नमस्कार शेतकरी मित्रांनो भारतात शेती आणि शेतीनिगडित उद्योगात देशाची अर्ध्यापेक्षा जास्त लोकसंख्या कार्य करीत असते. आणि शेती ही गोष्ट पूर्णपणे हवामानावर अवलंबून असते साधारणतः नेहमी जस हवामान असते त्या हवामानच्या अनुषंगाने आम्ही ह्या लेखात आपणांस सप्टेंबर महिन्यात केली जाणारी शेती कार्य बद्दल अल्पशी माहिती देण्याचा प्रयत्न केलाय, त्या त्या भागानुसार ह्यात काही बदल करावा लागला तर तुम्ही तो अवश्य करा, ही माहिती आपणांस नक्कीच उपयुक्त ठरेलं.
शेतकरी बांधवांनो भारतात तीन हंगामात पिकांची लागवड केली जाते खरीप, रब्बी आणि उन्हाळी. सप्टेंबर महिन्यात रब्बी पिकांच्या लागवडीची सुरवात होते तसेच ह्या महिन्यात भाजीपाल्यांची पण मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. मित्रांनो जर तुम्ही भातशेती, भाजीपाला, फळबागा इत्यादी पिकांची लागवड करतात तर मग तुम्ही ह्या गोष्टींची विशेष काळजी घ्या.
भातपीक घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी काही सूचना
»तांदूळ साठवताना आर्द्रतेची पातळी 10-12 टक्क्यांपेक्षा कमी असावी ही बाब ध्यानात ठेवा.
»स्टोरेज रूम आणि पोते ज्यात तुम्ही तांदूळ टाकणार आहात ते निर्जंतुक केल्यानंतरच त्यात तांदूळ साठवावा.
»तांदूळ साठवण केल्यानंतर लागणाऱ्या किडींवर नियंत्रण ठेवण्यासाठी फॉस्टॉक्सिन औषध वापरा.
»झूरळ, पाली इत्यादी किड्यांपासून संरक्षण करण्यासाठी तांदुळाचा साठा ताडपत्रीने झाकून ठेवा.
भाजीपालाची लागवड करणाऱ्यांसाठी काही सूचना
»फ्लॉवरच्या पुसा सूक्ती, पुसा पौषजा प्रजातीची रोपवाटिका तयार करा. गोल्डन एकर, पुसा केब्बेज हायब्रीड 1 या जातीची कोबीची रोपवाटिका तयार करा.
» आपण पुसा भारती या जातीच्या पालकची लागवड देखील सुरू करू शकता, कृषी वैज्ञानिकांचा सल्ला अवश्य घ्या.
» 3 ग्रॅम मॅन्कोझेब आणि 1 ग्रॅम कार्बेन्डाझिम एक लिटर पाण्यात मिसळून द्रावण तयार करा आणि वांग्याच्या रोपांवर फवारा.
» लवकर गाजर च्या पुसा वृष्टी वाणीची लागवड उरकवून टाका. गाजर पिकात आढळणारा फोलियर ब्लाइट रोग टाळण्यासाठी, गाजर लागवड केल्यानंतर त्यावर थेरम 1 ग्रॅम प्रति किलो बियाणे या प्रमाणात घेऊन बिजोपचार जरूर करा त्याशिवाय लागवड करू नका.
फळबागा असलेल्या शेतकऱ्यांसाठी काही सूचना
»मान्सूनच्या पाऊसानंतर फळ देणाऱ्या आंबा झाडांना बाकी असलेले खत खाद्य लावून द्या
»जर लिंबूवर्गीय फळांमध्ये डायबॅक, स्कॅब आणि सूटी मोल्ड रोगाचा प्रादुर्भाव असेल तर एक लिटर पाण्यात 3 ग्रॅम कॉपर ऑक्सीक्लोराईड याची फवारणी करावी. लिंबूवर्गीय फळांमध्ये कॅन्कर रोगाच्या प्रतिबंधासाठी, 5 ग्रॅम. स्ट्रेप्टोसायक्लिन आणि 10 ग्रॅम. कॉपर सल्फेट औषध 100 लिटर पाण्यात किंवा 3 ग्रॅम कॉपर ऑक्सीक्लोराईड प्रति 1 लिटर पाण्यात विरघळवून झाडांना लावा.
Published on: 08 September 2021, 03:59 IST