Agripedia

आपण आपल्या मातीला वाचवण्यात सहभागी व्हा! आजचा मुख्य मुद्दा माझ्या शेतकरी बांधवांन साठी म्हणून समजून घ्यावे विचार बदला जिवन बदलेल !माझा पुर्ण लेख वाचा व प्रतिसाद नोंदवा ही हाथ जोडून विनंती आहे.

Updated on 05 May, 2022 9:56 PM IST

मित्रांनो आपल्या शेतकर्याच दु:ख काय आहे हे तोच समजु शकतो आजची परिस्थिती काय आहे एक तर वातावरणात होणारा बदल व दुसरं म्हणजे उत्पादनात घट होण्याच कारण म्हणजे नापीक जमिन त्या मुळे आपल्याला जसं पाहिजे तसं पिकतच नाही शेती मधे ऐवढी मोठी ढोरं मेहनत करून आपन पिकवतो आपला तोच शेतमाल कमी भावात विकावा लागतो.

मि सांगितलेल्या या दोन्ही समस्यांचे कारण काय असु शकते ते म्हणजे आपन शेती बाबत अपडेटच नाही आहोत. 

आता हेच बघा आपल्या जवळ थोडेसे पैसे आले कि ते उत ऊत करतो. आपले नखरे चालु होतात आपल्याला स्मार्टफोन पाहिजे ,बाईक ही नविन पाहीजे,बैल नको ट्रॅक्टर पाहीजे , पिकाच नविन वाण पाहिजे व संकरित पाहीजे.सर्व काही डिजीलायजशन पाहीजेत. पन शेती मधे खत नाही त्यामुळे जमिनित कसं नाही.ते असं होतं की "घर मै नही दाने अम्मा चली भुनाणे" अशी अवस्था आपली झाली.आज सर्वच आपल्याला नविन पाहिजे मग आपल्याला तंत्रज्ञान भुतकाळातले का?

शेती मधे पिकांना बाहेरच कुजलेले खाऊ घालायचे वरतून ते पुन्हा कुजवायला वेस्ट डिकंपोझर !आता तुम्हीच सांगा निकच काडी कचरा टाकून पिकाचे पोषन कशे होईल हो मित्रांनो या कुंभकर्णरुपी झोपेतून तुम्ही जागे व्हा आपल्या शेती बाबतच्या नकारात्मक विचार हे तुमची प्रगती होऊच देत नाही आपन पिकाकडे फक्त पैशाचे साधन म्हनून पहाण्याची भुमिका ही बंद करा. या बाबत काही शेतकरी यांची भुमिका भोळी भाबडी असते पैसे संपला की शेती ला वैतागून अशास्रीय जैविक शेती च माध्यम सुरू करायचं 

नंतर प्रयोग करून करून जमिनीतली सुपिकता संपली की पिकनेच बंद होते. या बाबत आपण अज्ञानी असतो मग आपन काय करतो की नेटवर्क मार्केटिंग कंपन्यांच्या लोकांकडून मिळनार्या जैविक निविष्ठा वापरु लागतो.या मधे फक्त आंधळा विश्वास माहीत असुन सुद्धा न माहीत असल्या सारखं शेवटी बळी आपला जातो.सगळीकडून फिरुन पुन्हा येथे च वापस दोष स्वताला द्यायचा.कोणीतरी आपले भले करेल हा समज मनात ठेउन त्यांना शोधात बसायचं.
लेखक - मिलीद गोदे
प्रगतशील शेतकरी, जैविक शेती मार्गदर्शक
अमरावती
English Summary: Fertility of agriculture and mentality of farmers.
Published on: 05 May 2022, 07:35 IST