Agripedia

जमिनीची सुपीकता कमि होत आहे दिवसेंदिवस जमिनीचा दर्जा घसरत आहे. जमिनीचा जिवंतपणा कमी होत चाललेला आहे. त्या निमित्ताने जमीन चेआरोग्य व्यवस्थापन चे उपाय करणे आवश्यक आहे.

Updated on 18 December, 2021 3:20 PM IST
आपल्या जमिनीचा कमी-अधिक उतार, डोंगर रांगा आणि जमिनीचा उंच-सखलपणा जमिनीची धूप करण्यास कारणीभूत ठरतो. म्हणून पावसाच्या पाण्याला अडवून जल आणि मृदसंधारणासाठी छोटया जलसंधारण क्षेत्राची उभारणी करणे आवश्यक आहे. छोटया नाल्यांना योग्य आकार देऊन त्यावर बांधबंदिस्ती करावी, त्यामुळे जमिनीची धूप कमी होईल.
जमिनीचा सजीवपणा प्रामुख्याने जमिनीतील सेंद्रिय द्रव्यांच्या प्रमाणावर आणि गुणधर्मावर अवलंबून असतो. सेंद्रिय खत म्हणजे शेणखत, कंपोस्टखत, हिरवळीचे खत, प्रेसमड, गांडूळखत या सर्व सेंद्रिय द्रव्यांवरच जमिनीचे सर्व गुणधर्मामुळे नियंत्रण करणा-या सेंद्रिय कर्बाचे प्रमाण अवलंबून असते. सेंद्रिय खताच्या नियमित वापराने जमिनीत योग्य प्रमाणात सेंद्रिय कर्ब स्थिरावतो. सूक्ष्म जीवाणूंची संख्या आणि जैविक प्रक्रियांमध्ये समतोल निर्माण
 करून, जमीन सच्छीद्र राहते, प्राणवायूचे प्रमाण वाढते,

निचराशक्ती, जलवाहकता आणि जलधारणक्षमता वाढते. जमिनीचा सामू स्थिरावून पीक पोषक अन्नद्रव्यांची उपलब्धता वाढते.

जेथे सेंद्रिय खते कुजलेल्या स्वरूपात उपलब्ध नसतात, जेथे शेतातील पिकांचे अवशेष, पालापाचोळा, वसकटे, मुळया निरनिराळया पिकांपासून मिळणारा भुसा उसाचे पाचट इ. जमिनीत मिसळून नांगरणी केल्यास जमिनीमध्ये सेंद्रिय कर्बाचे काही प्रमाण वाढते.

जेथे कमी प्रमाणात सेंद्रिय खते, सेंद्रिय पदार्थ आणि हिरवळीची खते उपलब्ध आहेत, तेथे एकात्मिक खत पुरवठा पद्धतीचा वापर करणे योग्य ठरते. एकात्मिक खत पुरवठा पद्धतीमध्ये रासायनिक खते, सेंद्रिय खते, हिरवळीची खते, जीवाणूखते, स्फुरद विद्राव्य, जीवाणू संवर्धने, द्विदल धान्यांचे अवशेष, इ.योग्य प्रमाणात वापर केल्यास ती एकमेकांस पूरक ठरून तसेच उभय पिकाची कार्यक्षमता वाढवितात.

जमिनीचा दर्जा आणि पर्यावरण संतुलन टिकविण्यासाठी, माती परीक्षण अतिशय महत्त्वाचे आहे. 

खतांचा समतोल वापर नत्र, स्फुरद, पालाश या खतांपुरताच मर्यादित न ठेवता कमतरता असलेल्या इतर अन्नद्रव्यांचा देखील समतोल खत नियोजनात करावा.
दिवसेंदिवस सुपीक जमीन अकृषीक योजनांसाठी वापरण्याची प्रवृत्ती वाढत आहे. अधिक उपजाऊ शक्तीच्या सुपीक जमिनीच्या अकृषीक वापरांवर बंदी आणण्यासाठी कायद्याचा आधार घ्यावा लागेल. जमिनीच्या संवर्धनाच्या दृष्टीने शेतजमीन सुधारणा कायदाअवलंब होणे महत्त्वाचे आहे.
माती आणि व्यवस्थापनाचे वेगळे नियोजन न करता दोन्ही नैसर्गिक संपदांचा संयुक्त विचार व्हावा. पावसावर अवलंबून असलेल्या भागात ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ 

या पाणलोट विकास कार्यक्रमाचा प्रभावीपणे वापर करावा.तरच भविष्य जमिन मधील सुपिकता टिकवून राहील.

 

मिलीद गोदे

Mission agriculture informatin

milindgode111@gmail.com

English Summary: Fertility and soil quality
Published on: 18 December 2021, 03:20 IST