Agripedia

शेतात चांगले पीक येण्यासाठी शेतकरी अनेक खतांचा वापर करत असतात. अलीकडे शेतकरी वर्गामध्ये डीएपी खताची मागणी मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. शेतकरी आपल्या पिकांसाठी डीएपी खतांचा वापर जास्त प्रमाणात करू लागलेले आहेत. पण डीएपी खतांची अतिशय महत्वाची वैशिष्टे तुम्हाला माहिती आहेत का ? चला तर मग जाणून घेऊया याबद्दल...

Updated on 11 September, 2022 2:21 PM IST

शेतात चांगले पीक येण्यासाठी शेतकरी अनेक खतांचा वापर करत असतात. अलीकडे शेतकरी वर्गामध्ये डीएपी खताची मागणी मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. शेतकरी आपल्या पिकांसाठी डीएपी खतांचा वापर जास्त प्रमाणात करू लागलेले आहेत. पण डीएपी खतांची अतिशय महत्वाची वैशिष्टे तुम्हाला माहिती आहेत का? चला तर मग जाणून घेऊया याबद्दल.....

डीएपी म्हणजेच डी आमोनियम फॉस्फेट 1960 मध्ये याची सुरुवात करण्यात आली.डीएपी हे सध्या शेतकरी वर्गातील अतिशय लोकप्रिय खत बनले आहे. या खतामध्ये नायट्रोजनचे प्रमाण 18 टक्के तर फॉस्फरसचे प्रमाण 46 टक्के इतके आहे.

याचसोबत 39.5 टक्के विद्राव्य फॉस्फरस, 15.5 टक्के अमोनियम नायट्रेट देखील यामध्ये आढलुन येते. हे खत 50 किलोच्या पॅकमध्ये शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करण्यात येते.

डीएपी खताचा वापर केल्याने शेतातील रोपाची वाढ आणि विकास चांगला होतो. पिकांना आवश्यक असणाऱ्या पोषक तत्वांचा पुरवठा देखील या खतामुळे होतो.

महाराष्ट्रासह 'या' राज्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता; हवामान विभागाकडून सावधानतेचा इशारा

सध्या DAP ची नवीन किंमत किती आहे तुम्हाला माहितेय का ?

तर शेतीसाठी सर्वात जास्त वापरण्यात येणारे डीएपी खत भारतीय बाजारपेठेत शेतकऱ्यांना अनुदानासह व विनाअनुदान या तत्त्वावर दिली जातात. वीणा अनुदानित 50 किलो असणाऱ्या गोणीची किंमत 4073 रुपये इतकी आहे तर अनुदानित असणाऱ्या 50 किलो गोनीची किंमत 1350 रुपये इतकी करण्यात आलेली आहे.

सोने तब्बल 5323 रुपयांनी स्वस्त; आता 10 ग्रॅम सोने मिळणार फक्त 29706 रुपयांमध्ये

दरम्यान, शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीसाठी किती खत लागेल आणि शेतकऱ्यांना शेतीसाठी किती खत मिळावे याची माहिती मिळवण्यासाठी सरकारकडून शेतकऱ्यांसाठी खतांची यादी देखील प्रसिद्ध करण्यात येते. यामुळे खतांमधील काळाबाजार रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणात मदत होते.

महत्वाच्या बातम्या
पशुपालकांसाठी दिलासा देणारी बातमी; सरकार 2 लाख रुपयांपर्यंत करणार मदत
एलआयसीच्या 'या' योजनेत फक्त एकदाच पैसे जमा करा; आयुष्यभर खात्यात 50,000 रुपये येतील
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ‘या’ दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार पैसे

English Summary: fertilizer boon farmers Getting lot profit
Published on: 11 September 2022, 02:16 IST