Agripedia

शेतकरी आपल्या शेतीतून चांगले उत्पादन मिळविण्यासाठी नवनवीन खतांचा वापर करतात. मात्र प्रमाणित खतांचा वापर करणे देखील तितकेच महत्वाचे आहे. काही खते शेतकऱ्यांनी वापरू नयेत, असे आवाहन कृषी विभागाने दिले आहे. याविषयी आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया.

Updated on 18 October, 2022 5:13 PM IST

शेतकरी आपल्या शेतीतून चांगले उत्पादन (production) मिळविण्यासाठी नवनवीन खतांचा वापर करतात. मात्र प्रमाणित खतांचा वापर करणे देखील तितकेच महत्वाचे आहे. काही खते शेतकऱ्यांनी वापरू नयेत, असे आवाहन कृषी विभागाने दिले आहे. याविषयी आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया.

खरीप आणि रब्बी हंगामासाठी तुम्ही खते खरेदी करण्याचा विचार करीत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. कृषी सहसंचालकांनी तब्बल 19 कंपन्यांच्या खतांचे नमुने अप्रमाणित आढळल्याने त्याच्यावर बंदी घातली आह.

ही खते शेतकऱ्यांनी खरेदी करू नये, असे आवाहन देखील आवाहन कृषी विभागाकडून (Agriculture Department) करण्यात आले आहे. खरीप आणि रब्बी हंगामाच्या पार्श्वभूमीवर कृषी निविष्ठांच्या गुणवत्तेची खात्री करण्यासाठी विभागीय कृषी सहसंचालक मोहन वाघ यांच्या आदेशानुसार विविध प्रकारच्या खतांचे तब्बल 92 नमुने तपासणी घेण्यात आले होते.

मोदी सरकारने आखला मोठा प्लॅन! बी-बियाणे, खते व माती परीक्षणाची सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध

यातून 19 खतांचे नमुने अप्रमाणित आढळल्याने ही खत (Fertilizer) विक्री करण्यावर संपूर्ण राज्यात बंदी घालण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी ही खते खरेदी करू नये, असे आवाहन देखील आता कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

ही खते खरेदी करू नये

शेतकऱ्यांनी जिंकेटेड एस एस पी, रामा फॉस्फेट उदयपूर, कृषक भारती को-ऑपरेटिव्ह चिलेटेड फेरस, सायन्स केमिकल्स नाशिक (Science Chemicals Nashik), एस एस पी के पी आर, ऍग्रो केम (Agro Chem), यासह विविध 19 खतांचे नमुने अप्रमणित आढळून आल्याने ही बंदी घालण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.

तुती लागवडीतून शेतकरी कमवू शकतात लाखों रुपये; रोपवाटीकेचे करा असे नियोजन

खतांमधील इनग्रेड (Ingred) कमी झाल्याने ते अप्रमाणिक करण्याचे आदेश कृषी सहसंचालकांनी दिले आहेत. यापार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी या रासायनिक खतांची खरेदी करू नये, असे आवाहन देखील करण्यात आले आहे.

दरम्यान, या खतांवर संपूर्ण राज्यात बंदी घालण्यात आल्याने शेतकऱ्यांनी देखील आता सतर्क होणे गरजेचे आहे. अप्रमणित झालेल्या खतांचा काळाबाजार रोखण्याचे देखील आव्हान आता कृषी विभागासमोर निर्माण झाले आहे.

महत्वाच्या बातम्या 
LIC ची नवीन योजना लाँच; फक्त एकाच गुंतवणुकीवर मिळणार १० पट संरक्षण कव्हर
दिलासादायक! आता 'भारत' ब्रॅन्डने होणार अनुदानित खतांची विक्री; शेतकऱ्यांना होणार 'असा' फायदा
सावधान! दिवाळीचा फराळ वर्तमानपत्रावर ठेवू नका; होऊ शकतात गंभीर आजार, जाणून घ्या

English Summary: Fertilizers Important News Ban sale many 19 fertilizers state Agriculture Department
Published on: 18 October 2022, 05:09 IST