Agripedia

ब्रोकोली हा एक परदेशी भाजीपाला आहे. ब्रोकोली आणि आपल्या नेहमीच्या खाण्यातील कोबी यांची कुळ, जाते आणि प्रजाती एकच आहेत या भाजीचे मुळस्थान इटली हेच आहे. जगाचा विचार केला तर ब्रोकोली उत्पादनामध्ये चीन प्रथम स्थानी आहे. त्याखालोखाल स्पेन, मेक्सिको,इटली, अमेरिका, फ्रान्स इत्यादी देशांचा चा नंबर लागतो. भारतामध्ये ब्रोकोलीची लागवड प्रामुख्याने हिमाचल प्रदेश, उत्तर प्रदेश, जम्मू आणि काश्मिर आणि महाराष्ट्रामध्ये केली जाते. या लेखामध्ये आपण ब्रोकोली या भाजीपाला पिकासाठी करावयाच्या खत व्यवस्थापनाबद्दल माहिती घेणार आहोत.

Updated on 03 October, 2021 9:52 AM IST

अशा पद्धतीने करा ब्रोकोली या पिकासाठी खत व्यवस्थापन

 सर्वप्रथम माती परीक्षण करुन जमिनीतील उपलब्ध मुख्य व सूक्ष्म अन्नद्रव्ये ची माहिती द्यावी. त्यानुसार खत व्यवस्थापन करावे. एकरी 60 किलो नत्र, 40 किलो स्फुरदआणि 70 किलो पालाश देणे आवश्यक आहे. खतांचे पीक वाढीनुसार चे टप्पे शिफारशीनुसार द्यावीत.गड्यांची काढणी झाल्यावर पानांच्या बेचक्यातून येणाऱ्या गड्ड्यांची  वाढ होण्यासाठी एकरी 30 किलो नत्र द्यावे.

 माती परीक्षण अहवालाप्रमाणे मॉलिब्डेनम आणि बोरॉन ही सूक्ष्म अन्नद्रव्ये जमिनीतून द्यावे.लागवडीपासून अंदाजे 25 ते 30 दिवसांनी या अन्नद्रव्यांची कमतरता असलेल्या झाडाची खोडे पोकळ झालेली आढळून येतात. तसेच ब्रोकोली चा गड्डा काढणीस तयार झालेल्या अवस्थेत गड्डा कापला असता लहान खोडेपोकळ झाल्याचे आढळून येतात.गड्डयाचा चा हिरवा रंग फिकट होत जातो. गड्यावर भुरकट रंगाचे डाग पडतात. अशा प्रकारच्या गड्यांना बाजारात भाव मिळत नाही.

 बोराणा ची कमतरता असल्यास खोड पोकळ होणे आणि गड्यांचा हिरवा रंग फिकट होणे ही लक्षणे आढळून येतात यावर उपाय म्हणून लागवडीनंतर 25 ते 30 दिवसांनी एकरी चार किलो बोरॅक्‍स जमिनीतून द्यावे. लागवडीनंतर 60 दिवसांनी पुन्हा चार किलो बोरॅक्‍स जमिनीतून द्यावे. ब्रोकोली पानाच्या झाडाच्या शेंडा खुरटलेल्या राहणे व गड्डा न भरणेही मॉलिब्डेनम या सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता आहे. विशेष म्हणजे आमलीय जमिनीत ही विकृती जास्त दिसून येते. यावर उपाय म्हणजे एकरी एक दीड किलो ग्रॅम अमोनियम किंवा सोडियम मॉलिबडेट जमिनीत मिसळून द्यावे.

अशा पद्धतीने करा ठिबक द्वारे खत व्यवस्थापन

 उच्च प्रतीचे गड्डे, जास्त उत्पादन मिळविण्यासाठी खतांच्या मात्रा विद्राव्य खतांच्या माध्यमातून ठिबक  सिंचनाद्वारे पाण्याबरोबर पिकांच्या वाढीच्या अवस्थेनुसार देता येतात. प्रत्येक खताचे द्रावण देण्यापूर्वी द्रावणाचा व पाण्याचा सामू साडे पाच ते साडे सहाच्या दरम्यान असावा. तसेच पाण्याची विद्युत धारकता एक पेक्षा कमी असेल याची काळजी घ्यावी. सामू चे प्रमाण निश्चित करण्यासाठी नायट्रिक आम्ल याचा उपयोग करावा.

English Summary: fertilizer management in foreign vegetable crop brokoli
Published on: 03 October 2021, 09:52 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)