उन्हाळा लागल्याने पाण्याची टंचाई सगळीकडे भासू लागते त्यामुळे त्यामध्ये पाणी याला खूप महत्त्वाचे स्थान आहे उन्हाळा लागल्याने तीव्र उष्णता प्रत्येक प्राण्यांना जाणवणे हे साहजिक च आहे. त्यामुळे त्यांच्या शरीरात सुद्धा पाण्याची ची टंचाई भासू लागते. प्रत्येकाला पाण्याची नितांत गरज असते जसे माणसाला पिण्यासाठी, वापरण्यासाठी लागते. तसे च इतर प्राण्यांना सुद्धा पाण्याची नितांत गरज असते ती पिण्यासाठी. त्यामुळे उन्हाळा लागला की आपण पाण्याचा वापर अत्यंत सावधगिरीने केला पाहिजे. जेवढे पाणी लागते तेवढ्याच पाण्याचा वापर केला पाहिजे व आपल्या सोबतच अनेक जीवांना सुद्धा पाण्याची गरज पूर्ण होऊ द्यायला पाहिजे. तर आज आपण जाणून घेणार आहोत कृष्णाच्या कालावधीत शेतीत पाणी व्यवस्थापन गरजेचे आहे. ते कशा प्रकारे करावे
शेतकरी बंधूंनो सध्या राज्यात ऊष्णतेची लाट वाढत आहे.पारा 45 अंश सेल्सिअस च्या वर जात आहे.या कालावधीत पिकास ठिबकद्वारे पाणी पुरवठा शक्यतो रात्रीच्या वेळी किंवा ल्याटरल मधील पाणी गरम झालेले नाही हे बघूनच पाणी पुरवठा करावा.
भूपृष्ठावर मोठे, मध्यम व लघू प्रकल्पाद्वारे साठविलेले पाणी जेव्हा सिंचनासाठी वापरले जाते तेव्हा जलाशय किंवा तलावात साठविलेल्या पाण्याचा झिरपा व बाष्पीभवन, पाणी कालव्याच्या जाळ्याद्वारे प्रत्यक्ष शेतात नेईपर्यंत होणा-या पाण्याचा झिरपा तसेच प्रत्यक्ष शेतात पिकांना पाणी देताना पाण्याचा अपव्यय होतो. एका अंदाजाद्वारे जलाशयातील झिरपा व बाष्पीभवनाद्वारे १५ ते २0 टक्के व कालव्याच्या जाळ्यातून वहन प्रक्रियेत २० ते ४० टक्के पाण्याचा अपव्यय होतो. यापैकी मोठ्या जलाशयातून झिरपा व बाष्पीभवनाद्वारे पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी प्रयत्न करणे, हे व्यावहारिक नाही. कालव्याद्वारे पाणी नेताना झिरप्याद्वारे पाण्याचा अपव्यय होतो. काही प्रमाणात कालव्याच्या अस्तरीकरणाद्वारे ते टाळता येणे शक्य आहे.
पण प्रत्यक्षात अस्तरीकरणाची निगा व काळजी घेणे शक्य न झाल्याने पाणी वहन प्रक्रियेत पाण्याचा अपव्यय होतच आहे. प्रत्यक्ष शेतात पाणी देताना सिंचनाच्या विविध पद्धतींचा अवलंब केल्या जातो. त्यामध्ये प्रवाही (वाफे, सारे, सरी - वरंबा व अळे) तुषार व ठिबक पद्धती या प्रामुख्याने आहेत. साधारणतः सन १९८५ पर्यंत महाराष्ट्रामध्ये भूपृष्ठावरील व भूपृष्ठाखालील पाणी सिंचनासाठी वापरताना प्रवाही सिंचन पद्धतीचा वापर होत असे.
जलयुक्त शिवार अभियान
महाराष्ट्र राज्यात जलयुक्त शिवार हे कल्पकतेने राबविले जाणारे अभिनव असे अभियान आहे.
या अभियानाचा उद्देश सन २०१९ पर्यंत महाराष्ट्र राज्य दुष्काळमुक्त करणे हा आहे. या अभियानांतर्गत नाले व ओढे यांचे खोलीकरण व रुंदीकरण, सिमेंट तसेच मातीचेबांध बांधणे व शेततळे खोदणे इ. उपक्रम राबविले जातात.
याद्वारे साठविलेल्या पाण्याचा कार्यक्षमतेने पिण्यासाठी व शेतीसाठी वापर केल्यास उत्पादनात निश्चितच वाढ होईल. तसेच कृषि उद्योगाला चालना मिळून रोजगार निर्मिती होईल. त्याचबरोबर शेतक-यांची आर्थिक परिस्थिती सबळ होईल. त्यामुळे प्रत्येक गाव सुजलाम सुफलाम होईल. त्यासाठी साठविलेल्या पाण्याचा कार्यक्षम वापर करणे आवश्यक आहे. अशाप्रकारे जमिनीवरील पाण्याचे व्यवस्थापन करून कमी पाण्यात जास्तीतजास्त उत्पादन घेण्यास शेत-यांना भरपूर वाव आहे.
ज्यावेळेस माती तापलेली असते व आपण पिकास पाणी देतो त्यावेळेस तापलेल्या मातीतील पाणीसुद्धा गरम होते व मुळांना इजा पोहचवते. यामुळे मूळकुज सारख्या रोगाचा प्रादुर्भाव होऊन झाड़े कोमेजु लागतात(यालाच आपण डंपिंग असे म्हणतो).
हे टाळण्यासाठी खालील उपाययोजना कराव्यात
1)पाणी शक्यतो सकाळ/संध्याकाळ/रात्रीच्या वेळेस द्यावे.(लाईटची वेळनुसार)
2)ठिबक संचाच्या नळ्या व त्यातील पाणी ऊष्णतेने तापलेले असल्यास पाणी देणे थाबवावे.
3)शक्य असल्यास (पिकाची अवस्था बघून)दररोज पाणी पुरवठा न करता एक दिवसाच्या अंतराने करावा. जेणेकरून पाण्याची बचत होऊन वाफसा राखण्यास मदत होईल व पाण्याचीही बचत होईल.
4)पानी पुरवठ्या वेळी प्रति एकरी 3 kg गुळ + ट्राइकोडर्मा 2 kg ठिबकद्वारे दर 7 ते 8 दिवसाच्या अंतराने ऊष्णता कमी होइपर्यंत द्यावे.
कृषी तज्ञ दत्तात्रय ढीलागे
Published on: 09 March 2022, 01:57 IST