियम, गंधक, तांबे, लोह, काबरेलिक आम्ल, हिपुरिक आम्ल, लॅक्टोस आणि महत्त्वाची संप्रेरके असतात. ही रसायने झाडांच्या वाढीसाठी पूरक ठरतात.
पिकांवर फवारण्यासाठी गोमूत्राच्या १०-१५ टक्के पाण्यातील द्रावणात इतर पदार्थ (उदा. हिंग) आणि थोडे साबणाचे पाणी मिसळावे.
कडुनिंब, जंगली एरंडी, निरगुडी, शेवंती, कण्हेर, निलगिरी, तंबाखू, कांदा, मिरची इत्यादी वनस्पतींची पाने, फळे बारीक कापून किंवा वाटून गोमूत्रात टाकावे.
कडुनिंबाचा ५ टक्के पाण्यातील थंड अर्क आणि इतर वनस्पतींचा गरम अर्क (५-१० टक्के) गोमूत्रात मिसळल्यास फवारणी जास्त परिणामकारक ठरते.तसेच गोमूत्रावर आधारित व्यापारी कीडनाशकेही सध्या बाजारात मिळतात. त्याचप्रमाणे वनस्पतीजन्य पदार्थ, विशेषत: कडुिनब, वापरून ५० पेक्षा जास्त कीडनाशके तयार होऊ शकतात.या कीडनाशकांसोबतही गोमूत्राचा वापर सरस ठरतो. या मिश्रणाची फवारणी केल्यास दोन्हीमधील रासायनिक घटक एकत्र येतात (मात्र या मिश्रणात रासायनिक कीडनाशके टाकू नयेत).यामुळे किडी व रोगराईचे प्रमाण कमी होते. झाडांना थोडय़ा प्रमाणात अन्नद्रव्येही मिळाल्यामुळे झाडाची अवर्षणाविरुद्ध क्षमता वाढते आणि खताची मात्रा लांबणीवर टाकता येते.
हिंगाच्या वासामुळे किडीची मादी अंडी कमी प्रमाणात टाकते. उडणाऱ्या किडी वासामुळे दूर जातात. किडीची वाढ खुंटते, त्यांच्या जीवनावस्थेत अडथळा येतो, त्यांची प्रजनन क्षमता कमी होते. इत्यादी बाबी गोमूत्र व वनस्पतीजन्य पदार्थाच्या मिश्रणामुळे शक्य होतात आणि पिकाचे नुकसान कमी होते किंवा टळते.
झाडांना गोमूत्रची आंघोळ
वनस्पतींवरील किडीच्या प्रादुर्भावाला रोखण्याची ताकद गोमूत्रत असते. गोमूत्रचं द्रावण म्हणूनच झाडांसाठी उपयुक्त असतं. गोमूत्रचं द्रावण करताना 900 मिली पाण्यात 100 मिली गोमूत्र मिसळावं. हे गोमूत्रचं द्रावण वनस्पतींवर आठवडय़ातून एकदा फवारल्यास किडींच्या प्रादुर्भावावर नियंत्रण तर येतंच, पण त्याचबरोबर गोमूत्रतील पोषक द्रव्यांमुळे वनस्पतींची पानं हिरवी आणि तजेलदारही दिसू लागतात आणि वनस्पतींची वाढही चांगली होते. जोरदार फवाऱ्यानं प्रत्येक पानास वरून खालून नीट आंघोळ घातली जाईल अशा रीतीनं गोमूत्रच्या द्रावणाची फवारणी करावी.
लेखक-शरद केशवराव बोंडे
९४०४०७५६२८
प्रतिनिधी - गोपाल उगले
Published on: 22 June 2021, 06:42 IST