Agripedia

सापळे हे शेतातील कीटकांना आकर्षित करण्यासाठी मादीच्या गंधाचा वापर केला जातो. त्यासाठी जो सापळा वापरतात त्यात कीटक पकडले जातात,या सापडला पण कामगंध सापळा असे म्हणतो.निसर्गामध्ये काही कीटक हे शेतकऱ्यांचे मित्र असतात

Updated on 25 November, 2021 12:21 PM IST

 सापळे हे शेतातील कीटकांना आकर्षित करण्यासाठी मादीच्या गंधाचा वापर केला जातो. त्यासाठी जो सापळा वापरतातत्यात कीटक पकडले जातात,या सापडला पण कामगंध सापळा असे म्हणतो.निसर्गामध्ये काही कीटक हे शेतकऱ्यांचे मित्र असतात

नुकसान करणाऱ्या कीटकांचा नाश करतात.तसेच पिकाला हानिकारक किंवा शत्रू कीटकांचासमतोल राखून या मित्रकीटकांची संख्या आर्थिक पातळीच्या खाली ठेवून अत्यंत अल्प साधनसामग्री मध्ये कीड नियंत्रण करणे म्हणजेच कीड व्यवस्थापन होय. या लेखात आपण  कामगंध सापळे वापरण्याची पद्धत व सापळ्याची कार्यपद्धती जाणून घेऊ.

  कामगंध सापळे

शेतकरी आळी चा बंदोबस्त करायचा असेल तर कामगंध सापळ्यांचे उभारणी करतात.यामध्ये सर्वसाधारणपणे मादीपतंगाच्या काम गंधा द्वारे नर पतंगांना आकर्षित करून सापळ्यात पकडून त्यांचा नाश करून म्हणजेच त्यांच्या मिलना मध्ये बाधा निर्माण करून पतंग वर्ग किडींचे व्यवस्थापन करण्यासाठी फेरोमन चा मोठ्या प्रमाणात वापर वाढत आहे. सर्वसाधारणपणे पीक संरक्षण उपाय सुरू करण्यापूर्वी सापळ्यात कमीत कमी किती पतंग अडकले आहेत याची खात्री करा.सोयाबीन पिकात स्पोडोप्टेरा या किडीच्या सरासरी आठ ते दहा नर पतंग सतत दोन ते तीन दिवस आढळून आल्यास या किडीच्या व्यवस्थापनासाठी चे उपाय करणे आवश्यक आहे.

कामगंध सापळ्यांचे कार्य

  • तेव्हा शेतात किडींचे प्रमाण हे खूप असते अशावेळी कामगंध सापळ्यांचा वापर केला जातो.त्यामुळे किडीचे पतंग पकडण्यास मदत होते.
  • जर आपण जास्त कामगंध सापळे वापरले तर मोठ्या प्रमाणात पतंग पकडण्यास मदत होते. परिणामी त्यांची पुढची प्रजनन क्षमता कमी होते.
  • या कारणामुळे कीटकांच्या मिलनास खूप अडथळे तयार होतात.
  • कीटकांच्या मिलना मध्ये अडथळा आणणारी लिंग प्रलोभन रसायनाचे कण वातावरणात सोडल्या कारणाने कीटकांना मिलनासाठी आपला जोडीदार शोधणे कठीण होते. त्यामुळे पुढील पिढी निर्माण होण्यास किंवा जन्माला येण्यास अडचणी निर्माण होतात.
  • पुढील किडी जन्माला न आल्यामुळे  कीटकांच्या संख्येत लक्षणीय घट होताना दिसते.

कामगंध सापळे वापरतांना घ्यावयाची काळजी

  • सापळ्यात अडकलेले पतंग दोन ते तीन दिवसांनी काढून नष्ट करावे.
  • कीटक निहाय सापळे वापरावेत.
  • सर्वेक्षण करत असताना प्रत्येक जातीच्या कीटकाला एकरी पाच सापळे बसवावे.
  • मोठ्या प्रमाणात किटकांचे पतंग पकडायचे असेल तर हेक्‍टरी 15 ते 20 सापळे वापरावे. 15 ते 20 दिवसांनी सापळायांमधील  प्रलोभने बदलावी.
  • पिकांच्या उंचीनुसार जमिनीपासून दोन ते तीन फुटांवर सापळे बसवावे.
  • लिंग प्रलोभनं रसायनांचे कण हवेत व्यवस्थित पसरावे व जास्तीत जास्त पतंग सापळ्यात अडकावे.  यासाठी सापळा वाऱ्याच्या दिशेने समांतर असावा.
English Summary: feroman trap is useful in insect management in crop
Published on: 25 November 2021, 12:21 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)