शेतकरी मित्रांनो शेतीतून चांगले भरगोस उत्पन्न मिळवण्यासाठी पीकपद्धतीत बदल करणे अतिशय महत्त्वाचे ठरते. कृषी क्षेत्रातील जाणकार लोक देखील वारंवार शेतकरी बांधवांना (Farmer) पीकपद्धतीत बदल (Changes in cropping pattern) करण्याचा सल्ला देत असतात. यामुळे आज आपण कायम मागणीमध्ये असलेल्या रजनीगंधा फुलाच्या शेतीविषयी (Rajnigandha flower cultivation) सविस्तर जाणून घेणार आहोत. तसं बघायला गेलं तर रजनीगंधा सुगंधित फुलांपैकी एक आहे आणि म्हणून याची मागणी बाजारात कायम असते.
रजनीगंधाची फुले (Tuberose flowers) दीर्घकाळ सुवासिक आणि ताजी राहतात. यामुळे बाजारात त्यांची मागणी बारामाही बघायला मिळते. रजनीगंधा या फुलाचे (पोलोअँथस ट्यूबरोज लिन) उगमस्थान मेक्सिको असल्याचा दावा केला जातो. हे फूल Amaryllidiaceae कुटुंबातील एक वनस्पती आहे. भारतात, पश्चिम बंगाल, कर्नाटक, तामिळनाडू, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश यासह इतर राज्यांमध्ये याची लागवड मोठ्या प्रमाणात बघायला मिळते.
कशी करणार याची शेती:- याची लागवड (Tuberose Cultivation) करण्यापूर्वी म्हणजेच पूर्व मशागतीच्या वेळी एकरी 6-8 ट्रॉली चांगले कुजलेले शेणखत शेतात टाकावे. यासाठी NPK किंवा DAP सारखे खत देखील वापरण्याचा सल्ला दिला जातो.
याची लागवड बटाट्यासारख्या कंदांपासून केली जाते आणि एका एकरात सुमारे 20 हजार कंद लागतात. लक्षात ठेवा की नेहमी ताजे, चांगले आणि मोठे कंद लावा, जेणेकरून तुम्हाला याच्या फुलशेतीमधून चांगले उत्पादन मिळेल. भारतात सुमारे 20 हजार हेक्टर क्षेत्रात या रजनीगंधा फुलांची लागवड केली जाते. फ्रान्स, इटली, दक्षिण आफ्रिका, अमेरिका इत्यादी देशांमध्येही याची लागवड केली जाते.
जर तुम्ही एक एकरमध्ये या रजनीगंधा फुलाची लागवड केली तर तुम्हाला यातून सुमारे 1 लाख काड्या (फुले) मिळतील. आपण उत्पादित केलेली फुले जवळच्या फुलांच्या बाजारात विकू शकता.
जवळच एखादं मोठं मंदिर, फुलांची दुकानं, लग्नघर वगैरे असेल तर तिथे आपण या फुलांची विक्री करू शकतो कारण की अशा ठिकाणी फुलांना चांगला भाव मिळण्याची शक्यता असते. मागणी आणि पुरवठ्यानुसार एक रजनीगंधा फुल दीड रुपयांपासून ते आठ रुपयांपर्यंत विकविकले जाते. म्हणजेच केवळ एक एकरात रजनीगंधा फुलांची लागवड केली तर यातून जवळपास दीड लाख ते सहा लाख रुपये पर्यंत कमाई होते.
Published on: 18 April 2022, 09:23 IST