Agripedia

फेब्रुवारी महिन्याच्या अंतिम टप्प्यामध्ये उन्हाळी हंगामातील पिकांची पेरणी करणे शक्य असते त्यामुळे फेब्रुवारी महिन्याचा शेवटचा आठवडा ते मार्च महिन्याचा पहिल्या आठवड्यापर्यंत उन्हाळी हंगामातील मुख्य पिकांच्या पेरणीसाठी पोषक वातावरण असल्याचे भारतीय कृषी संशोधन संस्थेच्या वतीने सांगण्यात आले आहे.

Updated on 24 February, 2022 1:22 PM IST

फेब्रुवारी महिन्याच्या अंतिम टप्प्यामध्ये उन्हाळी हंगामातील पिकांची पेरणी करणे शक्य असते त्यामुळे फेब्रुवारी महिन्याचा शेवटचा आठवडा ते मार्च महिन्याचा पहिल्या आठवड्यापर्यंत उन्हाळी हंगामातील मुख्य पिकांच्या पेरणीसाठी पोषक वातावरण असल्याचे भारतीय कृषी संशोधन संस्थेच्या वतीने सांगण्यात आले आहे.

त्यामुळे या वेळेत जर  पिकांच्या पेरण्या पूर्ण केल्या तर पिकांची वाढ जोमात होणार असून त्यामुळे उत्पादनात देखील वाढ शक्‍य होणार आहे. या कालावधीमध्ये शेतकऱ्यांनी मार्चमध्ये मूग आणि उडीद पिकांच्या पेरणीसाठी प्रमाणित बियाणे  खरेदी करण्याचा सल्ला कृषी शास्त्रज्ञांनी दिला आहे. तसेच या काळात पेरणी करणे अगोदर बियाण्याला रायझोबियम आणि फॉस्फरस विद्राव्य जिवाणू मिसळणे आवश्‍यक आहे.या बीज प्रक्रिया केल्यामुळे पिकांवर किडींचा प्रादुर्भाव रोखण्यास मदत मिळेल रोखण्यास मदतरोखण्यास मदत मिळेल.या कालावधीत मूग लागवड करायचे असेल तर पुसा विशाल, पुसा बैसाखी पी डी एम 11,एस एम एल 32,  उडीद पेरणी करायची असेल तर पंत उडीद एकोणवीस,पंत उडीत 30, पंत उडीद पस्तीस आणि पिडयू 1 या वाणाचा वापर करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

या आठवड्यामध्ये वातावरणात तापमानात वाढ होण्याची शक्यता लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी भेंडी लागवड करताना ए 4, परभणी क्रांती,अर्का अनामिकाया बियाण्याची निवड करावी.या पिकांची लागवड करण्याआधी शेत ओलित करणे गरजेचे आहे तसेच हवामानलक्षात घेऊन या आठवड्यात टोमॅटो, मिरची तसेच भोपळ्याची भाजी तयार रोपांची लागवड करू शकता.

 या कालावधीत गहू पिकाचे असे करावे व्यवस्थापन

 बदलत्या हवामानामुळे पिकांवर वेगवेगळ्या प्रकारच्या रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्‍यता असते त्यामुळे पिकांवर विशेष लक्ष ठेवणे गरजेचे आहे. सद्यस्थितीत असलेल्या वातावरणामुळे गव्हाच्या पिकातील काळा, भुरा किंवा पिवळा सट्टा आल्यावर पिकामध्ये डायथेन m45 हे अडीच ग्रॅम एक लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी लागणार आहे. गहू पिकावरील पिवळा चट्टा घालवण्यासाठी 10 ते 20 अंश सेल्सिअस तापमान चांगले असते.त्यासोबतच 25 अंश सेल्सिअसपेक्षा अधिक तापमानात हा आजार होत नाही.

तसेच गहू पिकावरील काळा चट्टा घालवण्यासाठी फवारणी करताना 20 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त तापमान आणि आर्द्रता विरहित हवामान आवश्यक असते.

 भाजीपाला आणि मोहरी पिकात होऊ शकतो या कालावधीत चेपाचाआजार…..

 सध्याचे कोरडे व वाढते तापमान लक्षात घेता सर्व शेतकऱ्यांनी सर्व भाजीपाला व मोहरीच्या पिकांमध्ये चेपाया किडीचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे या किडीच्या नियंत्रणासाठी भाजीपाल्याची तोडणी केल्यानंतर इमिडाक्लोप्रिड  0.25-0.5मिली हे एक लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी लागणार आहे. तसेच फवारणी केल्यानंतर आठवडाभर भाजीपाल्याची तोडणी करू नये.तसेच बी असलेल्या भेंडी,गव्हासारख्या भाजीपाला पिकांवर चेपा रोगाचा प्रादुर्भाव आकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे.

या कालावधीत पालेभाज्यांचे काळजी

 तापमानामध्ये वाढ होण्यास आता सुरुवात झाली असून भारतीय कृषी संशोधन संस्थेच्या वतीने आज 27 फेब्रुवारी पर्यंत सल्ला देण्यात आला आहे.पिकांची पेरणी आणि ते जोपासण्यासाठी हा सल्ला महत्त्वपूर्णआहे. या आठवड्यात वाढते तापमान व जोरदार वारे होण्याची शक्यता लक्षात घेता शेतकऱ्यांनी आवश्‍यकतेनुसार पिके व भाजीपाला हलके पाणी द्यावे असा सल्ला देण्यात आला आहे.

( स्त्रोत-tv9मराठी)

English Summary: february month appropriate for some crop cultivation expert advice about that
Published on: 24 February 2022, 01:22 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)