Agripedia

केंद्र सरकार आणि राज्य सरकार सर्वसामान्यांसाठी अनेक योजना राबवत असते. ज्यामधून त्यांना आर्थिक चांगला लाभ मिळेल. सध्या आरोग्य विम्याकडे बऱ्याच लोकांचा कल वाढला आहे. मात्र आरोग्य विमा घेताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी? याविषयी आपण जाणून घेऊया.

Updated on 31 October, 2022 5:02 PM IST

शेतकरी आपल्या शेतीमध्ये (agriculture) अधिक उत्पादनासाठी नवनवीन पिके घेत असतात. यासह पिकांच्या वाढीसाठी नवनवीन पद्धतींचा वापर देखील करतात. मात्र तरीही शेती पिकांमध्ये शेतकऱ्यांना पाहिजे तसे उत्पन्न मिळत नाही.

आज आपण अशाच एका पद्धतीविषयी जाणून घेणार आहोत, ज्यामधून शेतकऱ्यांना चांगले उत्पादन मिळेल. पाण्याबरोबर खते देण्याच्या प्रकारास फर्टिगेशन असे म्हणतात. ठिबक सिंचन पद्धतीत पाण्याद्वारे पाण्यात विरघळणारी खते योग्य त्या प्रमाणात व पिकांच्या गरजेनुसार देतात येतात.

या पद्धतीत पिकांच्या मुळांच्या जवळच खत आणि पाणी दिलं जातं. त्यामुळे खत (Fertilizing) आणि पाणी यांची वापरक्षमता वाढते. ठिबक सिंचनातून युरिया, डायअमोनियम फॉस्फेट व म्युरेर ऑफ पोटॅश ही खते देता येतात. परंतु ही खते अगोदर पाण्यात विरघळवून घ्यावी लागतात.

काय सांगता! या झाडाची साल, लाकूड, पाने विकून शेतकरी कमवू शकतात लाखों रुपये; वाचा...

ठिबक सिंचनाव्दारे (drip irrigation) खते देण्याचे अनेक फायदे आहेत. द्रवरूप खत पिकांच्या मुळांद्वारे लवकर शोषली जातात. त्यामुळे खतांचा अपव्यय टळतो. त्यामुळे खतमात्रेत २५ ते ५० टक्के बचत होते. तर पाण्यामध्ये ३० ते ५० टक्के बचत होते, व उत्पादनात वाढ होण्याची दाट शक्यता असते.

अतिवृष्टीचा तब्बल 29 लाख शेतकऱ्यांना मोठा फटका; शेतकरी नुकसान भरपाई मदतीच्या प्रतीक्षेत

ठिबक सिंचनातून खते दिल्यास होणारे फायदे

१) पिकांच्या वाढीच्या अवस्थेनुसार आणि गरजेनुसार आवश्यक त्या प्रमाणात खत शेतकऱ्यांना देता येईल.
२) दर्जेदार व अधिक उत्पन्न मिळते. पीक (crops) लवकर तयार होते. उत्पादनात १५ ते २० टक्के वाढ होते.
३) जमीनीच आरोग्य अबाधित राखलं जात व मजुरीच्या खर्चात बचत होते.
४) ट्रवरूप खतातून पिकाला लागणारी सर्वच्या सर्व अन्नद्रव्य एकाच वेळी दिली जातात.
५) पिकांच्या वाढीच्या अवस्थेनुसार आणि गरजेनुसार आवश्यक खते मिळतील.

महत्वाच्या बातम्या 
आता वीजबिलाच टेंशन मिटणार! शेतकऱ्यांसाठी सरकारची खास योजना; जाणून घ्या संपूर्ण प्लॅन
तरुणांसाठी खुशखबर! सरकारच्या या योजनेअंतर्गत व्यवसायासाठी मिळणार 1 लाख रुपयांपर्यंत बिनव्याजी कर्ज
सावधान! हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वी शरीर देतं रेड अलर्ट; वेळीच घ्या काळजी

English Summary: Fertilizing crops through drip irrigation increase yield
Published on: 31 October 2022, 04:52 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)