Agripedia

Fertilizer Rate: देशात शेती मोठ्या प्रमाणात केली जाते. तसेच शेती करत असताना बऱ्याचदा रासायनिक खतांचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. मात्र या रासायनिक खतांच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांवर जास्तीचा आर्थिक बोजा पडत आहे. डीएपी खतांच्या नवीन किमती जाहीर कारण्यात आल्या आहेत.

Updated on 17 October, 2022 1:53 PM IST

Fertilizer Rate: देशात शेती मोठ्या प्रमाणात केली जाते. तसेच शेती करत असताना बऱ्याचदा रासायनिक खतांचा (Chemical fertilizers) वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. मात्र या रासायनिक खतांच्या किमती (Fertilizer prices) गगनाला भिडल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांवर (Farmers) जास्तीचा आर्थिक बोजा पडत आहे. डीएपी खतांच्या (DAP fertilizer) नवीन किमती जाहीर कारण्यात आल्या आहेत.

अलीकडे अनेक राज्यांमध्ये डीएपीच्या दराबाबत जोरदार चर्चा सुरू झाली आहे. ऑक्टोबर 2022 च्या सुरुवातीपासून देशात नवीन किमतीत खत विकले जात आहे, त्यामुळे शेतकरी खूप अस्वस्थ आणि त्रस्त दिसत आहे.

खताचे दर वाढण्याचे मुख्य कारण पहा

या खतांच्या कच्च्या मालाच्या (Raw materials) किमतीत आणखी वाढ झाल्यामुळे देशात खत बियाणांच्या किमतीत वाढ झाल्याचे खत कंपन्यांचे मत आहे. तर, देशात वापरल्या जाणार्‍या खतांमध्ये ९०% कच्चा माल हा परदेशातून येतो आणि कच्च्या उत्पादनांच्या किमतीत वाढ झाल्याने खर्चात झालेली वाढ हे प्रमुख कारण सांगितले जात आहे.

तेल कंपन्यांकडून पेट्रोल आणि डिझेलचे दर जाहीर! पहा देशात कुठे मिळतंय सर्वात स्वस्त आणि महाग पेट्रोल डिझेल

डीएपीच्या एका पोत्याचे सध्याचे दर पहा

सध्या बाजारात येत असलेल्या कंपोस्ट खतातील डीएपीची किंमत 200 रुपये प्रति 50 किलोग्रॅम बॅग वरून 1350 रुपये प्रति बॅग करण्यात आली आहे. खत कंपन्यांनी डीएपी खतांच्या दरात प्रचंड वाढ केल्याने रब्बी पिकांची पेरणी करणाऱ्या शेतकऱ्यांना शेती करणे महागणार आहे.

खतांचे नवे दर

डीएपी खत - 1350/-
कॉम्प्लेक्स NPK 20:20:0:0 - 700.00
नीम कोटेड युरिया - 266.50/- (45 किलो बॅग)
NP 20-20-0-13 – 950/
NPK 12-32-16 – 1470/

राज्यातील केळी उत्पादक संकटात! वाढत्या रोगाचा प्रादुर्भाव पाहता उत्पादन घटण्याची शक्यता

अनुदानाशिवाय डीएपीच्या गोणीचा दर

तुम्हाला सांगतो की आज अनुदानाशिवाय डीएपी खताचा खरा दर, डीएपीच्या एका पॅकेटची किंमत - 4073 रुपये 50 किलो बॅग, ज्यावर सरकार अनुदान देत आहे. देशातील शेतकऱ्यांना 350 रुपये प्रति 50 किलो दराने उपलब्ध करून दिले जात आहे.

महत्वाच्या बातम्या:
कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! 8 व्या वेतन आयोगापासून किती पगार वाढू शकतो; जाणून घ्या...
महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना आजही वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा; अलर्ट जारी

English Summary: Fertilizer Rate: New DAP Fertilizer Rates Announced; Know the new prices
Published on: 17 October 2022, 01:53 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)