Agripedia

भारतातील शेतकरी आता काळाच्या ओघात बदल करीत वेगवेगळ्या झाडांची लागवड करू लागले आहेत. शेतकऱ्यांनी शेतात केलेला हा बदल त्यांच्यासाठी आता फायदेशीर देखील ठरू लागला आहे. यामुळे मित्रांनो आज आपण मलबार कडुलिंबाची शेतीविषयी जाणुन घेणार आहोत.

Updated on 04 May, 2022 1:27 PM IST

भारतातील शेतकरी आता काळाच्या ओघात बदल करीत वेगवेगळ्या झाडांची लागवड करू लागले आहेत. शेतकऱ्यांनी शेतात केलेला हा बदल त्यांच्यासाठी आता फायदेशीर देखील ठरू लागला आहे. यामुळे मित्रांनो आज आपण मलबार कडुलिंबाची शेतीविषयी जाणुन घेणार आहोत.

मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो की, भारतातील तामिळनाडू, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि केरळ राज्यातील बहुतांश शेतकरी मलबार कडुलिंबाची शेती करत असतात.  अलीकडे याची शेती हळूहळू इतर राज्यातही आपले पाय पसरू लागली आहे. आता इतर राज्यातील शेतकरीही याच्या शेतीकडे वळू लागले आहेत. इतर झाडांच्या तुलनेत मलबार कडुलिंबाची वाढ झपाट्याने होते आणि जास्त नफा मिळतो, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

महत्वाची बातमी:खांदेशात अक्षय तृतीयाच्या दिवशी नेमला जातो नवीन सालगडी; मात्र कठीण परीक्षा करावी लागते पास; वाचा याविषयी

पाण्याची जर चांगली सोय असेल तर अवघ्या 5 वर्षाच्या कालावधीत या मलबार झाडाच्या शेतीतुन सहज उत्पादन प्राप्त करता येतं असल्याचा दावा केला जातो. म्हणजेच पाच वर्षानंतर या झाडाचा लाकडापासून उत्पन्न मिळवता येणे शक्य होते.

याशिवाय या शेतीची सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे कमी पाणी असलेल्या भागातही या झाडाची लागवड करता येणे शक्य आहे. कमी पाऊस असलेल्या भागात देखील हे झाड तग धरून राहू शकते. या झाडाची लागवड कोणत्याही प्रकारच्या जमिनीत केली जाऊ शकते. खोल सुपीक वालुकामय चिकणमाती आणि उथळ रेव जमिनीत हे झाड चांगले विकसित होते.

महत्वाची बातमी:Farmers Income : भारतीय शेतकरी शेतीतुन किती कमवतो? नाही माहिती; मग वाचा याविषयी सविस्तर

मलबार नीम हे झाड अनेक प्रकारच्या वस्तू बनवण्यासाठी वापरले जाते, या झाडाचे लाकूड अनेक प्रकारचे फर्निचर, पॅकिंग बॉक्स आणि क्रिकेट स्टीक बनवण्यासाठी वापरले जाते. याशिवाय, त्याच्या लाकडाचा उपयोग शेतीशी संबंधित अवजारे, प्लीहा, पेन्सिल आणि पॅकिंग बॉक्स तयार करण्यासाठी केला जातो. औषधी गुणधर्मामुळे या झाडाला दीमक लागतं नाही, त्यामुळे याचे लाकूड वर्षानुवर्षे सुरक्षित राहते.

महत्वाची बातमी: Pm Kisan : ई-केवायसी केली नाही तरी मिळणार का पीएम किसान योजनेचा 11वा हफ्ता; काय सांगितलं सरकारने

मलबार कडुलिंबाची झाडे पूर्ण विकसित होण्यासाठी सुमारे 8 वर्षे लागतात. कृषी तज्ञांच्या मते, चार एकर शेतात याची सुमारे 5 हजार झाडे लावता येतात. आणि ही झाडे 6 ते 8 वर्षात कापणीसाठी तयार होतात. 4 एकर शेतात मलबार कडुनिंबाची लागवड करून शेतकरी बांधव 8 वर्षात 50 लाखांपर्यंत कमाई करू शकतात. जितक्या जास्त क्षेत्रावर या झाडाची लागवड केली जाईल तितका याचा नफा वाढेल.

महत्वाची बातमी: Agriculture : सासू-सुनेची भन्नाट जोड!! शेतीतुन कमवीत आहेत वर्षाकाठी लाखों; वाचा सासू-सुनेच्या या अनोख्या यशाविषयी

English Summary: Farming Business Idea: Plant 'Ya' tree and get good income; Read more about it
Published on: 04 May 2022, 01:27 IST