Agripedia

लिंबू हे पीक संवेदनशील असते त्यामुळे आवश्यक असणाऱ्या अन्नद्रव्यांचा पुरवठा कमी पडला तर त्या झाडावर विपरीत परिणाम लगेच दिसून येतो.त्यामुळे सेंद्रिय आणि रासायनिक खतांचा योग्य प्रमाणात वापर करणे आवश्यमक आहे.या लेखामध्ये आपणलिंबू च्या झाडा वरून झाडाला कुठल्या अन्नद्रव्याची कमतरता आहे हे कसे ओळखावे ते पाहू.

Updated on 21 September, 2021 1:46 PM IST

 लिंबू हे पीक संवेदनशील असते त्यामुळे आवश्यक असणाऱ्या अन्नद्रव्यांचा पुरवठा कमी पडला तर त्या झाडावर विपरीत परिणाम लगेच दिसून येतो.त्यामुळे सेंद्रिय आणि रासायनिक खतांचा योग्य प्रमाणात वापर करणे आवश्‍यक आहे.या लेखामध्ये आपणलिंबू च्या झाडा वरून झाडाला कुठल्या अन्नद्रव्याची कमतरता आहे हे कसे ओळखावे ते पाहू.

 

 लिंबू पिकासाठी आवश्‍यक अन्नद्रव्य

  • नत्र:नत्रहे अन्नद्रव्यांचे संतुलन चक्र असून यामुळे इतर अन्नद्रव्ये उपलब्ध होण्यास मदत होते.लिंबूला बहार येण्यासाठी नत्राची आवश्‍यकता आहे. जेव्हा लिंबूला बहार येतो त्यावेळी पानांमधील नत्र हा फुलांमध्ये जातो. त्यामुळे फुले टिकून राहतात व फळधारणा होते.नत्रामुळे झाडाची वाढ जोमाने होते.पानांचा रंग गर्द हिरवा होतो आणि अधिक उत्पादन मिळते.

 नत्राच्या कमतरतेची लक्षणे

जर झाडाला नत्राची कमतरता असेल तर झाडाची पाने व शिरा पिवळ्या पडतात.  झाडाची वाढ खुंटते व झाडावर सलयेते.कळ्यांचा आकार लहान होऊन उत्पादनात घट येते व झाडाचे आयुष्य कमी होते.

  • स्फुरद:स्फुरद मुळे झाडाला नवीन पालवी फुटते व पेशींची निर्मिती होते. मुळांची वाढ भरपूर होते व फळांचा आकार मोठा होऊन उत्तम प्रतीचे उत्पादन होते.

 

स्फुरदच्या कमतरतेची लक्षणे

 याच्या कमतरतेमुळे अन्नरस निर्माण होण्याची क्रिया मंदावते. झाडाची वाढ खुंटतेव फळधारणा कमी होते. फळाची प्रत बिघडते व अपरिपक्व फळांची गळ होते.लागलेल्या कळ्या सुप्तावस्थेत राहूनसुकतात व झाडाचे पाने निस्तेज दिसतात.

 

  • पालाश: पालाश मुळे पेशींचे विभाजन होते पालाश मुळे झाड रोगास व किडीस बळी पडत नाही. पाण्याचा ताण व कडाक्याची थंडी सहन करण्याची क्षमता वाढते व फळांची प्रत सुधारते व उत्पादनात वाढ होते.

 पालाशच्या कमतरतेची लक्षणे

 पालाशच्या कमतरतेमुळे पानगळ होते.मोठ्याझाडाच्या शेंड्याकडील वाढ खुंटते आणि लहान झाडे कमजोर फुटवे फुटतात. जास्त कमतरता असल्यास पाने वाकडी होतात व अपरिपक्व फळे गळतात.

 काही दुय्यम अन्नद्रव्यांच्या कमतरतेची लक्षणे

  • कॅल्शियम:त्याच्या कमतरतेमुळे पानातील शिरा पिवळ्या पडतात व पाने परिपक्व होणे अगोदर गळून पडतात.

 

  • गंधक :गंधकाच्या कमतरतेमुळे लिंबू झाडाची पाने पिवळी पडतात व फळांची साल जाड दिसून येते. फळे रस विरहितहोतात.
  • तांबे: तांब्याच्या कमतरतेमुळे झाडांची पाने व शिरा रंगहीन बनतात.
  • लोह: लोहाच्या कमतरतेमुळे फळांवर काळे ठिपके दिसून येतात व पानांचा आकार लहान होऊन पाने गळतात.
  • बोरॉन: याच्या कमतरतेमुळे पाने कोमेजतात व वाकडी होतात. पाने गळतात व फळे लहान व कठीण होतात.

 

English Summary: fertilizer management of lemon crop
Published on: 21 September 2021, 01:46 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)