कमी प्रमाणात का होईना पण चांगली उत्पादन घेत असतात.असे का ? त्या शेती मधे मिळणारी ही पोषण द्रव्ये कोठून मिळतात ? शेती
साठी काम करणाऱ्या तज्ञांनी ही गोष्ट मान्य केली आहे त्याचे कारण त्यांना समजले व आता आपल्याला समजणे आवश्यक आहे.कारण आहे शेती ची मशागत आता विस्ताराने सांगतोय आपल्या शेतीतल्या काही मशागतीच्या पद्धतीच शेतात खतांसारखे काम करीत असतात.
- हे वाचुन थोडं विचित्र वाटत असेल जमिनीची मशागत हे ही एक खताचे काम करत असतो. कारण मशागतीमुळे जमिनीतल्या जिवाणूंच्या वाढीस अनुकूल स्थिती निर्माण होते आणि जिवाणूंची संख्या वाढली की, पीक चांगले येते. त्यामुळेच केवळ चांगली मशागत केली तरी चालते असे म्हटले जाते. अर्थात चांगली पिके येण्यास ही मशागत उपयोगी पडेलच असे नाही. चांगली पिके येण्यासाठी त्यापेक्षा अधिक काही तरी वेगळे केले पाहिजे. वर्षानुवर्षे खते न वापरता शेती करून उत्पन्न काढणार्या शेतकर्यांना आणखी एका गोष्टीचा उपयोग होतो. तो म्हणजे पिकांची फेरपालट.
आपल्या जमिनीत आपल्या शेतीतली काही पिके जमिनीतून अन्नाची देवानं- घेवान करत असतात.काही त्यामधे काही पिकं दुसर्या पीकांचे अन्न केवळ ओढून घेणारी आहेत. तर काही पिके स्वत:ची वाढ करतात व दुसर्या पिकांना जमिनीत काही अन्न सोडून देणारी आहेत. त्यांनाच आपल्या गावरान भाषेत बिओड असे म्हणतो.
पिकांची फेरपालट हे एक कारण आहे जसे नत्रयुक्त गाठी तयार होणारे पिक म्हणजे कोणतेही पीक घेतले की, मातीत राहलेले हे नत्र त्या पिकाला आपोआप उपलब्ध होते. असे नायट्रोजन सोडणारे द्विदल धान्याचे पीक एकदा घेतले की, त्यानंतर गहू, ज्वारी असे एकदल धान्य पीक घेतले जाते आणि असा फेरपालट करीत गेलो की, वर्षानुवर्षे बाहेरची कसलीही खते किंवा शेणखत न घालता शेती करत असतो.आपला बहुसंख्य शेतकरी याच पद्धतीने शेती करीत आलेले आहेत. त्यामुळे खतांवर खर्च न करता त्यांची शेती सुरू आहे.
English Summary: Farming soil cultivation managmant
Published on: 11 January 2022, 01:28 IST
Published on: 11 January 2022, 01:28 IST