Agripedia

महाराष्ट्र हे देशातील पहिल्या क्रमांकाचे कांदा उत्पादक राज्य आहे.महाराष्ट्र मध्ये कांदालागवड ही प्रामुख्याने खरीप,रांगडा, रब्बी आणि उन्हाळी हंगामात केली जाते.तसेमहाराष्ट्राचे हवामान हे वर्षभर कांदा लागवडीसाठी पोषक आहे.

Updated on 26 September, 2021 9:07 PM IST

महाराष्ट्र हे देशातील पहिल्या क्रमांकाचे कांदा उत्पादक राज्य आहे.महाराष्ट्र मध्ये कांदालागवड ही प्रामुख्याने खरीप,रांगडा, रब्बी आणि उन्हाळी हंगामात केली जाते.तसेमहाराष्ट्राचे हवामान हे वर्षभर कांदा लागवडीसाठी पोषक आहे.

महाराष्ट्रातील 37 टक्के कांदा क्षेत्र एकट्या नाशिक जिल्ह्यात आहे. कांदा पिकाचे व्यवस्थित नियोजन केल्यास भरपूर उत्पादन मिळते.योग्य पाणी व्यवस्थापन,अचूक खत व्यवस्थापन,रोग व कीड व्यवस्थापन त्या गोष्टींवर कांद्याचे उत्पादन अवलंबून असते.या लेखात आपण कांदा पिकाचे खत व्यवस्थापनाची पद्धत पाहणार आहोत.

कांदा पिकाला खत देताना कसे द्यावे?

 प्रामुख्याने कांदा पिकाला शिफारशीप्रमाणे खते देताना ही 30 टन  शेणखत व 100 किलो नत्र,50 किलो स्फुरद आणि 50 किलो पालाश लागते. यापैकी नत्र स्फुरद आणि पालाश या विचार केला तर लागवडीपूर्वी 50 किलो नत्र, 50 किलो स्फुरद आणि 50 किलो पालाश मातीत मिसळून द्यावे व राहिलेले 50 किलो नत्र 40 ते 45 दिवसांच्या आत द्यावे. यानंतर कांदा पिकाला कुठल्याही प्रकारचे रासायनिक खत देऊ नये.

झऱ्याचा प्रति हेक्‍टरी विचार केला तर दोन बॅग युरिया, सहा बॅग्स सिंगल सुपर फॉस्फेट आणि दोन बॅक मुरेट ऑफ पोटॅश द्यावे किंवा 18:46 दोन बॅग, युरिया 1 ते 1.25 बॅग व दोन बॅग मुरेट ऑफ पोटॅश किंवा 10:26:26चार बॅग, युरिया एक ते दीड बॅग द्यावा. 

जर सिंगल सुपर फॉस्फेटचा वापर नाही केला तर 50 किलो 300 मेश गंधक भुकटी पर हेक्टर मातीतटाकावी.जर काही शेतकऱ्यांनी लागवडीच्या वेळी कोणत्याही प्रकारचे खत दिले नसेल किंवा फार कमी प्रमाणात दिले असेल तर कांदा 45 दिवसाच्या होण्याच्या आत वरील प्रमाणे खतमात्रा देऊन टाकावी व ते खतंखुरप्याच्या साह्याने बुजून द्यावे. (माहिती स्त्रोत- होय आम्ही शेतकरी)

English Summary: fertilizer management in onion crop
Published on: 26 September 2021, 09:07 IST