Agripedia

भारतात खूप मोठ्या प्रमाणात मसाला पिकांची लागवड नजरेस पडते.मसाला पिकांची लागवड करून शेतकरी बांधव चांगलीच कमाई करत आहेत.मसाला पिकाची बारामाही मागणी असल्याने या पिकांची शेती शेतकरी बांधवांसाठी वरदान ठरू शकते.

Updated on 27 February, 2022 1:45 PM IST

भारतात खूप मोठ्या प्रमाणात मसाला पिकांची लागवड नजरेस पडते.मसाला पिकांची लागवड करून शेतकरी बांधव चांगलीच कमाई करत आहेत.मसाला पिकाची बारामाही मागणी असल्याने या पिकांची शेती शेतकरी बांधवांसाठी वरदान ठरू शकते.

अशाच मसाला पिकांपैकी एक पीक आहे बडीशेपचे हे देखील एक महत्वपूर्ण मसाला पिक आहे.बडीशेप साठी संपूर्ण भारतात अनुकूल वातावरण असल्याचे सांगितले जाते, राजादेखील बडीशेप पिकासाठी अनुकूल वातावरण आहे.

 बडीशेपचीलागवड मुख्यता:रब्बी हंगामात करण्याची शिफारस केली जाते. बडीशेप पिकाला जास्त पावसामुळे नुकसानीचा धोका असतो. त्यामुळे याची लागवड रब्बी हंगामात करण्याची शिफारस केली जाते. शिवाय रब्बी हंगामात रोगराईचा प्रसार हा जवळपास नगण्य असतो. त्यामुळे बडीशेप लागवड रब्बी हंगामात केल्यास त्यापासून  दर्जेदार उत्पादन प्राप्त होते. शेतकरी मित्रांनो आज आपण रब्बी हंगामात बडीशेप लागवड नेमकी कशीकरायची तसेच बडीशेप पिकासाठी उपयुक्त जमीन आणि हवामान शिवाय बडीशेप पिकापासून मिळणारे उत्पन्न या विषयी सविस्तर जाणून घेणार आहोत. चला तर मग मित्रांनो वेळ न दडवता जाणून घेऊया बडीशेप शेती विषयी महत्त्वाच्या बाबी.

  • बडीशेप पिकासाठी जमीन व पूर्वमशागत :-

 बडीशेप पिकाची लागवड चांगला पाण्याचा निचरा होणाऱ्या जमिनीतकेल्यास उत्पादन चांगले मिळते. बडीशेप लागवड करण्यापूर्वी जमिनीची पूर्वमशागत करणे महत्त्वाचे असते. जमिनीची पूर्वमशागतसाठी सर्वप्रथम जमीन दोन-तीन वेळाचांगली नांगरुन भुसभुशीत करून घ्यावी. त्यानंतर फळी मारून जमीन सपाट करण्यात यावी. जमीन सपाट केल्यानंतर मागील हंगामातीलपिकांचे अवशेष गोळा करून जाळून टाकावे. पूर्व मशागत केलेल्या जमिनीत बडीशेप लागवड साधारणात:ऑक्टोंबर महिन्यात केली जाते. या महिन्याच्या पहिल्या आठवड्यात बडीशेप लागवड केल्यास त्यापासून दर्जेदार उत्पादन प्राप्त होत असल्याचे सांगितले जाते. बडीशेपचे रोपनिर्मितीसाठी रोपवाटिकेतबडीशेपच्या बियाण्यांची पेरणी जुलै ते ऑगस्ट या दरम्यान केली जाते, दोन महिन्यात बडीशेप ची रोपे पुनर्लागवडीसाठी तयार होतात.

शेतकरी मित्रांनो आम्ही आपणास सांगू इच्छितो की रोपवाटिकेत पेरणी करण्यापूर्वीबडीशेप बियाण्यावर बीजप्रक्रिया करणे महत्वाचे  ठरते.बीज प्रक्रिया केल्याशिवाय पेरणी करू नये. अन्यथा रोपं अंकुरण होण्यास उशीर होऊ शकतो शिवाय त्यामुळे अनेक रोग रोपांना लागुशकतात. बीजप्रक्रिया करण्यासाठी बाविस्टीन नामक रासायनिक औषध एक किलो बियाण्यांसाठी दोन ग्रॅम या प्रमाणात घेऊन बीजप्रक्रिया करावी. आपण सेंद्रिय पद्धतीने देखील बीज प्रक्रिया करू शकतो. यासाठी सेंद्रिय बुर्शिनाशक ट्रायकोडर्मा दहा ग्रॅम प्रति किलो बियाणे या प्रमाणात वापरून बीज प्रक्रिया करा.

  • बडीशेप च्या सुधारित जाती :-

 भारतात बडीशेपच्या भरपूर सुधारित जाती विकसित केल्या गेल्या आहेत मात्र त्यापैकी RF-105, RF-125,PF-35गुजरात सौन्फ– 1, गुजरातसौन्फ-2, गुजरातसौन्फ -11,CO-11, हिसार स्वरूप, NRCS SSAF-1 या जातींची लागवड भारतात मुख्यत: केली जाते.

या सुधारित जाती पैकी कुठल्याही एका जातीची लागवड करून शेतकरी बांधव चांगली मोठी कमाई करू शकता

  • बडीशेप पासून मिळणारे उत्पादन :-

 बडीशेप पिकातून सुधारित जातींची लागवड करून चांगले दर्जेदार उत्पादन प्राप्त केले जाऊ शकते. शेतकरी बांधवांनो जर आपण जिरायती जमिनीत बडीशेप लागवड केली तर आपणास सुमारे एकरी पाच ते सहा क्विंटल उत्पादन होऊ शकते. उत्पादनात परिस्थितीनुसारबदलत्या हवामानानुसार तसेच पिकाच्या व्यवस्थापनानुसार थोड्याफार प्रमाणात चढ-उतार बघायला मिळू शकतो.

English Summary: fennel farming give more profit to farmer and production to fennel
Published on: 27 February 2022, 01:45 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)