जमिनीची काळजी व जमिनीचा आरोग्य व्यवस्थापन त्याचबरोबर जमिनीमध्ये अन्नद्रव्य व इतर मूलभूत गोष्टीची कमतरता आहे त्याविषयी सखोल माहिती जाणून घेण्यासाठी माती परीक्षण करणे काळाची गरज बनली आहे शेतकऱ्यांच्या सर्व गोष्टीची सखोल माहिती व्हावी व आपल्या शेतामध्ये कोणती खते अन्नद्रव्य वापरावी याकरता सविस्तर माहिती मिळावी या साठी आपले के व्ही के घातखेड प्रतिबद्ध आहे मला व माझ्या सारख्या असंख्य शेतकरी आहे की जे कृषी विज्ञान केंद्र घातखेड शी जुळले आहे. शेती शाळा असो कि आँनलाईन वेबिनार आम्हाला या माध्यमातून शेती विषयक माहिती पुरवली जाते.मातीपरीक्षन व मृदा कार्ड वाटप हा उपक्रम नेहमी राबविण्यात येते.
आपल्या शेतकऱ्यांना सविस्तर माहिती व प्रशिक्षण देणारं माध्यम त्याच बरोबर परिसरातील शेतकऱ्यांना मोठ्याप्रमाणात कार्यक्रमाचे आयोजन वेळोवेळी पिक उत्पादन वाढीचे तंत्रज्ञान आत्मसात करत असतात. त्यांच्या मध्ये एक विशेषता म्हणजे शेवटच्या शेतकरी यांच्या पर्यंत माहिती दिली जाते.मृदा आरोग्य कार्ड माहीती व योजना राबविण्यात आली. यामध्ये पिकानुसार शिफारस आवश्यक पोषक तत्वे व त्या शेती नुसार आवश्यक असणारी खते याची सखोल माहिती दिला जाते. जेणेकरून शेतकऱ्यांना योग्य ते पीक निवडण्यास व उत्पादन वाढविण्यास मदत होऊ शकेल.
सर्व मातीच्या नमुन्याची चाचणी त्याच बरोबर विविध मृदा चाचणी प्रयोगशाळेत केल्या जातात. त्या चाचण्यांनंतर तज्ञांमार्फत त्या मातीची ताकद व दुबळेपणा पोषक सूक्ष्म पोषक तत्वांची कमतरता तपासली जाते व अशा प्रकारच्या मातीत कोणते पीक घ्यावे याचे मार्गदर्शन करत असतात.
आमच्या के व्ही के घातखेड चे उद्दिष्टे एकच –
शेतकऱ्यांना मातीपरीक्षन चाचणी केलेल्या माहितीनुसार खतांचा वापर करण्यास प्रोत्साहन देणे हा आहे. ज्याद्वारे शेतकऱ्यांना कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पादन मिळू शकेल.विविध प्रयोग करून प्रयोग शेती क्षेत्रात बळकट करणे .
जमिनीची सुपीकता व कर्ब वाढविताना मदत होईल असे मार्गदर्शन करणे
शेती मधे पोषक द्रव्यांचे व्यवस्थापन करणे.
जमिनीला खते देताना पोषकद्रव्ये कळावेत यासाठी शेतकऱ्यांना मृदाआरोग्य कार्ड बनवून देणे
लेखक- मिलीद गोदे
Published on: 14 February 2022, 11:36 IST