Agripedia

भारतात सध्या काळाच्या ओघात शेती व्यवसायात मोठा बदल बघायला मिळतं आहे. शेतकरी बांधव आता मोठ्या प्रमाणात बाजारात मागणी असलेल्या पिकांची शेती करू लागले आहेत यामुळे शेतकऱ्यांना मोठा फायदा देaखील होतं आहे. कृषी वैज्ञानिक देखील आता शेतकऱ्यांना पीक पद्धतीत बदल करण्याचा सल्ला देत आहेत.

Updated on 21 May, 2022 4:26 PM IST

भारतात सध्या काळाच्या ओघात शेती व्यवसायात मोठा बदल बघायला मिळतं आहे. शेतकरी बांधव आता मोठ्या प्रमाणात बाजारात मागणी असलेल्या पिकांची शेती करू लागले आहेत यामुळे शेतकऱ्यांना मोठा फायदा देaखील होतं आहे. कृषी वैज्ञानिक देखील आता शेतकऱ्यांना पीक पद्धतीत बदल करण्याचा सल्ला देत आहेत

शेतकरी बांधव देखील आता पीक पद्धतीत बदल करत असून फुलशेतीकडे वळू लागले आहेत. विशेष म्हणजे फुलशेती शेतकऱ्यांना मोठी फायद्याची देखील सिद्ध होतं आहे. आज आपणही आपल्या शेतकरी वाचक मित्रांसाठी रजनीगंधा या फुलाच्या शेतीविषयी माहिती घेऊन हजर झालो आहोत. चला तर मग मित्रांनो वेळ न दवडता जाणुन घेऊया या फुलाच्या शेतीविषयी महत्वपूर्ण माहिती.

Successful Farmer: झेंडूची शेती ठरली शेतकऱ्यासाठी वरदान! झेंडु शेतीतुन कमवतोय लाखों

कशी करणार रजनीगंधा लागवड 

मित्रांनो कृषी तज्ञाच्या मते, रजनीगंधा लागवड करण्यापूर्वी एकरी 6-8 ट्रॉली चांगले कुजलेले शेणखत शेतजमिनीत टाकायला पाहिजे यामुळे उत्पादनात भरीव वाढ होते. तसेच NPK किंवा DAP सारख्या खतांचाही वापर रजनीगंधाच्या चांगल्या विकासासाठी करायला हवा.

मित्रांनो खरं पाहता बटाट्यासारख्या कंदांपासून रजनीगंधा लागवड केली जाते. एक एकर शेतजमिनीत सुमारे 20 हजार रजनीगंधा कंद लागतं असतात. मित्रांनो कृषी तज्ञाच्या मते, नेहमी ताजे, चांगले आणि मोठे कंद लावले गेले पाहिजेत.

जेणेकरून शेतकऱ्यांना फुलशेतीमधून चांगले उत्पादन मिळेल. भारतात सुमारे 20 हजार हेक्‍टर क्षेत्रात रजनीगंधा फुलांची लागवड केली जाते. फ्रान्स, इटली, दक्षिण आफ्रिका, अमेरिका इत्यादी देशांमध्येही याची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते.

भावा फक्त तूच रे…! 10 गुंठ्यात ब्रॉकोली लागवड केली अन मिळवलं 2 लाखांचे उत्पन्न; वाचा काय होतं नियोजन

किती होणार कमाई 

जर शेतकरी बांधवांना एक एकरात या रजनीगंधा फुलाची लागवड करायची असेल तर त्यांना यातून सुमारे 1 लाख रजनीगंधाच्या फुलांचे उत्पादन मिळेल. रजनीगंधाची फुले शेतकरी बांधव त्यांच्या जवळच्या फुलांच्या बाजारात विकू शकतात.

शेतकरी बांधव जवळच एखादं मोठं मंदिर, फुलांची दुकानं, लग्नघर वगैरे असेल तर तिथे देखील फुलांना विकु शकतात. अशा ठिकाणी त्यांना चांगला भाव देखील मिळू शकतो. मागणी आणि पुरवठ्यानुसार एक रजनीगंधाचे फुल दीड ते आठ रुपयांना विकले जाते. म्हणजेच केवळ एक एकरात रजनीगंधा फुलांची लागवड करून शेतकरी बांधव दीड ते सहा लाख रुपयांचे उत्पन्न कमवू शकतात.

दीड एकरात फुलवला सूर्यफूलचा मळा आणि एकाच वर्षात बनला लखपती; वाचा शेतकऱ्याची यशोगाथा

English Summary: Farming Business Idea: ‘Yaa’ flower farming will provide more income to farmers; Read more about it
Published on: 21 May 2022, 04:26 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)