Agripedia

साधारणतः 1988-89 चा दिवाळीचा सण होता तेव्हा माझे वय 9-10 वर्ष असेल

Updated on 03 November, 2022 4:09 PM IST

साधारणतः 1988-89 चा दिवाळीचा सण होता तेव्हा माझे वय 9-10 वर्ष असेल माझी आई मामांकडे गेली होती तीच्यासोबत माझ्या तीन बहिणीही मामांकडे गेल्या होत्या मी आईसोबत मामांकडे न जाता वडिलांकडेच थांबलो होतो त्याकाळी आमच्या शेतामध्ये पावसाळी बाजरी, भुईमूग, उडीद,मुग, सूर्यफूल व पावसाळी लाल कांदा असायचा हे सर्व पिकं शेतात उभी असल्याने घरात ऐन दिवाळीत आर्थिक चणचण होती त्या दिवाळीत वडिलांनी मला सांगितले की उद्या आपल्याला पहाटे प्रेस गाडीने* (आमच्या गावात एक मुक्कामी एस टी बस असायची

ती आमच्या भागातील प्रेस कामगारांना घेऊन पहाटे 6 वाजता नाशिक रोड येथे निघायची) नाशिकला जायचे आहे leave at 6 am at Nashik Road) to go to Nashik घरी अगदी थोडेफार बियाण्यासाठी ठेवलेल्या कांद्यातून वडिलांनी आदल्या दिवशी कांद्याची एक गोणी भरून ठेवली होती.

वाचा पिकांसाठी मेपल इ.एम.1 हरीयाली चे फायदे

फक्त एका गोणीचे किती पैसे येणार आणि आपल्याला दिवाळीत वडील काय काय घेणार यामुळे मी प्रचंड नाराज झालो होतो दुसऱ्या दिवशी पहाटे मला लवकरच जाग आली आणि मीच वडिलांना उठवले आणि सांगितलं की दादा आपल्याला नाशिकला जायचे आहे आम्ही दोघेही सोबत तयार होऊन गावातील मारुती मंदिर

येथे एसटी बसमध्ये आमची कांद्याची एक गोणी घेऊन निघालो नाशिकला मार्केटमध्ये आल्यानंतर वडिलांनी ती कांद्याची गोणी विक्री करून आलेल्या पैशांमधून मला हॉटेलमध्ये नाश्ता त्यानंतर स्वीट आणि असे खूप काही खाऊ घातले एक नवीन ड्रेस आणि थोडे फटाकेही घेतले मी मात्र एकच विचार करत होतो की आदल्या दिवशी एकच कांद्याची गोण आहे म्हणून आपण नाराज झालो आहे परंतु त्या कांद्याच्या एकाच गोणीचे इतके पैसे आले की माझ्यासाठी वडिलांनी इतका खर्च करूही त्यांच्याजवळ पैसे शिल्लक राहिले होते.

आज त्या गोष्टीला 32 ते 33 वर्षे झाले आहे त्यानंतर भरपूर दिवाळीचे सण आले व गेले परंतु आजही त्या दिवाळीची माझ्या मनात एक सुंदर आठवण आहे कि त्या कांद्याच्या एका गोणीमुळे माझी दिवाळी आनंदात साजरी झाली होती वडिलांना आमच्यातून जाऊन दोन वर्षे झालीत त्यांच्यासोबतच्या असंख्य आठवणीं पैकी ही एक गोड आठवण आज महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचा प्रमुख म्हणून प्रत्येक शेतकरी कुटुंबातील दिवाळीचा सण असो किंवा त्या प्रत्येक कुटुंबातील मुला बाळांचे जे काही भविष्यातील स्वप्न असतील ते

पूर्ण करण्यासाठी प्रत्येक शेतकऱ्याच्या कुटुंबात आर्थिक सक्षमता निर्माण होण्याची गरज आहे आणि त्यासाठी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचा अध्यक्ष या नात्याने महाराष्ट्रातील लाखो कांदा उत्पादकांना आर्थिक सक्षम करण्यासाठी अविरतपणे लढा सुरू आहे या लढ्यात आपण प्रत्येक कांदा उत्पादक शेतकरी कुटुंबाने महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे हीच या दिवाळीच्या निमित्ताने आपल्या सर्वांकडून अपेक्षा 

 

(एकच पक्ष कांद्यावर लक्ष)

भारत दिघोळे

(संस्थापक अध्यक्ष)

9921889658

-महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघटना.

English Summary: Father, Diwali and a sack of onions, just read!
Published on: 02 November 2022, 08:45 IST