Agripedia

जैविक पीक संरक्षणाच्या पद्धतीमध्ये प्रत्यक्षात एखाद्या पिकांवर व्हायरस फवारला जातो. व्हायरस म्हटले म्हणजे आपण दचकतो. परंतु काही व्हायरस हे पिकाला हानिकारक नसतात.ते पिकांवर च्या काही नुकसानदायक अळ्यांना मारक असतात. एनपीव्ही हा असाच एक वायरस आहे.

Updated on 28 December, 2021 10:37 AM IST

जैविक पीक संरक्षणाच्या पद्धतीमध्ये प्रत्यक्षात एखाद्या पिकांवर व्हायरस फवारला जातो. व्हायरस म्हटले म्हणजे आपण दचकतो. परंतु काही व्हायरस हे पिकाला हानिकारक नसतात.ते पिकांवर च्या काही नुकसानदायक अळ्यांना मारक असतात. एनपीव्ही हा असाच एक वायरस आहे.

हा व्हायरस पिकावर चाळीवर पडतो आणि तिला संपवून टाकतो. जैविक कीडनियंत्रण मध्ये बर्‍याच पद्धती येतात. त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या ट्रॅप्स देखील समावेश आहे. या लेखात आपण कामगंध म्हणजेच फेरोमन सापळे यांची  कार्यपद्धती जाणून घेऊ.

 फेरोमन ट्रॅप ( कामगंध सापळे)

कीटकांमध्ये नर मादी संबंध असतात. नर कीटक मादीला कडेतिच्या शरीराच्या वासावरून आकर्षित होतो. मादी कुठे लपली आहे हे त्याला तिच्या शरीराच्या वासावरून समजते. या वासाला किंवा गंधाला कामगंध असे म्हणतात. प्रत्येक किटकामध्ये प्रत्येक मादीच्या शरीराचा हा कामगंध वेगवेगळा असतो.

 या सर्व गंधांच्या आणि वासाचा  अभ्यास करून प्रयोगशाळांमध्ये अशाच प्रकारचा गंध असलेली काही रसायने तयार केले जातात. ही रसायने एका काचेच्या नळीत भरून ती नळी  एका प्लास्टिकच्या सापळ्यात ठेवलीजातात.असा हा सापळा पिकात ठेवला कि त्यावासाच्या  अनुरोधाने नर कीटक सापळे याकडे आकृष्ट होतो. तो त्या काचेच्या नळीच्या आसपास घोटाळन्याचा प्रयत्न करतो. त्यातच तो सापळ्यात अडकतो आणि मरतो. या पद्धतीने तुर, वाटाणे, हरभरा इत्यादी पिकांवरील घाटे आळी, कापसा वरील बोंड आळी, शेंडे आळी,अमेरिकन बॉलवोर्म तसेच वांगी, भेंडी आणि टोमॅटो पिकावरील किड यांचा बंदोबस्त करण्यात यश आलेले आहे.

हा नर एकदा सापळ्यात सापडला की मरण पावला की मग या कीटकांची पैदास एकदम संपून जाते. हा कामगंध सापळा एकदा खरेदी केला की तो दोन वर्षे टिकतो. परंतु त्यामधील कामगंध रसायन मात्र 20 ते 25 दिवसाला बदलावे लागते.या पिकांमध्ये कामगंध सापळे लावायचे असतील त्या पिकाच्या उंचीपेक्षा एक फूट अधिक उंचीची काठी घेऊन त्या काठीला हे सापळे लावले जातात. एका एकरात किमान चार तरी सापळे लावावेत. कामगंध सापळे विविध आकारात आणि प्रकारात बाजारामध्ये उपलब्ध असतात. अशाच प्रकारच्या काही सापळा यांना स्टिकीट्रॅप असे देखील म्हणतात.

English Summary: feroman trap is most useful for bacterial insect management
Published on: 28 December 2021, 10:37 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)