Agripedia

केळी लागवड म्हणजे सोनं उगवण्याची संधी… पण शहाणपणानं शेती केली तरच! आज अनेक शेतकरी केळी लागवड करत आहेत. बाजारभाव चांगला, मागणी मोठी… पण त्यासाठी लागणारी भांडवली गुंतवणूकही मोठीच! त्यातच सर्वाधिक खर्च होतो तो — खते टाकण्यात.

Updated on 26 June, 2025 6:03 PM IST

केळी लागवड म्हणजे सोनं उगवण्याची संधी… पण शहाणपणानं शेती केली तरच!

आज अनेक शेतकरी केळी लागवड करत आहेत. बाजारभाव चांगला, मागणी मोठी… पण त्यासाठी लागणारी भांडवली गुंतवणूकही मोठीच! त्यातच सर्वाधिक खर्च होतो तो — खते टाकण्यात.

पण एक गोष्ट बऱ्याचदा दुर्लक्षित होते… ती म्हणजे माती परीक्षण!

“अंधारात दिवा न घेता चालणं म्हणजे धोका…

तसंच माती न तपासता खते घालणं म्हणजे खर्चात भर घालणं!”

केळीला खरेच अधिक खते लागतात का?

हो, केळी ही अन्नद्रव्यांची मोठ्या प्रमाणात मागणी करणारी पिकं आहे.

पण 'अधिक' म्हणजे काय? किती? कोणती खते? केव्हा?

हे सर्व तुमच्या मातीच्या स्थितीवर अवलंबून आहे.

जर मातीमध्ये आधीपासूनच नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅश, किंवा काही सूक्ष्म अन्नद्रव्यं पुरेशा प्रमाणात असतील, तर ते पुन्हा घालणं म्हणजे… उगाच खर्च!

माती परीक्षणामुळे काय कळतं?

- मातीतील pH (सामू), EC (विद्युत वाहकता)

- नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅश यांचं प्रमाण

- सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता

- सेंद्रिय कर्बाचे प्रमाण

- मातीची पोत आणि क्षारता

अंधपणे खते टाकल्याचे परिणाम:

- खर्चात अनावश्यक वाढ

- मातीचा पोत बिघडतो

- झाडांची वाढ मंदावते

- उत्पादन घटते

- शेवटी शेतकऱ्याच्या नफ्यावर परिणाम

- माती परीक्षणाचे फायदे:

- खतांचा अचूक डोस

- उत्पादनात वाढ

- माती आरोग्य टिकवणं

- खर्चावर नियंत्रण

- दीर्घकाळ टिकणारी शाश्वत शेती

शेवटचा विचार:

"माती न तपासता खते टाकणं म्हणजे

डोळे झाकून पैसे जमिनीत गाडणं!"

शहाणपण हेच सांगतं की,

केळी लागवडीपूर्वी माती तपासणी करून,

अन्नद्रव्यांच्या गरजेनुसार खते द्या,

आणि आपल्या श्रमाचं, जमिनीचं आणि पैशाचं पूर्ण मूल्य मिळवा!

लेखक: नितीन रा. पिसाळ

पशुसंवर्धन सल्लागार व कृषी अभ्यासक*

📞 फार्मर द जर्नलिस्ट- कृषी जागरण

English Summary: "Fertilizing bananas without testing the soil is like burying money in the ground with your eyes closed!"
Published on: 26 June 2025, 06:03 IST