Agripedia

महाराष्ट्रातील कापूस उत्पादक पट्ट्यात गेल्या 5/6 दिवसापासून पिकांना जीवदान मिळेल असा पाऊस सुरू आहे, हा पाऊस सर्वच पिकांना उपयुक्त ठरणार आहे. ह्या वर्षी मृग नक्षत्रातच पेरण्या झाल्या, पण त्या वाया गेल्या. वेळेवर कापसाची लागवड न झाल्यामुळे वाढ कमी झाली, थोडा उशिरा पण वेळेवर पाऊस पडल्यामुळे काही भागात कापसाचे पीक अतिउत्तम स्थितीत आहे.

Updated on 03 September, 2021 11:31 PM IST

ह्या वर्षी. प्री मान्सून कापसावर रसशोषक किडही कमी आहे, 55 ते 60 दिवसाचा कापूस झाल्यावरही कीडनाशक फवारणीची आवश्यकता भासली नाही, त्यामुळे कीटकनाशकांच्या पहिल्या 2 फवारण्या टळल्या. जुलै/ ऑगस्ट महिन्याच्या अमावसेला जो सेन्द्रि अळीचा अटॅक होता तो खूपच सौम्य होता, क्वचित काही शेतात अळी पाहायला मिळाली, शेतकऱ्यांनी अळी नाशकांचा फवारणी करून अळी वर नियंत्रण मिळवले.

       मित्रानो पोळ्याच्या अमावश्येनंतर येणारा अळीचा अटॅक ,सौम्य नसेल 6 सप्टेंबर नंतर आपल्या कापसावर मोठ्या प्रमाणात डोमकल्या व सेंद्रि अळी दिसू लागतिल.

 

आणि आताही आपल्या बीटी कापसाच्या शेतात बोन्ड अळीने मोठ्या प्रमाणात थैमान घातले आहे, असा बाऊ आता केला जाईल. (कीडनाशकांची मोठ्या प्रमाणात विक्री करण्यासाठी) तुमच्या शेतात चांगले निरीक्षण केल्यास असे दिसून येईल की ,जी नॉन बीटी ची कापसाची झाडे तुमच्या शेतात आहेत त्यावरच अळी असेल, बीटीच्या झाडावरहि असेल पण बीटीच्या झाडात अळी प्रतिबंधक जीन्स असल्यामुळे पान, फुल झाडाचे काहीही अळीने खाल्ले तरी ती मरेल ,कारण 85/90 दिवसापर्यंत बीटीचे जीन्स प्रतिकार क्षम असतात. पण जी नॉन बीटीचे झाड शेतात आहेत त्यावरची अळी मरणार नाही, आणि अशा नॉन बीटीच्या झाडात अळी प्रतिबंधक जीन्स नसल्यामुळे त्या कापसाच्या झाडावर ऑक्टोबर/नोव्हेम्बर् एन्ड पर्यन्त अळी पडतच राहणार आहे. कारण सर्वच कंपन्यांनी 25 ग्रॅम नॉन बीटी बियाणे 450 ग्रॅम बियाण्यातच मिक्स करून दिलेले आहे, (कृषी खात्याच्या आदेशामुळे) आणि ती झाडं आपल्या शेतात विखुरलेल्या स्वरूपात आहेत, शेतात चांगले निरीक्षण करा,तुमच्या लक्षात येईलच.

सेंद्रि अळी

 

बोन्ड अळीच्या नियंत्रणासाठी कामगंध सापळे

 

गुलाबी बोन्डअळीचे पतंग जे एक पतंग किमान अंदाजे १८० ते २०० अंडी घालते. त्याचे नियंत्रण करण्यासाठी किंवा त्याचा प्रादुर्भाव किती प्रमाणात झाला आहे. हे जाणुन घेण्यासाठी कामगंध सापळे कपाशीच्या झाडाच्या दीड ते दोन फुट उंचीवर एकरी 5 ते 6 , शेतामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी लावावे. पण कामगंध सापल्यामुळे सेंद्री अळी नियंत्रित होईलच असे नाही. हे पतंग पाऊस पडल्यावर कोषातून बाहेर येतात व त्यांचे आयूर्मान 2 महिने असते, त्या 2 महिन्याच्या काळात ज्या अमावश्या येतात त्या त्या वेळी ते अंडी घालतात.

 

 आपण कापूस लागवड केल्यानंतर मशागत करतो व जमिनीत गाडल्या गेलेले कोष पुन्हा बाहेर येतात, व ते पुढे 2 महिने , असे चक्र चालूच राहते, हे पतंग 1 ते दीड किलोमीटर पर्यन्त उडू शकतात, आणि कापसाचे जे पीक लुसलुशीत दिसते त्यावर अंडी घालतात. यावर्षी 13, 18, आणि 28 जूनला पाऊस पडून पेरण्या झाल्या , पन त्या वाया गेल्या. आयुर्माणाच्या हिशोबाने ते पतंग मरून गेले काहींना पक्षांनी खाल्ले, 13 जून ते आज पर्यंत जंगलात खायला काहीच नव्हते ,पक्षांनी खाल्ल्यामुळे पतंगाची संख्या कमी झाली ,शेतकऱ्यांनी फवारे मारले त्यातही ते नाहीसे झाले.काही शेतकऱ्यांनी कामगंध सापळे लावले त्यातही थोड्याफार प्रमाणात अळीचे पतंग अडकले. 6 सप्तेम्बर् नंतर तुम्ही तुमच्या कापसाचे निरीक्षण करा, नॉन बीटीच्याच झाडावर ही अळी सापडेल, त्यासाठी घाबरून जाण्याचे कारण नाही.

    मित्रानो या आजच्या (6सप्तेम्बर्) अमावस्ये नंतर येणारा अळीचा अटॅक सौम्य नसेल, मोठ्या प्रमाणात अळी आपल्या कापसावर पाहायला मिळेल, तरी घाबरून जाऊ नका. तद्न्य व्यक्तीचा सल्ला घ्या, मार्ग निश्चितच निघेल.

 

   दोन गोष्टी करा, मार्ग निघेल

 

(1)

कापुस पिकाला युरिया हे खत जास्त टाकु नका युरियामुळे पीक लुसलुशीत होते,म्हणजे एक प्रकारे ते माजावर येते, आणि जास्त प्रमाणात रोग ,किळ,अळी पिकावर पडतात.

(२) नियोनिकोटींन गटातील कीडनाशके आलटून पालटूनच फवारावीत, कारण त्यामुळे पिकाची प्रतिकार क्षमता कमी होते.

मोनोक्रोटोफॉस , असीफेट + इमिडकलोरप्राईड यांची कापूस पिकावर फवारणी केल्यामुळे झाडांची रोग प्रतिकार शक्ती कमी होते व कापूस हे पीक रोगाला लवकर बळी पडते ,तसेच लुसलुसीत कापसावर गुलाबी बोंड अळीचा पतंग लवकर आकर्षित होतो.

कापुस फुल अवस्थेमधें आल्या नंतर म्हणजेच 60 ते 90 दिवसाचा झाल्यावर योग्य ती व योग्य प्रमाणात फवारणी करावी चांगल्या प्रकारे गुलाबी अळीवर नियंत्रण मिळेल.

 

  अमावश्या आणि अळी

 

मित्रानो, कापूस या पिकावर अळी पडण्याचा कालावधी हा ठरलेला असतो, आणि तो म्हणजे अमावश्या सर्व सजीव श्रुष्टीचा मीलन आणि फलन काळ हा अमावस्या असतो, प्रत्येक महिन्याच्या अमावाश्येला एक दोन दिवस मागे पुढे, म्हणजे महिन्याच्या ज्या 4/5 काळ्याकुट्ट रात्री असतात, त्या रात्री अळीचे पतंग अंडी घालतात, हि अंडी पिकांच्या लुसलुशीत पानावर ,पातीच्या देठावर घालतात, हि अंडी साधारणतः 48 ते 72 तासात उबवतात

 {ते तापमानावर अवलंबुन असते, तापमान कमी असेल ,तर 4/5 दिवसात हि उबवतात}     

 त्यातून अतिशय सूक्ष्म अळी जन्माला येते ती साध्या डोळ्यांनी दिसत नाही इतकी सूक्ष्म असते, ती प्रथम फुलात जाते व एक दोन दिवसांनी फुलांच्या पाकळ्या आतून वळतात फुलांचा रंग फिकट जांभळट होतो , तीच डोमकली तयार होते. 2/4 दिवसात हि अळी फुलांच्या आत असलेल्या लहान कैरीच्या आत जाते, कैरीच्या आत गेल्यावर तिची संपूर्ण अवस्था तेथेच पूर्ण होते, अळी ज्या मार्गाने कैरी गेलेली असते तो मार्ग अळीच्या विस्ट मूळे, किँवा कैरीच्या वाढीमुळे बंद होतो व आपल्याला माहितीही पडत नाही की कैरीत अळी आहे ते. आणि म्हणूनच या अळीला कोणतेही किळनाशक मारू शकत नाही, तुम्ही ती कैरी रात्रभर किळनाशकात बुडवून ठेवली आणि दुसऱ्या दिवशी फोडून पहिली तरी ,ती जीवन्त सापडेल. या सेंद्री अळीचे आयुर्मान 35 दिवसाचे असू शकते.

 

      मित्रानो आपण ह्या अळीला मारू शकत नाही, *या अळीवर नियंत्रन् करायचे असेल तर , अमावस्येच्या 2 दिवस अगोदर म्हणजे 4 आणि 5 सप्तेम्बर्ला ,फक्त सिलिकॉन स्टिकर आणि निमतेल,किँवा निंबोळी युक्त अर्काची फवारणी करा.

 

आणि 8 ते 12 सप्टेंबर या कालावधीत अंडीनाशक व अळी नाशकांची फवारणी करावी. किंवा अळीअति सूक्ष्म अवस्थेत पण कैरीच्या आत जाण्याच्या अगोदरच अळी नाशक फवारा मारून तिचा बंदोबस्त करावा. सेंद्रि अळी व्यतिरिक्त काटेरी अळी, हा एक प्रकारचा कीडा असतो त्याने कापसाच्या कैरीला डंख मारल्यामुळेही कैरी सडते किंवा किडते त्याचाही बंदोबस्त केला पाहिजे. त्यासाठी या पुढे ज्या काही अळी नाशकांच्या फवारण्या कराल त्या पॉवर पंपाने किंवा पेट्रोल पंपानेच करा म्हणजे म्हणजे अळी, अंडी,रसशोषक किडी आणि काटेरी अळी किंवा किडा {काल ग्रुप वर टाकलेला लेख वाचा व् त्या किड्या चा फोटो हि पहा.} या सगळ्यांचा बंदोबस्त होईल, व कापसाच्या कैरीचे सौरक्षण होईल.

 

     सेंद्रीअळी वर उपाय

 

     अळी कैरीत गेल्यामुळे आपण तिला मारू शकत नाही, आपल्या हातात फक्त अंडी नासवणे आणि प्राथमिक अवस्थेतील बारीक अळी मारणे हेच उपाय शिल्लक राहतात. म्हणून अमावस्ये नंतर चे 4 दिवस महत्वाचे असतात, आणि या 4 दिवसात जर आपण योग्य ती आणि योग्य प्रमाणात किळनाशक फवारणी केली तर 90% सेंद्री अळी चे नियंत्रण करू शकतो.

 

     उपाय

 

अमावस्येच्या 2 दिवसांनी म्हणजेच 8 ते 12 सप्टेंबर दरम्यान खालील फवारणी करावी.प्रमाण 15 लिटरच्या पंपासाठी आहे.

निमतेल किंवा नीम अर्क 40 मिली

सिलिकॉन स्टिकर 5 मिली प्रोफेनोफोस+सापरमेथ्रीन 40 मिली,

कारबेनडीझम 40 ग्रॅम(बुरशीनाशक)

 

        किंवा

 

निंमतेल किँवा निंबोळी अर्क 40 मिली

सिलिकॉन स्टिकर 5 मिली

प्रोफेनोफोस(प्लेन) 40 मिली

इमा मेक्तिन् 10 ग्राम

कारबेंडिझम 40 ग्रॅम (बुरशीनाशक)

 

वरील दोन पैकी कोणतीही एकच फवारणी करावी.निमयुक्त औषध आणि प्रोफेनोफोस हे अंडी नाशक व बारीक अळी मारण्याचे काम करते, कोणत्याही परिस्थितीत बोगस कृषी सल्लागागारांच्या सांगण्यावरून किंवा कीड नाशक कंपन्यांच्या भपकेबाज जाहिरातीला अजिबात बळी पडू नका.

 

टीप कोणत्याही परिस्थितीत प्रोफेनोफॉस, क्लोरोपायरीफॉस, लगातार 2 वेळा कापूस पिकावर फवारू नका त्यामुळे कापूस पिकाची पाने पिवळी पडून पानगळ होते.हा माझा अनुभव आहे.

या पुढे प्री मान्सून च्या कापूस पिकाला 8 सप्टेंबर ची एक, आणि 18/20 सप्टेंबरला 2री अशा दोन फवारण्या ह्या अळी आणि रसशोषक किडी साठीच कराव्या लागतील. जे शेतकरी न चुकता वरील 2अळी नाशक फवारण्या करतील,त्यांचे कापसाचे उत्पन्न चांगले येईल हे मी खात्रीने सांगतो.

 

प्रा.दिलीप शिंदे

भगवती सिड्स ,चोपडा, जिल्हा जळगाव

9822308252

प्रतिनिधी - गोपाल उगले

 

English Summary: festival of bull and bollwarm relationship
Published on: 03 September 2021, 11:31 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)