Agripedia

सोलापूर जिल्ह्यात चक्क खतामद्धे मिठाची बेसळ आढळल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणानंतर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे (Balasaheb Shinde) यांनी सर्वच तालुका कृषी अधिकाऱ्यांची या विषयावर स्वतंत्रपणे बैठक घेऊन कृषी केंद्रांची तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत.

Updated on 28 July, 2022 4:14 PM IST

सोलापूर जिल्ह्यात चक्क खतामद्धे मिठाची बेसळ आढळल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणानंतर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे (Balasaheb Shinde) यांनी सर्वच तालुका कृषी अधिकाऱ्यांची (Agriculture Minister) या विषयावर स्वतंत्रपणे बैठक घेऊन कृषी केंद्रांची तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत.

खतांचे नमुने, प्रयोगशाळेत चाचण्या तसेच किती नमुने घेतले, किती तपासणीला पाठवले, याबाबतचा सविस्तर अहवाल येत्या ३० जुलैपर्यंत देण्याचे आदेशही यावेळी त्यांनी दिले आहेत. नामवंत ब्रॅण्ड्च्या नावावर भेसळयुक्त खतांची (Adulterate Fertilizer) विक्री करून शेतकऱ्यांना गंडवण्याचे काम सुरू आहे.

हे ही वाचा 
Gas cylinder free: सरकार 3 गॅस सिलिंडर मोफत देणार; पहा तुम्ही आहात का लाभार्थी

त्यामुळे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे यांनी तातडीने गुणनियंत्रण अधिकाऱ्यांसह जिल्ह्यातील सर्वच तालुका कृषी अधिकारी, तंत्र अधिकारी आणि पंचायत समित्यांच्या कृषी अधिकाऱ्यांची बैठक घेऊन जिल्ह्यात सलग पाच दिवस (२५ ते २९ जुलैपर्यंत) कृषी केंद्रांची तपासणी करण्याची सूचना केली आहे.

हे ही वाचा 
Heavy Rain: सावधान! पुढील दोन दिवस मुसळधार पाऊसाचा इशारा; शेतकऱ्यांना बसू शकतो फटका

तसेच युद्धपातळीवर मोहीम म्हणून हा कार्यक्रम राबवावा, मुख्यतः विद्राव्य खतांचे (पाण्यात विरघळणारे) सर्व ग्रेडचे विविध कंपनीनिहाय खतांचे नमुने काढून तपासणी करावी, तसेच प्रयोगशाळेत चाचणीसाठी पाठवा, असे आदेश दिले.

शिवाय हे नमुने कशा पद्धतीने घ्यावेत, यासाठीही एका फॉर्मचा नमुना त्यांनी अधिकाऱ्यांना दिला आहे. त्यात संबंधित कृषी केंद्रांकडे ग्रेडनिहाय एकूण उपलब्ध साठा किती आहे, उत्पादन कुठून आयात केले, किती नमुने घेतले, त्याचा तपशील नोंदवण्यास सांगितले आहे.

महत्वाच्या बातम्या 
Kisan Credit Card: ...आणि शेतकरी वडिलांच्या मृत्यूनंतर बँकेने मुलाला दिले 15 लाख रुपये; जाणून घ्या नेमकं प्रकरण
Solar Panel: शेतकरी मित्रांनो; सोलर पॅनल बसवून मिळवा 24 तास मोफत वीज, सरकार देतंय 'इतके' अनुदान
Crop Management: शेतकरी मित्रांनो; आडसाली उसाचे करा 'असे' व्यवस्थापन, मिळेल भरघोस उत्पन्न

English Summary: Fertilizers adulterated announcement Agriculture Minister
Published on: 28 July 2022, 04:11 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)